शहरं
Join us  
Trending Stories
1
अवघ्या २४ तासांतच फुस्सं झाला पाकिस्तानचा प्लॅन?; २५० मृत्यूनंतर तुर्कीनं इस्रायलला फटकारलं
2
"मुनीर आपले हिरो, आज अल्लाहने..."; अमेरिका-इराण युद्धविरामाचं श्रेय घेण्यासाठी शहबाज शरीफ यांचा आटापिटा
3
वाहनमालकांनो...! उद्यापासून टोल नाक्यावर रोख रक्कम स्वीकारली जाणार नाही! फास्टॅग, युपीआय नसेल तर पुढे जाता येणार नाही...
4
सिलिंडरच्या OTP मुळे वाचला जीव, विहिरीत ३ दिवस मृत्यूशी झुंज; आजोबांसोबत काय घडलं?
5
इराण-अमेरिका बैठकीपूर्वी २ दिवस सुट्टी जाहीर, हॉटेलही केले रिकामे; पाकिस्तानात खास तयारी
6
Latest Marathi News LIVE: इस्रायलच्या हल्ल्यात 203 लोकांचा मृत्यू, १००० पेक्षा जास्त जखमी
7
जगातील अजब देश! या १० देशांकडे स्वतःचे 'सैन्य'च नाही; मग संरक्षणाची जबाबदारी कोणाची?
8
सावधान! स्मार्टफोनमध्ये चुकूनही ठेवू नका 'असे' व्हिडिओ, अन्यथा थेट घरून उचलून नेतील पोलीस
9
फक्त ३ सोप्या स्टेप्समध्ये घरीच तयार करता येईल वर्षभर टिकणारी चटपटीत आमचूर पावडर
10
इराणच्या समुद्रात युद्धाचा भडका! भारत सरकारकडून भारतीयांना इमर्जन्सी अलर्ट; "कुठेही जाण्यापूर्वी आम्हाला सांगा..."
11
युद्धविरामादरम्यान इस्रायलचा लेबनॉनवर हवाई हल्ला; हिजबुल्लाह प्रमुखाचा वैयक्तिक सचिव ठार!
12
‘इराण होर्मुझमध्ये टोल घेणार असेल तर भारतानेही ‘या’ ठिकाणाहून टोल वसूल करावा’, प्रसिद्ध बँकरचा सल्ला   
13
Sanoj Mishra : "जिहादी जेलमध्ये जाणार, महादेव लवकरच माझा वनवास..."; मोनालिसावरुन सनोज मिश्रा आक्रमक
14
ही ५ कारणं ज्यामुळे अमेरिका आणि इराणमधील युद्धविराम तुटणार, तिसरा मुद्दा ठरणार कळीचा
15
विमान प्रवास करताय? चुकूनही घालू नका 'काळे मोजे'; ठरू शकतात धोकादायक, असं आहे कारण
16
Vastu Tips: सावधान! पूर्वजांचे फोटो 'या' दिशेला असतील तर घरात टिकणार नाही पैसा; वेळीच बदल करा!
17
जगात काहीतरी मोठे घडणार? छोटासा देश सोन्याच्या मागे लागला; खरेदीचा आकडा बघून RBI लाही चिंता वाटू लागली...
18
युद्धविरामानंतर फ्रान्सच्या नेतृत्वात १५ देश आले एकत्र; होर्मुझवर आखला 'प्लॅन बी', कसली तयारी?
19
IPL 2026: आता 'या' खेळाडूंना मैदानात एन्ट्री नाही, बीसीसीआयचा कठोर निर्णय!
20
स्मार्टफोन्सच्या दुनियेत या कंपनीचा धमाका! ६९९ रुपयांत इअरबड, ३०००० रुपयांत फ्लिप फोन; बाजार उठवला...
Daily Top 2Weekly Top 5

पती बाहेर जाताच घरी यायचा प्रियकर, औषधांचा ओव्हरडोस देऊन पत्नीकडून पती अन् सासऱ्यांची हत्या!

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 11, 2022 11:05 IST

उत्तर प्रदेशच्या कानपूरमध्ये प्रियकर आणि प्रॉपर्टीसाठी एका महिलेनं अगदी फिल्मी अंदाजात आपल्या पती व सासऱ्यांची हत्या केली आहे.

कानपूर-

उत्तर प्रदेशच्या कानपूरमध्ये प्रियकर आणि प्रॉपर्टीसाठी एका महिलेनं अगदी फिल्मी अंदाजात आपल्या पती व सासऱ्यांची हत्या केली आहे. पत्नी सपना हिला टेलिव्हिजन सीरिअल पाहून संपूर्ण आयडिला मिळाली आणि तिनं हत्येचा कट रचला. पोलिसांनी सपना आणि तिचा प्रियकर राज याच्यासह एकूण चार आरोपींना अटक केली आहे. 

पोलिसांच्या माहितीनुसार सपना हिनं आपलेच सासरे किशोर यांना औषधांचा ओव्हरडोस देऊन ठार केलं. यानंतर तिनं पती ऋषभ याच्यावर प्रियकर राज याच्याकरवी हल्ला घडवून आणला. हल्यातून तो वाचला तर त्याचीही औषधांचा ओव्हर डोस देऊन हत्या केली. समोर आलेल्या माहितीनुसार सपना हिचा पती ऋषभ याला मधुमेह आहे. यासाठी ऋषभला ग्लुकोजचं इंजेक्शन दिलं होतं. मृत ऋषभ यांची मावशीनं सांगितलं की ऋषभ घरी नसला की सपना तिचा प्रियकर राज याला घरी बोलवायची.

सपना हिनं पोलिसांच्या डोळ्यात धूळफेक करण्यासाठी ज्यावेळी पती ऋषभवर हल्ला झाला होता तेव्हा तिनं त्यांचे शेजारी विश्वकर्मा यांच्याविरोधात खोटी तक्रार दिली होती. त्यानुसार शेजाऱ्याला अटक करुन पोलीस त्याची चौकशी करत होते. खरंतर शेजाऱ्याचं याप्रकरणात काहीच घेणंदेणं नव्हतं. सपना हिनं एका बाजूला स्वत:हून तक्रार दाखल करत स्वत:ला वाचवण्याचा प्रयत्न केला. तसंच तिच्या प्रियकरालाही पाठिशी घालण्याचे प्रयत्न केले. पोलिसांचं लक्ष या गोष्टीकडे जाणार नाही अशी काळजी ती घेत होती. 

पती ऋषभ याचा काटा काढण्यासाठी सपना हिनं आधी जवळच्या मेडिकल दुकानदाराशी मैत्री केली. त्याला जाळ्यात ओढलं आणि त्याच्याकडून औषधं घेतली. आशा मेडिकल स्टोअरचे मालक सुरेंद्र हे तिला वेळोवेळी औषधं पुरवत होते. पोलिसांनी आता सुरेंद्र यालाही अटक केली आहे. ऋषभला तिनं औषधांचा ओव्हरडोस देत त्याचा जीव घेतला. 

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारी