शहरं
Join us  
Trending Stories
1
हीच ती वेळ! अचूक टप्प्यावर 'करेक्ट कार्यक्रम' करत इंग्लंडचा 'बालेकिल्ला' जिंकण्याची संधी
2
12 देशांवर पडणार डोनाल्ड ट्रम्प यांच्या टॅरिफचा हातोडा, स्वाक्षरीही झाली! म्हणाले...
3
गिल है की मानता नहीं...; 'द्विशतकी' खेळीनंतर 'शतकी' डाव, इंग्लंडवर आणखी एक 'घाव'
4
"भाजपची दुसऱ्यांदा माघार, केंद्राकडे राज यांच्या प्रश्नांची उत्तरे नाहीत"; स्टॅलिन यांचा ठाकरेंना पाठिंबा
5
Unplayable Delivery! आकाश दीपसमोर जो रुट चारीमुंड्याचित! विजयातील मोठा अडथळा दूर (VIDEO)
6
VIDEO: प्रचंड गर्दी तरीही वारकऱ्यांनी दाखवली शिस्त! रुग्णवाहिकेसाठी क्षणात मोकळी करून दिली वाट
7
ENG vs IND :आता यजमान इंग्लंडची खैर नाही! टीम इंडियानं 'बॅझबॉल'वाल्यांसमोर सेट केलं मोठं टार्गेट
8
Neeraj Chopra Wins Gold NC Classic 2025: घरच्या मैदानातील पहिली स्पर्धा! 'गोल्ड'सह इथंही नीरज चोप्राची हवा
9
"त्यासाठी मनगटात जोर लागतो, नुसत्या तोंडाच्या वाफा..."; एकनाथ शिंदे यांचा राज-उद्धव मेळाव्याला टोला
10
Video: "डाव घोषित करतोस का? उद्या पाऊस पडणार आहे"; हॅरी ब्रुकच्या प्रश्नाला गिलचे मजेशीर उत्तर
11
"मुंबईला नवा चेहरा दिल्याने उद्धव ठाकरेंचा जळफळाट"; CM फडणवीस म्हणाले, "एकमेकांशी भांडूनच ते…"
12
"ठाकरे ब्रँड असता, तर बाळासाहेब असतानाच २८८ आमदार असते"; शिंदेंच्या आमदाराचे धक्कादायक विधान
13
सर्वात जलद सेंच्युरी! १४ वर्षीय वैभव सूर्यवंशीनं रचला इतिहास; मोडला पाक फलंदाजाचा रेकॉर्ड
14
Photo: आजच दुकान गाठलं पाहिजे, बजाजची नवीन स्पोर्ट्स बाईक पाहून तुम्हीही हेच म्हणाल!
15
Viral Video: रेल्वे स्टेशन आहे की हायवे? प्लॅटफॉर्मवरून गाड्यांना धावताना पाहून प्रवाशी शॉक!
16
PHOTOS: जसप्रीत बुमराहच्या बाजूला बसून हळूच हसणारी 'ती' तरूणी कोण? जाणून घ्या तिच्याबद्दल...
17
COVID19: महाराष्ट्रावरचं कोरोना संकट आणखी गडद, आज १२ नव्या रुणांची नोंद, २४ तासात एकाचा मृत्यू
18
उद्धव-राज ठाकरेंसंदर्भात रामदास आठवले यांची मोठी भाविष्यवाणी, म्हणाले, 'आमच्या महायुतीला...!'
19
जयजयकार...मराठी शक्तीचा, 'ठाकरे ब्रँड'वरील भक्तीचा! उद्धव-राज एकत्र येतात तेव्हा...
20
आशा आहे, मी आणखी 30-40 वर्षे जगेन आणि...; दलाई लामांकडून उत्तराधिकारी वादाला पूर्णविराम

ज्योतिषी महिलेवरील बलात्कारप्रकरणी टीव्ही अभिनेता करण ओबेरॉयला अटक

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 7, 2019 07:20 IST

ज्योतिषी असलेल्या ३८ वर्षांच्या महिलेवर बलात्कार केल्याचा आरोप टेलिव्हिजन कलाकार तसेच अँकर करणसिंह भूपेंद्रसिंह ओबेरॉय (४७) याच्यावर करण्यात आला आहे.

मुंबई : ज्योतिषी असलेल्या ३८ वर्षांच्या महिलेवर बलात्कार केल्याचा आरोप टेलिव्हिजन कलाकार तसेच अँकर करणसिंह भूपेंद्रसिंह ओबेरॉय (४७) याच्यावर करण्यात आला आहे. या प्रकरणी ओशिवरा पोलिसांनी त्याच्यावर गुन्हा दाखल करत रविवारी त्याला अटक केली आहे.तक्रारदार महिला तिची आई, मावशी आणि मुलासोबत ओशिवरा परिसरात राहते. ती घरीच ज्योतिष पाहण्याचे काम करते. २०१६ मध्ये टिंडर या डेटिंग अ‍ॅपमार्फत त्यांची ओळख झाली होती. त्यानंतर त्यांचे फोनवर बोलणे वाढले आणि ओशिवराच्या यमुनानगर परिसरात दोघे एकमेकांना भेटले. करणचे तिच्याकडे येणेजाणे वाढले. २०१७ मध्ये ओबेरॉय पीडितेच्या घरी गेला. त्या ठिकाणी तिला प्रसाद म्हणून खोबरे दिले. त्यानंतर गोड बोलून तिच्याशी जवळीक साधत तिच्यावर बलात्कार केला. याचे त्याने मोबाइलवर व्हिडीओ शूट केल्याचे तिने ओशिवरा पोलिसांना सांगितले. तसेच या व्हिडीओचा वापर करून तो तिच्याकडून शारीरिक सुखाची मागणी करायचा. तसेच तिच्याकडून बरेच पैसेही त्याने उकळले. त्यानंतर व्हिडीओ डिलीट करण्यासाठी तिला तो त्याच्याशी लग्न करण्याची जबरदस्ती करत होता. २०१८ मध्येदेखील परत देण्याचे वचन देत ओबेरॉयने तिच्याकडून अडीच लाख उकळले. मात्र ते तिला परत केले नाहीत. या पैशांच्या बदल्यात व्हिडीओ डिलीट करण्याची कबुली त्याने दिली होती. मात्र तेदेखील त्याने केले नाही, त्यामुळे कंटाळून पोलिसांकडे धाव घेतल्याचे तिने तक्रारीत म्हटले आहे. पोलिसांनी शहानिशा करत ओबेरॉयला अटक केली. त्याला न्यायालयाने ९ मेपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.जस्सी जैसी कोई नहीं, स्वाभिमान, छाया, निर्देश, जीवन बदल सकता है, हादसा, इनसाइड एज, रॉसवेल, न्यू मेक्सिको या मालिकांमध्ये ओबेरॉयने काम केले आहे. तसेच टायटन अंताक्षरी आणि द ग्रेट इंडियन कॉमेडी शो या रिअ‍ॅलिटी शोसाठी त्याने अँकरिंगदेखील केले आहे.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीRapeबलात्कार