शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
3
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
4
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
5
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
6
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
7
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
8
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
9
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
10
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
11
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
12
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
13
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
14
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
15
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
16
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
17
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
18
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
19
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
20
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
Daily Top 2Weekly Top 5

मुंबईत कारटेप चोरांचा हैदोस, एका अट्टल चोराला ताडदेव पोलिसांनी केली अटक 

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 2, 2018 18:09 IST

मुंबई -  गेल्या काही दिवसांपासून कारटेपचोरांनी हैदोस घातला आहे. शहर आणि उपनगरात पार्क करण्यात आलेल्या मोटार कार फोडून त्यातून टेप चोरणाऱ्या एका अट्टल चोरट्याला त्याच्या साथीदारासह ताडदेव पोलिसांनी अटक केली. मालवणीमध्ये पकडण्यासाठी गेलेल्या पोलिसांनाही या चोरट्यांनी धक्काबुकी केली. या झटापटीत पोलीस अधिकारी जखमी झाले. दक्षिण मुंबईसह उपनगरात कारटेप चोरांनी हैदोस घातला होता. अनेक ...

मुंबई -  गेल्या काही दिवसांपासून कारटेपचोरांनी हैदोस घातला आहे. शहर आणि उपनगरात पार्क करण्यात आलेल्या मोटारकार फोडून त्यातून टेप चोरणाऱ्या एका अट्टल चोरट्याला त्याच्या साथीदारासह ताडदेव पोलिसांनी अटक केली. मालवणीमध्ये पकडण्यासाठी गेलेल्या पोलिसांनाही या चोरट्यांनी धक्काबुकी केली. या झटापटीत पोलीस अधिकारी जखमी झाले. 

दक्षिण मुंबईसह उपनगरात कारटेप चोरांनी हैदोस घातला होता. अनेक बड्या व्यक्तीच्या गाड्यांमधील टेप चोरीला गेल्यामुळे विविध पोलीस ठाण्याची पथके या चोरांच्या मागावर होती. ताडदेव पोलिस ठाण्याच्या हद्दीतही कारटेप चोरीला गेल्या होत्या. वरिष्ठ पोलिस निरीक्षक संजय सुर्वे यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक निरिक्षक अरुण थोरात, उपनिरीक्षक पडवाळे यांच्यासह त्यांच्या पथकाने कारटेप चोरांचा शोध सुरु केला. मुंबईत ठिकठिकाणी पन्नासहून अधिक कारटेप चोरीचे गुन्हे दाखल असलेला राजेश प्रकाश चव्हाण हा यातील मुख्य आरोपी असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. ठिकठिकाणचे सीसीटीव्ही फुटेज आणि खबऱ्यांकडून मिळालेल्या माहितीवरून राजेश मालवणी येथील पारधीवाडा येथे राहत असल्याचे समजले. पोलिसांनी या ठिकाणी सापळा लावला. संधी मिळताच पोलिस राजेशच्या घरात घुसले. अचानक पोलिसांची धाड पडल्यामुळे बिथरलेल्या राजेशने पोलिसांना धक्कबुकी करून पळ काढला. पोलिसांनी पाठलाग करून त्याला पकडले. या झटापटीत सहायक निरीक्षक अरुण थोरात यांच्या पायाला दुखापत झाली. राजेश याला पकडल्यानंतर त्याचा साथीदार मनोज यादव यालाही पोलिसांनी पकडले. 

संपूर्ण मुंबईत गुन्हे 

राजेश याच्यावर संपूर्ण मुंबईतील विविध पोलीस ठाण्यात गुन्हे आहेत. ४५ गुन्ह्यात राजेश शिक्षा भोगून बाहेर आला आहे. मलबार हिल, डोंगरी, शिवाजी पार्क, गावदेवी, डॉ. दादासाहेब भडकमकर मार्ग पोलीस ठाण्यासह पश्चिम द्रुतगती महामार्गनजीक असलेल्या पोलिस ठाण्यात गुन्हे आहेत. ४ ऑक्टोबरपर्यंत या दोघांना पोलीस कोठडी सुनाविण्यात आली आहे.  

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीRobberyदरोडाcarकार