शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
2
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
3
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
4
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
5
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
6
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
7
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
8
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
9
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
10
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
11
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
12
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
13
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
14
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
15
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
16
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
17
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
18
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
19
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
20
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
Daily Top 2Weekly Top 5

Karnataka MLA Corruption Case: कसं शक्य आहे? 8.23 कोटी रुपये सुपारी विकून मिळालेले; भ्रष्टाचारातील भाजप आमदाराचा दावा

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 8, 2023 09:25 IST

राजकारण्यांकडून शेतीचे भरमसाठ उत्पन्न दाखविण्याची बाब काही नवी नाही. परंतू, कर्नाटकातील भाजपाच्या आमदाराने ते आपलेच पैसे असल्याचा दावा केला आहे आणि ते देखील सुपारी विकून कमविलेले उत्पन्न असल्याचे म्हटले आहे.

कर्नाटकमध्ये सध्या भाजपा आमदारा आणि त्याच्या मुलाकडे सापडलेली करोडोंची कॅश, दागिने चर्चेचा विषय ठरला आहे. आमदार मदल विरुपक्षप्पा यांच्या मुलाला ४० लाखांची लाच स्वीकारताना पकडण्यात आले होते. यानंतर त्याच्या घरी छापा मारला असता त्यांच्याकडे तब्बल 8.23 कोटी रुपये सापडले होते. या आमदाराने आता अजब दावा केला आहे. 

राजकारण्यांकडून शेतीचे भरमसाठ उत्पन्न दाखविण्याची बाब काही नवी नाही. परंतू, कर्नाटकातीलभाजपाच्या आमदाराने ते आपलेच पैसे असल्याचा दावा केला आहे आणि ते देखील सुपारी विकून कमविलेले उत्पन्न असल्याचे म्हटले आहे. याची कागदपत्रे मी सादर करीन असेही या आमदाराने कोर्टात सांगितले आहे. 

मंगळवारी कोर्टाने विरुपक्षप्पा यांना अंतरिम जामिन मंजूर केला आहे. तसेच ४८ तासांत लोकायुक्तांसमोर हजर राहण्यास सांगितले आहे. विरुपक्षप्पा हे कर्नाटक सोप्स एंड डिटर्जेंट लिमिटेडचे अध्यक्ष आहेत. भारताच्या इतिहासात पहिल्यांदाच असे घडलेय की सत्ताधारी पक्षाच्या आमदारावर छापेमारी करण्यात आली आहे, असे ते म्हणाले. घरात सापडलेले पैसे आपल्या कुटुंबाचे असल्याचे त्यांनी म्हटले आहे. आमचा तालुका हा सुपारीची शेतीसाठी ओळखला जातो. आमच्या सुपारीच्या जमिनीत एका सामान्य शेतकऱ्याच्या घरात पाच ते सहा कोटी रुपये आहेत. माझ्याकडे 125 एकर सुपारी फार्म, सुपारी मार्केट आणि इतर अनेक व्यवसाय आहेत. मी लोकायुक्तांना योग्य ती कागदपत्रे देईन आणि माझे पैसे परत घेईन, असे विरुपक्षप्पा म्हणाले. विरुपक्षप्पा यांचा मुलगा प्रशांत कुमार एमव्ही याला KSDL कार्यालयात एका कंत्राटदाराकडून 40 लाख रुपयांची लाच घेताना लोकायुक्त अधिकाऱ्यांनी रंगेहात पकडले होते. तो देखील निर्दोष असल्याचा दावा आमदारांनी केला आहे. मदल विरुपक्षप्पा हे दावणगेरे जिल्ह्यातील चन्नागिरी मतदारसंघातून सलग दोन वेळा आमदार आहेत. 2018 च्या विधानसभा निवडणुकीत त्यांनी प्रतिज्ञापत्रात 5.73 कोटी रुपयांच्या संपत्तीचा खुलासा केला होता. 2013 च्या निवडणुकीत त्यांनी 1.79 कोटी रुपयांची संपत्ती जाहीर केली होती.  

टॅग्स :Karnatakकर्नाटकBJPभाजपाBribe Caseलाच प्रकरण