शहरं
Join us  
Trending Stories
1
"जर सिंधु नदीचं पाणी रोखलं तर...": पाकिस्तानी PM शहबाज शरीफ यांची भारताला पोकळ धमकी
2
'सिंधूतून आमचे पाणी वाहणार, नाहीतर भारताचे रक्त'; पाणी रोखताच पाकचे माजी मंत्री बिलावल भुत्तोंचा थटथयाट
3
पहलगाम हल्ल्यात हिंदूच टार्गेट! आधी पॅन्ट काढल्या अन् 'खतना' न केलेल्यांचीच हत्या; तपास पथकाकडून मोठा खुलासा
4
JioHotstar नं केली बक्कळ कमाई, बनला जगातील दुसरा सर्वात मोठा पेड युजर बेस
5
दोन मित्र आणि पहारेकऱ्याची हत्या, मग कापलं गुप्तांग, आरोपी अटकेत, समोर आलं धक्कादायक कारण
6
शनी गोचर २०२५: 'या' ५ राशींच्या आयुष्यात वादळाची शक्यता, आर्थिक बाजू सांभाळा!
7
सूरज चव्हाणच्या 'झापुक झुपूक' सिनेमाने पहिल्या दिवशी किती कमावले? बॉक्स ऑफिस कलेक्शन समोर
8
पाकिस्तानचे लज्जास्पद कृत्य! उच्चायुक्तालयाबाहेर निदर्शने, अधिकाऱ्याचा हातवारे करुन इशारा; पाहून तुम्हालाही राग येईल
9
आस्ताद काळेने सांगितली 'छावा'मधली मोठी चूक, म्हणाला- "छत्रपती संभाजी महाराजांचा राज्याभिषेक..."
10
ड्रीम कारसाठी दहा वर्षे वाट पाहिली, शोरूममधून बाहेर पडताच तासाभरात जळून खाक झाली
11
'पाकिस्तानचे दोन तुकडे करा, पाकव्याप्त काश्मीर भारतात घ्या', काँग्रेसच्या मुख्यमंत्र्याची PM मोदींकडे मागणी
12
इंडियन बँक, महिंद्राच्या NBFC वर आरबीआयची मोठी कारवाई; लावला कोट्यवधींचा दंड, कारण काय?
13
मालेगावमध्ये ईडीचे छापे; जप्त केली बांगलादेशी रोहिंग्यांची बनावट कागदपत्रे आणि दाखले
14
Tarot Card: लहान मुलांप्रमाणे क्षणार्धात राग सोडून द्या, आनंदात राहाल; वाचा टॅरो भविष्य!
15
अनंत अंबानींकडे रिलायन्स इंडस्ट्रिजच्या एक्झिक्युटिव्ह डायरेक्टरपदाची जबाबदारी, कधीपासून सांभाळणार पदभार?
16
Pahalgam Terror Attack: लष्कराची मोठी कारवाई! आणखी दोन दहशतवाद्यांची घरे स्फोटके लावून पाडली
17
पाकिस्तानच्या नापाक कारवाया थांबत नाहीत, २४ तासांत दुसऱ्यांदा नियंत्रण रेषेवर गोळीबार, भारतीय सैन्याने दिले चोख प्रत्युत्तर
18
"विकी कौशलमुळे 'छावा' चालला असं नाही, तर...", महेश मांजरेकर स्पष्टच बोलले
19
"हे काही टीव्ही शोज नाहीयेत...", अभिनेत्री शिवानी सुर्वेनं प्रसारमाध्यमांना फटकारलं
20
EPFO नं केला मोठा बदल, जॉब बदल्यावर PF ट्रान्सफर करणं होणार सोपं; १.२५ कोटी लोकांना फायदा

कंगनाला कोर्टाने दिला दणका; जावेद अख्तर यांनी दाखल केलेल्या खटल्याप्रकरणी जामीनपात्र वॉरंट जारी 

By पूनम अपराज | Updated: March 1, 2021 14:47 IST

Andheri Court Issued Bailable Warrant to Kangana ranaut : समन्स बजावूनही ती हजर राहू शकली नाही, त्यानंतर अंधेरी महानगर दंडाधिकारी न्यायालयाने हे पुढचे पाऊल उचलले आहे. त्यामुळे कंगनाच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे. 

ठळक मुद्देवॉरंट जारी केल्यानंतर कोर्टात हजर असलेल्या कंगनाच्या वकिलाने वरच्या कोर्टात या वॉरंटला आव्हान देणार असल्याचं सांगितलं असून पुढील सुनावणी २६ मार्चला आहे.

मुंबई - ज्येष्ठ गीतकार जावेद अख्तर यांनी दाखल केलेल्या मानहानीच्या खटल्याप्रकरणी अभिनेत्री कंगना रनौत हिच्याविरोधात अंधेरी कोर्टाने यांनी जामीनपात्र वॉरंट जारी केले आहे. समन्स बजावूनही ती हजर राहू शकली नाही, त्यानंतर अंधेरी महानगर दंडाधिकारी न्यायालयाने हे पुढचे पाऊल उचलले आहे. त्यामुळे कंगनाच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे. 

 

अंधेरी कोर्टाने कंगना रनौत हिच्याविरूद्ध वॉरंट जारी केल्यानंतर कोर्टात हजर असलेल्या कंगनाच्या वकिलाने वरच्या कोर्टात या वॉरंटला आव्हान देणार असल्याचं सांगितलं असून पुढील सुनावणी २६ मार्चला आहे. गीतकार जावेद अख्तर यांनी केलेल्या फौजदारी मानहानी दाव्याप्रकरणी दंडाधिकारी न्यायालयाने बॉलिवूड अभिनेत्री कंगना रनौतला नोटीस बजावली होती. रिपब्लिक टीव्हीचे संपादक अर्णव गोस्वामी यांना घेतलेल्या एका मुलाखतीत जावेद अख्तर यांची बदनामी केल्याचे दाव्यात म्हटले आहे. दंडाधिकारी आर. आर. खान यांनी या प्रकरणी जुहू पोलिसांना चौकशी करून अहवाल सादर करण्याचे निर्देश दिले होते. पोलिसांनी त्यानुसार सोमवारी न्यायालयात अहवाल सादर केला. कंगनावर  केलेल्या आरोपांत तथ्य असल्याने आणखी तपास करावा लागेल, असे पोलिसांनी अहवालात म्हटल्याचे जावेद यांचे वकील कुमार भारद्वाज यांनी न्यायालयाला सांगितले होते.

 

कंगनाने काय म्हटले ?अख्तर यांनी केलेल्या दाव्यानुसार, कंगनाने अर्णव यांना दिलेल्या मुलाखतीत जावेद अख्तर हे बॉलिवूडमधील ‘सुसाईड गॅंग’मध्ये सहभागी होते. काहीही केले तरी ते मोकळे सुटू शकतात, असे म्हटले आहे. तिच्या या आरोपांमुळे जावेद यांची प्रतिमा मलिन झाली असा आराेप त्यांनी केला आहे. यू-ट्यूबवर ही क्लिप खूप पसरली, असा युक्तिवाद भारद्वाज यांनी केला होता. समन्स बजावूनही उत्तर नाहीकंगनाची चौकशी करण्यासाठी पोलीस तिला वारंवार समन्स बजावत होते. परंतु, ती त्याला उत्तर देत नाही, अशी माहिती भारद्वाज यांनी दंडाधिकाऱ्यांना दिली होती. त्यांचा युक्तिवाद ऐकल्यावर न्यायालयाने कंगनाला नोटीस बजावली होती. १ मार्चपर्यंत न्यायालयात उपस्थित राहण्याचे निर्देश न्यायालयाने कंगनाला देण्यात आले होते.

 

 

 

टॅग्स :Kangana Ranautकंगना राणौतJaved Akhtarजावेद अख्तरAndheriअंधेरीCourtन्यायालय