शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी घडामोड, रशियाकडून युद्धविरामाची घोषणा; २ दिवस युक्रेन हल्ले नाही, अचानक नेमके काय घडले?
2
आजचे राशीभविष्य, १० एप्रिल २०२६: कोणताही महत्त्वाचा निर्णय घेणे टाळा; प्रवास संभवतो
3
“हे सगळे लगेचच थांबवा, आमचा करार...”; होर्मुझवर टोल आकारणीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
4
अग्रलेख: कुंभमेळा श्रद्धेचा, संघर्षाचा नव्हे! ‘नवे नाशिक’ उभे राहताना ‘आपले नाशिक’ हरवतंय..?
5
फोन ४०% महागले, किंमत आणखी वाढणार? विक्रीत १० टक्क्यांपर्यंत घट होण्याची शक्यता
6
न्यू इंडिया बँक १२२ कोटींचा घाेटाळा: माजी महाव्यवस्थापक हितेश मेहता यांना जामीन नाकारला
7
भारतात मुलांच्या मृत्यूचे १० वे कारण ठरतोय ‘कॅन्सर’; वर्षभरात १७ हजार बालकांचा मृत्यू
8
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
9
केवळ घर नव्हे, उद्योगही चालवणार! महिलांकडील कर्ज ७६ लाख कोटींवर, २०१७पेक्षा पाचपट वाढ
10
सुरुंग पेरलेला होर्मुझचा नकाशा जारी; इराणने पुन्हा भरवली जगाला धडकी; अमेरिकेवर दबाव
11
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
12
पंथ, संप्रदायांच्या आधारे मंदिरांमध्ये प्रवेश दिल्यास हिंदू धर्मावर नकारात्मक परिणाम: सुप्रीम कोर्ट
13
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
14
केरळ, आसाम व पुद्दुचेरीत विक्रमी मतदान! कुठे बोटीचा प्रवास, तर कुठे पावसातही हजेरी
15
हॅकर्स म्हणतात, युद्धविरामाशी आमचा संबंध नाही; ‘हंदाला’कडून हल्ल्याची अमेरिका-इस्रायलला भीती
16
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
17
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
18
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
19
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
20
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
Daily Top 2Weekly Top 5

काठ्या, पाईप अन्...; घरात मित्राला पाहून पती भडकला, मशिदीत केली पत्नीची तक्रार; जमावानं दिली 'तालिबानी शिक्षा'

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 15, 2025 14:45 IST

या महिलेला अक्षरशः काठ्या आणि लोखंडी पाईपने मारहाण करण्यात आली आहे. ही घटना 7 एप्रिलला बेंगळुरुतील तवरेकेरे भागात स्थित जामा मशिदीबाहेर घडली.

कर्नाटकची राजधानी असलेल्या बेंगळुरूमधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. पतीने स्थानिक मशिदीत आपल्या पत्नी विरुद्ध तक्रार केल्यानंतर, जमावाने या महिलेला बेदम मारहाण केली आहे. या महिलेला अक्षरशः काठ्या आणि लोखंडी पाईपने मारहाण करण्यात आली आहे. ही घटना 7 एप्रिलला बेंगळुरुतील तवरेकेरे भागात स्थित जामा मशिदीबाहेर घडली. हा संपूर्ण प्रकार कॅरेऱ्यात कैद झाला असून सोशल मीडियावर जबरदस्त व्हायरल होत आहे. संबंधित पीडित महिलेचे नाव शबाना बानो असून ती 38 वर्षांची आहे. 

असं आहे संपूर्ण प्रकरण -एनडीटीव्हीने दिलेल्या वृत्तानुसार, पीडित शबाना बानो ही घरकाम करणारी महिला आहे. ७ एप्रिल रोजी, तिच्या घरी तिची एक नातेवाईक नसरीन तिला भेटण्यासाठी आली. दरम्यान, फयाज नावाचा एक तरुणही त्यांच्या घरी पोहोचला. यानंतर, हे तिघेही थोड्या वेळासाठी बाहेर फिरण्यासाठी गेले. यानंतर ते पुन्हा शबानाच्या घरी परतले. तेवढ्यात, शबानाचा पती जमील अहमद घरी आला. त्याने नसरीन आणि फयाजला तेथे बघितले आणि तो संतापला. त्याने या संपूर्ण प्रकरणाची तक्रार तवरेकेरे येथील जामा मशिदीत केली.

दोन दिवसांनंतर मशिदीत बोलावू करण्यात आला हल्ला -तक्रार दाखल झाल्याच्या दोन दिवसांनंतर, अर्थात ९ एप्रिलला, शबाना, नसरीन आणि फयाज यांना मशिदीकडून बोलावण्यात आले. हे तिघे तेथे पोहोचताच त्यांच्यावर अचानकपणे सहा जणांनी हल्ला केला. या हल्लेखोरांनी तिला काठ्या आणि लोखंडी पाईपने मारहाण केली. यात ती गंभीर जखमी झाली.

यानंतर पोलिसांनी व्हिडिओच्या आधारे सहा आरोपींना अटक केली आहे. मोहम्मद नियाज (32) - ड्राइवर, मोहम्मद गौसपीर (45) – भंगारवाला, चांद बाशा (35) – उसाचा रस विक्रेता, दस्तगीर (24) – बाईक मेकॅनिक, रसूल टीआर (४२) – बुक्कामबुडी तलावातील मच्छीमार, इनायत उल्ला (५१) – स्थानिक रहिवासी, अशी आरोपींची नावे आहेत.

आरोपींविरुद्ध कट रचणे, गंभीर हल्ला आणि हत्येचा प्रयत्न यांसारख्या कलमांखाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसेच, व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर लगेचच कारवाई करण्यात आली आणि सर्व आरोपींना ताब्यात घेण्यात आल्याचे पोलिसांनी सांगितले. 

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीKarnatakकर्नाटकMosqueमशिदMuslimमुस्लीमhusband and wifeपती- जोडीदार