शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

भयंकर! सिगारेटनं चेहरा जाळला, खिळ्यानं डोळे काढले; १० वर्षीय मुलाची निर्घृण हत्या

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 9, 2022 12:32 IST

१० वर्षीय मुलाची निर्घृण हत्या; मृतदेह पाहून पोलिसांचा थरकाप उडाला

विवस्त्र शरीर, सिगारेटनं चटके दिल्याचे डाग, खिळ्याच्या मदतीनं काढण्यात आलेले डोळे, गळ्याजवळ बुटाचे डाग.. कानपूरमध्ये १० वर्षाच्या मुलाचा मृतदेह आढळून आल्यानं खळबळ माजली आहे. मुलासोबत करण्यात आलेलं दुष्कृत्य पाहून पोलीस कर्मचारीदेखील हादरले. मुलाचा मृतदेह पाहून स्थानिकांचा थरकाप उडाला.

१० वर्षांचा मुलगा दोन दिवसांपूर्वी बेपत्ता झाला होता. त्याचा मृतदेह मंगळवारी सापडला. मुलाची हत्या करणाऱ्यांनी त्यांचे अतिशय हाल केल्याचं मृतदेहाची अवस्था पाहून पोलिसांच्या लक्षात आलं. त्याच्या डोळ्याजवळ एक खिळा सापडला. त्याच खिळ्याचा वापर करून मुलाचा डोळा काढण्यात आल्याचा संशय पोलिसांना आहे. मुलाच्या मानेजवळ बुटांचे डाग आढळून आले. मुलाला बुटानं चिरडण्याचा प्रयत्न झाल्याची शक्यता पोलिसांनी बोलून दाखवली.

मुलाच्या मृतदेहाजवळ दोन ग्लास आणि दारूची बाटली आढळून आली. त्यामुळे आरोप दोन असावेत असा संशय पोलिसांना आहे. दारू पिऊन त्यांनी मुलाला निर्घृणपणे मारलं असावं असं पोलिसांनी सांगितलं. मुलाच्या चेहऱ्यावर सिगारेटचे डाग आहेत. हत्या करण्यात आल्यानंतर मुलाचा मृतदेह फरफटत नेण्यात आला. तशा खुणा घटनास्थळी दिसून आल्या आहेत. मृतदेहाच्या मागचा भाग काळा पडलेला आहे.

आरोपींनी खून करताना केलेला निर्घृणपणा पाहता त्यांच्या मनात मुलाबद्दल किती संताप, द्वेष होता ते दिसतं, असं कानपूर आऊटरचे एसपी अजित कुमार सिन्हा यांनी सांगितलं. आरोपींचा मुलावर इतका राग का होता, ते त्यांच्या अटकेनंतरच समजू शकेल. मुलाच्या मृतदेहाची अवस्था पाहून माझाही थरकाप उडाला, अंगावर काटा आला, असं सिन्हा म्हणाले. आरोपींचा शोध सुरू असून या प्रकरणात बेजबाबदारपणा दाखवणाऱ्या अधिकाऱ्यांवर कारवाई करण्यात येईल, अशी माहिती त्यांनी दिली.