शहरं
Join us  
Trending Stories
1
अवघ्या २४ तासांतच फुस्सं झाला पाकिस्तानचा प्लॅन?; २५० मृत्यूनंतर तुर्कीनं इस्रायलला फटकारलं
2
"मुनीर आपले हिरो, आज अल्लाहने..."; अमेरिका-इराण युद्धविरामाचं श्रेय घेण्यासाठी शहबाज शरीफ यांचा आटापिटा
3
वाहनमालकांनो...! उद्यापासून टोल नाक्यावर रोख रक्कम स्वीकारली जाणार नाही! फास्टॅग, युपीआय नसेल तर पुढे जाता येणार नाही...
4
सिलिंडरच्या OTP मुळे वाचला जीव, विहिरीत ३ दिवस मृत्यूशी झुंज; आजोबांसोबत काय घडलं?
5
इराण-अमेरिका बैठकीपूर्वी २ दिवस सुट्टी जाहीर, हॉटेलही केले रिकामे; पाकिस्तानात खास तयारी
6
Latest Marathi News LIVE: इस्रायलच्या हल्ल्यात 203 लोकांचा मृत्यू, १००० पेक्षा जास्त जखमी
7
जगातील अजब देश! या १० देशांकडे स्वतःचे 'सैन्य'च नाही; मग संरक्षणाची जबाबदारी कोणाची?
8
सावधान! स्मार्टफोनमध्ये चुकूनही ठेवू नका 'असे' व्हिडिओ, अन्यथा थेट घरून उचलून नेतील पोलीस
9
फक्त ३ सोप्या स्टेप्समध्ये घरीच तयार करता येईल वर्षभर टिकणारी चटपटीत आमचूर पावडर
10
इराणच्या समुद्रात युद्धाचा भडका! भारत सरकारकडून भारतीयांना इमर्जन्सी अलर्ट; "कुठेही जाण्यापूर्वी आम्हाला सांगा..."
11
युद्धविरामादरम्यान इस्रायलचा लेबनॉनवर हवाई हल्ला; हिजबुल्लाह प्रमुखाचा वैयक्तिक सचिव ठार!
12
‘इराण होर्मुझमध्ये टोल घेणार असेल तर भारतानेही ‘या’ ठिकाणाहून टोल वसूल करावा’, प्रसिद्ध बँकरचा सल्ला   
13
Sanoj Mishra : "जिहादी जेलमध्ये जाणार, महादेव लवकरच माझा वनवास..."; मोनालिसावरुन सनोज मिश्रा आक्रमक
14
ही ५ कारणं ज्यामुळे अमेरिका आणि इराणमधील युद्धविराम तुटणार, तिसरा मुद्दा ठरणार कळीचा
15
विमान प्रवास करताय? चुकूनही घालू नका 'काळे मोजे'; ठरू शकतात धोकादायक, असं आहे कारण
16
Vastu Tips: सावधान! पूर्वजांचे फोटो 'या' दिशेला असतील तर घरात टिकणार नाही पैसा; वेळीच बदल करा!
17
जगात काहीतरी मोठे घडणार? छोटासा देश सोन्याच्या मागे लागला; खरेदीचा आकडा बघून RBI लाही चिंता वाटू लागली...
18
युद्धविरामानंतर फ्रान्सच्या नेतृत्वात १५ देश आले एकत्र; होर्मुझवर आखला 'प्लॅन बी', कसली तयारी?
19
IPL 2026: आता 'या' खेळाडूंना मैदानात एन्ट्री नाही, बीसीसीआयचा कठोर निर्णय!
20
स्मार्टफोन्सच्या दुनियेत या कंपनीचा धमाका! ६९९ रुपयांत इअरबड, ३०००० रुपयांत फ्लिप फोन; बाजार उठवला...
Daily Top 2Weekly Top 5

सासू-सासरे अन् पतीसह तिनं मुलांनाही सोडलं नाही! कुटुंबाला 'स्लो पॉयझन' देणाऱ्या महिलेची 'अशी' झाली पोलखोल

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 8, 2025 19:36 IST

चैत्र हे विष केवळ पती गजेंद्रलाच नव्हे, तर त्यांच्या दोन मुलांना, सासू-सासऱ्यांनाही अन्नातून देत होती. तिचा उद्देश सर्वांना एकाचवेळी संपवण्याचा होता.

