शहरं
Join us  
Trending Stories
1
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
2
मुंबईत स्वस्तात मिळणार घरे, २८ एकरात उभी राहणार नवी टाउनशिप; मध्यमवर्गीयांसाठी सरकारचं 'गिफ्ट'
3
PBKS vs SRH : कोण आहे Praful Hinge? ईशान किशनच्या कॅप्टन्सीत विदर्भकराला मिळाली पदार्पणाची संधी
4
आता तुमच्या सुट्ट्या वाया जाणार नाहीत! उरलेल्या सुट्ट्यांच्या मोबदल्यात मिळणार पैसा; नव्या कामगार कायद्यात काय?
5
बापरे! फ्रीडायव्हिंग करताना शार्कनं जबड्यात पकडला पाय; अंगाचा थरकाप उडवणारा व्हिडिओ
6
मोबाईल विकला अन् बँक खाते रिकामे झाले? कानपूर पोलिसांनी उघडले सायबर गुन्हेगारीचे नवीन रॅकेट
7
डोसा प्रकरणात नवा ट्विस्ट, आजी-आजोबांवर संशय; २ मुलींच्या वडिलांनी पोलिसांना काय सांगितलं?
8
“शालेय वाहतूक अधिक सुरक्षित, पारदर्शक, उत्तरदायी करण्यास सरकार कटिबद्ध”: प्रताप सरनाईक
9
एकोणीसाव्यांदा डिविडंड देणार ही कंपनी; यावेळी होणार १ शेअरवर ३० रुपयांचा फायदा, तुमच्याकडे आहे का स्टॉक?
10
धक्कादायक! कोणीही मुली देईना, मच्छरांच्या त्रासामुळे 'या' गावातील मुलांचं लग्नच जमेना
11
ना तेल घेतलं, ना गॅस..तरीही भारताने मित्राला बनवलं मालामाल; संरक्षण क्षेत्रात आणखी एक कमाल
12
'अटी मान्य करा, नाहीतर चर्चा विसरा'; इराणच्या शिष्टमंडळाचा अमेरिकेला सज्जड दम
13
Viral Video: बाल्कनीतून उडी मार, मी झेलतो! लाईक्ससाठी चिमुरड्याचा जीव धोक्यात, व्हिडीओ पाहून संतापले लोक
14
जखमी चेहरा अन् एक पाय गमावला...; इराणी सर्वोच्च नेते मोजतबा खामेनेई यांच्याबाबत नवा खुलासा
15
कोट्यवधींचं घबाड! १८ प्लॉट्स, लक्झरी कार, ६ किलो सोनं, ५ किलो चांदी; इंजिनिअरकडे पैसाच पैसा
16
'शांतीदूत' बनल्याने पाकिस्तानचे पाप धुवून निघणार नाही! शशी थरूर यांची शेजारी राष्ट्रावर सडकून टीका
17
“अजिबात सोपे नाही, पण काही होऊ दे, होर्मुझ जलमार्ग सुरू करणारच”; डोनाल्ड ट्रम्प यांचा निर्धार
18
हॉस्पिटलचं बिल कमी होणार? IRDAI नं बनवली एक सब कमिटी, काय असेल याचं काम?
19
'त्याच्याशीच लग्न करेन' म्हणत तरुणी अडून बसली; पोलिसांनी बोलावले तरीही घरच्यांनी दिला नकार अन् घडला थरार
20
मृणाल ठाकूरची इंडस्ट्रीतली सर्वात जवळची मैत्रीण कोण? 'या' अभिनेत्रीचं घेतलं नाव, म्हणाली...
Daily Top 2Weekly Top 5

काम होने दो, बडी रक्कम मिलेगी; शुटर्सना ऑफर; सिद्दिकींचा फोटो आणि फ्लेक्सही दिला

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 15, 2024 10:42 IST

हत्येचा कट शिजल्यानंतर शिवकुमारला मुंबईत जाऊन कुर्ला भागात भाड्याने घर शोधण्याची जबाबदारी दिली. शिवकुमारने मुंबईत येत कुर्ला परिसरात फिरून दलालाच्या मदतीने पोलिस पटेल चाळीत घर शोधले.

मुंबई : बाबा सिद्दिकी हत्येप्रकरणी गुन्हे शाखेने अटक केलेल्या गुरुमेल सिंग आणि धर्मराज कश्यपच्या चौकशीत त्यांना ठरावीक रक्कम न ठरवता थेट, “काम होने दो, बडी अमाउंट मिलेगी” असे सांगितल्याचे समोर आले आहे. त्यानुसार, त्यांना बाबा सिद्दिकी यांचा फोटो आणि फ्लेक्सही देण्यात आला होता, अशी माहिती सूत्रांनी दिली.   

हत्येचा कट शिजल्यानंतर शिवकुमारला मुंबईत जाऊन कुर्ला भागात भाड्याने घर शोधण्याची जबाबदारी दिली. शिवकुमारने मुंबईत येत कुर्ला परिसरात फिरून दलालाच्या मदतीने पोलिस पटेल चाळीत घर शोधले. त्यानंतर सप्टेंबरपासून तो राहायला आला. त्यापाठोपाठ कश्यप आणि काही दिवसाने गुरुमेल त्याच्याकडे राहायला आला. यामध्ये गुरुमेल आणि शिवकुमारकडे गोळीबार करण्याची जबाबदारी होती, तर कश्यपकडे गोळीबार केल्यानंतर खाज येणारा स्प्रे मारण्याची जबाबदारी होती, अशी माहिती तपासातून पुढे आली आहे. 

७ फुटांवरून गोळीबारबाबा सिद्दिकी मुलाच्या कार्यालयातून बाहेर येताच सहा ते सात फुटांच्या अंतरावरून शिवकुमारने अंदाधुंद गोळीबार केला. यापैकी तीन गोळ्या सिद्दिकी यांना लागल्या, तर एक गोळी विसर्जन मिरवणुकीतील एकाला लागली. 

एकूण सहा गोळ्या झाडण्यात आल्याचे तपासात समोर आले. गोळीबारानंतर कश्यपने स्प्रे मारल्याचे पोलिसांना सांगितले. मात्र, ते अंतर लांब असल्याने त्याचा जास्त कुणाला त्रास झाला नाही. दिले होते फक्त लक्ष्य- आरोपींना फक्त टार्गेट दिले होते. मात्र, ते कशासाठी आणि मुख्य सूत्रधार कोण आहे? याबाबत काहीही माहिती नसल्याचे त्यांनी गुन्हे शाखेला सांगितले आहे. - याबाबत त्यांच्याकडे कसून चौकशी सुरू आहे. दुसरीकडे, प्रवीण लोणकरला जबाबदारी कोणी दिली, याबाबत अधिक तपास सुरू आहे. - या आरोपींच्या रडारवर आणखी कोणी होते का? याबाबतही अधिक तपास सुरू आहे.  

टॅग्स :Baba Siddiqueबाबा सिद्दिकीCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिस