शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
4
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
5
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
6
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
7
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
8
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
9
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
10
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
11
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
12
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
13
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
14
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
15
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
16
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
17
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
18
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
19
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
20
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
Daily Top 2Weekly Top 5

“ये रातें, ये मौसम, नदी का किनारा...”सुसाईड नोटमध्ये लिहून युवकाची आत्महत्या; कारण ऐकून धक्का बसेल

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 15, 2021 20:12 IST

युवकाने सुसाईड नोटमध्ये मार्मिक गाणं लिहिलं आहे. माहितीनुसार, मृतकासोबत नोकरीच्या नावाखाली फसवणूक झाली होती

ठळक मुद्देगेल्या काही दिवसांपासून तो प्रचंड मानसिक तणावाखाली होता. यतींद्रच्या रुमबाहेरील दरवाजा मागील शनिवारपासून बंद होता.घटनास्थळी २ पानांची सुसाईड नोट जप्त करण्यात आली आहे.

कानपूर -  ये रातें, ये मौसम, नदी का किनारा...हे गाणं लिहून एका युवकाने आत्महत्या केली आहे. या युवकाचा मृतदेह तीन दिवसानंतर रुममध्ये आढळला. सोमवारी रात्री घरात दुर्गंध पसरला तेव्हा घरमालकाने पोलीस ठाण्यात याची माहिती दिली. पोलीस आणि फॉरेन्सिक टीमने तातडीनं घटनास्थळी धाव घेत तपास सुरू केला आहे. पोलिसांना घटनास्थळी एक सुसाईड नोट सापडली आहे.

युवकाने सुसाईड नोटमध्ये मार्मिक गाणं लिहिलं आहे. माहितीनुसार, मृतकासोबत नोकरीच्या नावाखाली फसवणूक झाली होती. त्यात त्याला ९ लाखांचा चुना लागला होता. त्यामुळे गेल्या काही दिवसांपासून तो प्रचंड मानसिक तणावाखाली होता. लखनौच्या बालागंजच्या आझाद नगरमधील यतींद्र कानपूरच्या हा सत्यम विहारमध्ये रुम भाड्याने घेऊन तेथे वास्तव्यास होता. यतींद्रच्या कुटुंबात पत्नी आणि ५ महिन्याचा मुलगा आहे. यतींद्रची पत्नी एक आठवड्यापूर्वी लखनौला गेली होती.

रुममधून येत होता दुर्गंध

बँकेत कर्मचारी असलेल्या घरमालक अमित यांनी सांगितले की, यतींद्रच्या रुमबाहेरील दरवाजा मागील शनिवारपासून बंद होता. शनिवारनंतर यतींद्रला बाहेर बघितलं नाही. सोमवारी त्याच्या रुममधून खूप दुर्गंध येत होता. दरवाजा वाजवला परंतु आतमधून काहीही आवाज आला नाही. त्यानंतर पोलिसांना माहिती दिली. घटनास्थळी पोहचलेल्या पोलिसांनी दरवाजा तोडून मृतदेह ताब्यात घेतला. यतींद्रचा मृतदेह जमिनीवर पडला होता. घटनास्थळी २ पानांची सुसाईड नोट जप्त करण्यात आली आहे. फॉरेन्सिक टीमला मृत व्यक्तीच्या गळ्याभोवती फास आढळला. दावा केला जातोय की, यतींद्र बेडवर खुर्ची ठेऊन पंख्याला लटकला होता. परंतु गाठ सुटल्याने फास निघाला आणि त्याचा मृतदेह जमिनीवर पडला होता.

सुसाईड नोटमध्ये काय लिहिलंय?

यतींद्रने आत्महत्या करण्यापूर्वी सुसाईड नोटमध्ये सुरुवातीला ये रातें, ये मौसम, नदी का किनारा असं लिहून पुढे म्हटलंय की, राजकिशोरने नोकरी देण्याच्या बहाण्याने ३ लाख रुपये घेतले होते. त्यानंतर त्याची पत्नी मायानेही मला फसवून ३ लाख रुपये घेतले होते. राजकिशोरने एका साथीदाराच्या मदतीनं कल्याण विभागात नोकरी देण्याच्या बहाण्याने पैसे घेतले. यतींद्रनं पुढे लिहिलंय की, मी माझा मित्र सुरज गंगवार याला ५ हजार रुपये उधार दिले होते. उधारीचे पैसे न देता त्याच्या घरातील पोलिसांची भीती दाखवत होता असं पोलीस तपासात समोर आलं आहे.

टॅग्स :Policeपोलिस