कर्नाटकातील हसन जिल्ह्यातील बेलूर तालुक्यात एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. येथे एका विवाहित महिलेने आपल्या पतीसह संपूर्ण कुटुंबाला विष देऊन हळूहळू मारण्याचा प्रयत्न केला. या प्रकरणामुळे संपूर्ण गावात खळबळ उडाली असून, पोलिसांनी संबंधित महिलेला अटक केली आहे.

प्रेमसंबंधांमध्ये अडथळा येतो म्हणून घेतला टोकाचा निर्णय

आरोपी महिलेचं नाव चैत्र (वय ३३) असून, ती केरळौर गावात राहते. तिचं गजेंद्र नावाच्या व्यक्तीसोबत १० वर्षांपूर्वी लग्न झालं असून, त्यांना दोन मुलेही आहेत. काही महिन्यांपूर्वी गजेंद्रला पत्नीच्या वागणुकीत बदल जाणवू लागला. फोनवर तासतास बोलणं आणि घरच्यांपासून दुरावा यामुळे त्याला संशय येऊ लागला.

गजेंद्रने चौकशी केल्यानंतर समोर आलं की, चैत्रचे एका तरुणाशी प्रेमसंबंध होते. दोन्ही कुटुंबांनी या प्रकरणात हस्तक्षेप करून समेट घडवून आणण्याचा प्रयत्न केला. चैत्रनेही चूक मान्य करत पुन्हा तसं न वागण्याचं वचन दिलं. मात्र काही महिन्यांतच तिने आपल्या शेजाऱ्याशी – शिवू नावाच्या व्यक्तीशी नव्याने संबंध सुरू केले.

हळूहळू विष देऊन हत्या करण्याचा कट

गजेंद्रला त्याच्या प्रकृतीत सातत्याने बिघाड होत असल्याचं लक्षात आलं. त्याला थकवा, झोपेची समस्या, अशक्तपणा यासारखे त्रास होऊ लागले. त्यावेळी कोणतंही ठोस कारण समजत नव्हतं. अचानक गजेंद्रला पत्नीच्या बॅगेत काही संशयास्पद गोळ्या आढळल्या. त्याने त्या गोळ्या डॉक्टरकडे तपासण्यासाठी नेल्या. डॉक्टरांनी स्पष्ट सांगितलं की, त्या गोळ्या आरोग्यासाठी अत्यंत घातक असून त्यात विष आहे.

पोलिसांकडून त्वरित कारवाई, आरोपी अटकेत

चौकशी दरम्यान स्पष्ट झालं की, चैत्र हे विष केवळ पती गजेंद्रलाच नव्हे, तर त्यांच्या दोन मुलांना, सासू-सासऱ्यांनाही अन्नातून देत होती. तिचा उद्देश सर्वांना एकाचवेळी संपवण्याचा होता. योग्य वेळी हा प्रकार उघडकीस आल्याने सर्वांना तात्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आलं आणि त्यांचे प्राण वाचले.

या प्रकरणी बेलूर पोलीस ठाण्यात एफआयआर दाखल करण्यात आला असून, चैत्रला हत्येच्या प्रयत्नाच्या आरोपाखाली अटक करण्यात आली आहे. तिचा प्रियकर शिवू याच्याविरोधातही गुन्हा दाखल करण्यात आला असून त्याचा शोध सध्या सुरू आहे. पोलीस या संपूर्ण प्रकरणाची अधिक चौकशी करत असून, आरोपींवर कायदेशीर कारवाई सुरू आहे.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीKarnatakकर्नाटक