शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

धक्कादायक! हॉस्टेलमध्ये मुलींच्या आंघोळीचा व्हिडिओ बनवत होता सफाई कर्मचारी, असा झाला खुलासा 

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 29, 2022 18:47 IST

Crime News : मुलींचे म्हणणे आहे की, कर्मचारी मुलींना आंघोळी करतानाचे व्हिडिओ बनवतात. एका मुलीने आंघोळ करताना व्हिडिओ रेकॉर्डिंग करणाऱ्या कर्मचाऱ्याला पकडले. यानंतर हॉस्टेलमध्ये एकच खळबळ उडाली.

कानपूर : मोहाली एमएमएस कांडनंतर आता उत्तर प्रदेशातील कानपूरमध्ये असाच प्रकार समोर आला आहे. याठिकाणी मुलींनी हॉस्टेल कर्मचाऱ्यांवर अश्लील व्हिडिओ बनवल्याचा आरोप केला आहे. मुलींचे म्हणणे आहे की, कर्मचारी मुलींना आंघोळी करतानाचे व्हिडिओ बनवतात. एका मुलीने आंघोळ करताना व्हिडिओ रेकॉर्डिंग करणाऱ्या कर्मचाऱ्याला पकडले. यानंतर हॉस्टेलमध्ये एकच खळबळ उडाली.

रावतपूर पोलीस स्टेशन हद्दीतील काकादेव येथील तुळशीनगरमध्ये असलेल्या गर्ल्स हॉस्टेलच्या मुलींनी हॉस्टेलमध्ये एका कर्मचाऱ्यावर अश्लील व्हिडिओ बनवल्याचा आरोप केला आहे. पोलीस तक्रारीनुसार, आरोपीने हॉस्टेलमधील मुलींचे अनेक अश्लील व्हिडिओ बनवले. आरोपी हॉस्टेलमध्ये सफाई कर्मचारी म्हणून काम करतो.

सफाई कर्मचाऱ्याला आंघोळी करताना गुपचूप व्हिडिओ बनवत असताना एका मुलीने पाहिले. त्यानंतर अनेक मुली एकत्र जमल्या आणि त्यांनी त्याच्याकडून फोन हिसकावून घेतला व पाहिले की, फोनमध्ये असे अनेक व्हिडिओ आहेत का? तोपर्यंत आरोपीने फोनमधून अनेक व्हिडिओ डिलीट केले होते. यानंतर मुलींनी जवळच्या पोलीस ठाण्यात जाऊन याप्रकरणी तक्रार दाखल केली.

विशेष म्हणजे, उत्तर प्रदेशातील एका जिल्ह्यात अतिरिक्त एसपी म्हणून तैनात असलेल्या एका पोलीस अधिकाऱ्याच्या मालकीचे हे गर्ल्स हॉस्टेल आहे. या हॉस्टेलमध्ये वेगवेगळ्या जिल्ह्यातील अनेक मुली राहत असून मेडिकल परीक्षेची तयारी करत आहेत. दरम्यान, याप्रकरणी एसीपी कल्याणपूर दिनेश शुक्ला यांनी इंडिया टुडेला सांगितले की, मुलींकडून तक्रार आली असून गुन्हा दाखल करण्यात येत आहे. आम्ही आरोपीला अटक केली आहे. चौकशी सुरू आहे. आम्ही आरोपीचा फोन देखील तपासत आहोत, या प्रकरणाचा तपास सुरू आहे.

मोहालीतील चंडीगड विद्यापीठातील एमएमएस कांडगेल्या काही दिवसांपूर्वी पंजाबच्या मोहालीतील चंडीगड विद्यापीठाच्या हॉस्टेलमध्ये मुलींचे आंघोळी करतानाचे व्हिडीओ बनवून व्हायरल केल्याचे प्रकरण समोर आले होते. यानंतर विद्यापीठ परिसरात तणावाची परिस्थिती निर्माण झाली होती. मुलींचे स्नान करतानाचे व्हिडीओ बनवून व्हायरल केल्याप्रकरणी एका विद्यार्थिनीला पोलिसांनी अटक केली होती. ती एमबीए प्रथम वर्षाची विद्यार्थिनी आहे. तिने हे व्हिडीओ तिच्या शिमला येथील मित्राला पाठवले होते.  त्याने सोशल मीडियावरव्हायरल केले होते. दरम्यान, याबाबत राज्य सरकारने उच्चस्तरीय चौकशीचे आदेश दिले होते.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीKanpur Policeकानपूर पोलीस