शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तान एलओसीवर मोठ्या प्रमाणावर शस्त्रास्त्रे जमवू लागला; भारताची तयारी काय...
2
Pahalgam Terror Attack: सरकारने पाकिस्तानला सडेतोड उत्तर द्यावं, पण कुठलाही निर्णय घेताना...; शरद पवार यांनी मांडले स्पष्ट मत
3
शरद पवारांच्या विधानावर CM फडणवीसांचं प्रत्युत्तर, म्हणाले- "ज्यांचे आप्तेष्ट मारले गेले..."
4
पर्यटकांना वाचवताना जीव गमावला; काश्मिरी युवकाच्या कुटुंबाला DCM शिंदेकडून ५ लाखांची मदत
5
अटारी जोधपूरपासून ९०० किमी दूर, ४८ तासांत कसे जाणार? पाकिस्तानात दिलेल्या महिला भारतात माहेरी आलेल्या
6
शनिवारी शिवरात्रि स्वामी पुण्यतिथी: ५ राशींनी ‘हे’ करा, साडेसातीत दिलासा; शनिची कायम कृपा!
7
मारुती सुझुकीला मोठा धक्का! सर्वाधिक गाड्या विकूनही तोटा, नेमकं काय आहे कारण?
8
Swami Samartha: स्वामीकृपा झाल्यावर आपल्या आयुष्यात 'हे' बदल घडतात; तुम्हीदेखील अनुभवले का?
9
भारताच्या कारवाईने पाक सैन्य घाबरले; लष्करप्रमुखाचे कुटुंब खाजगी विमानाने देश सोडून पळाले
10
स्वामी पुण्यतिथी शिवरात्रि एकाच दिवशी: शिवकृपा, गुरुबळ लाभण्याची सुवर्ण संधी; ‘असे’ करा व्रत
11
पाकिस्तानविरोधात भारताची मोठी कारवाई! गृहमंत्री अमित शाहांचे सर्व मुख्यमंत्र्यांना 'हे' निर्देश...
12
दिवसभर उड्या मारतात, एका जागी बसतंच नाहीत... हायपर एक्टिव्ह मुलांशी नेमकं वागायचं तरी कसं?
13
ऐतिहासिक कामगिरीच्या उंबरठ्यावर सीएसकेचा कर्णधार महेंद्रसिंह धोनी, एलिट लिस्टमध्ये सामील होणार
14
'ते पुन्हा एकत्र येण्याची सध्या कुठलीही परिस्थिती नाही'; CM फडणवीसांचं पवार, ठाकरे बंधूंबद्दल राजकीय भाष्य
15
स्मरण दिन: स्वामींचे स्वप्नात दर्शन झाले? काय असू शकतात संकेत? जाणून घ्या नेमका अर्थ...
16
पहलगाम हल्ल्याचा बाजारावरही परिणाम; ९ लाख कोटींचे नुकसान, अदानी पोर्टसह 'हे' शेअर्स आपटले
17
पीएसएलमध्ये काम करणाऱ्या सर्व भारतीयांना ४८ तासांत पाकिस्तान सोडण्याचे आदेश!
18
पंचग्रही ३ राजयोगात स्वामींची पुण्यतिथी: १० राशींना वरदान, लाभच लाभ; बक्कळ पैसा, असीम कृपा!
19
१ वर्ष एटीएम कार्ड वापरण्यासाठी बँक किती चार्ज घेते? 'या' कार्डवर द्यावे लागत नाही पैसे
20
अमित शाहांची सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांसोबत बैठक, पाकिस्तानी नागरिकांबद्दल दिला महत्त्वाचा आदेश

सांग ना आई, माझे काय चुकले?; कदाचित 'त्या' निष्पाप जिवाचा अखेरचा प्रश्न असावा

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 23, 2023 07:05 IST

माता होती तणावात, पहिल्या बाळाच्या मृत्यूमुळे आजोबांना धक्का

मुंबई - श्वसननलिकेत दूध अडकल्याने अवघ्या आठ महिन्यांच्या चिमुकल्याने आईच्या मांडीवर प्राण सोडला. नातवाच्या मृत्यूचा धक्का आजोबा पचवू शकले नाहीत. हृदयविकाराच्या झटक्याने तेही गेले. लागोपाठ दोन आघातांनी शहा कुटुंब कोलमडून गेले. मात्र, हाश्वीच्या आगमनाने पुन्हा त्यांच्या चेहऱ्यावर हसू फुलले. नियतीला मात्र हे मान्य नसावे. म्हणूनच आठ महिन्यांचे बाळ आणि त्यापाठोपाठ वडील यांच्या अकाली जाण्याने खचून गेलेल्या आणि मानसिक तणावात असलेल्या मनालीने अवघ्या ३९ दिवसांच्या हाश्वीला १४व्या मजल्यावरून फेकून दिले. आई माझे काय चुकले, हाच कदाचित त्या निष्पाप जिवाचा अखेरचा प्रश्न असावा...

मुलुंड पोलिस ठाण्याच्या महिला उपनिरीक्षक राणी बाळू कुताळ (३३) यांच्या फिर्यादीवरून पोलिसांनी मनाली मेहता या महिलेविरोधात गुन्हा नोंदवला आहे. गुरुवारी, २१ सप्टेंबर रोजी सकाळी मुलुंड येथील नीळकंठ तीर्थ इमारतीच्या १४ व्या मजल्यावरून फेकून देत मुलीची हत्या केल्याची हृदयद्रावक घटना घडली. मुलीचे मामा जेनिल शहा (३५) यांनी दिलेल्या जबाबानुसार, बहीण मनालीचा नोव्हेंबर २०२० रोजी संकितसोबत विवाह झाला. दोघेही जन्मापासून मूकबधिर आहेत. विवाहानंतर मनाली सुरत येथे राहण्यास गेली. 

‘ती’ त्यांचीच भाची निघाली...गुरुवारी सकाळी साडेसहाच्या सुमारास ओरडण्याचा आवाज आला.  आईकडून बाळ गायब असल्याचे समजले. घरात शोध घेतला, मात्र हाश्वी सापडली नाही. काही वेळाने सोसायटीच्या सुरक्षारक्षकाने  योगेश बिल्डिंगच्या आवारात एक लहान बाळ पडल्याचे सांगितले. त्यांनी घटनास्थळी धाव घेतली असता ती आपलीच भाची असल्याचे समजताच जेनिल शहा यांना धक्का बसला. मुलाचे निधन झाल्याच्या तणावात वडिलांचेही निधन झाले त्यामुळे मनाली तणावात होती. यातूनच तिने बाळाला फेकल्याचा संशय त्यांनी वर्तवला आहे. याप्रकरणी मुलुंड पोलिस अधिक तपास करत आहेत.

पुत्ररत्न प्राप्तीचा आनंद अल्पकाळ टिकला नोव्हेंबर, २०२१ मध्ये तिला पुत्ररत्न प्राप्त झाले. परंतु जुलै, २०२२ मध्ये त्या चिमुकल्याचा दुर्दैवी अंत झाला. तान्हुल्याचा मनालीचे वडील विनय शहा यांना लळा होता. मात्र, त्याच्या अचानक जाण्याने विनय शहा खचून गेले. त्यातच त्यांचा गेल्या वर्षी डिसेंबरमध्ये हृदयविकाराच्या धक्क्याने निधन झाले. तेव्हापासून मनाली मानसिक तणावात होती.  

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारी