शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
2
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
3
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
4
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
5
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
6
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
7
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
8
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
9
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
10
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
11
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
12
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
13
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
14
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
15
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
16
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
17
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
18
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
19
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
20
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
Daily Top 2Weekly Top 5

नागपुरात नोकरीचे आमिष दाखवून फसवणूक : १७ बेरोजगारांना २८ लाखांचा गंडा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 4, 2020 20:36 IST

रेल्वेत नोकरी लावून देण्याचे आमिष दाखवून एका भामट्याने तब्बल १७ बेरोजगार तसेच त्यांच्या पालकांची फसवणूक केली.

ठळक मुद्देमेयो, मेडिकलमधून वैद्यकीय तपासणीही करून घेतली : सोनेगाव ठाण्यात गुन्हा दाखल

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : रेल्वेतनोकरी लावून देण्याचे आमिष दाखवून एका भामट्याने तब्बल १७ बेरोजगार तसेच त्यांच्या पालकांची फसवणूक केली. नीलेश अग्रवाल ऊर्फ तिजारे (वय ४०) असे आरोपीचे नाव आहे. फसगत झालेल्यांनी पोलिसांकडे धाव घेतल्याने गेल्या अडीच वर्षांपासून सुरू असलेल्या त्याच्या या ठगबाजीचा सोमवारी भंडाफोड झाला.ठगबाज अग्रवाल ऊर्फ तिजारे सोनेगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीतील मेपललिफ होम, इंजिनिअर को-ऑप सोसायटी, सोमलवाडा येथे राहतो. रेल्वे खात्याशी कसलाही संबंध नसताना ठगबाज अग्रवाल ऊर्फ तिजारे स्वत:ला रेल्वेतील वरिष्ठ अधिकाऱ्यांचा खास माणूस आहो, असे सांगत होता. आपले अनेक वरिष्ठांशी घनिष्ट संबंध असल्यामुळे आपण रेल्वेत सहज नोकरी लावून देतो, अशी थाप तो मारत होता. त्याच्या या थापेबाजीत १२ सप्टेंबर २०१७ ला पवनकुमार गिरिराम शिव (वय २९, रा. गवळीबाबानगर, खरबी) हा अडकला. त्याने नोकरीच्या आशेने आरोपी अग्रवाल ऊर्फ तिजारेला ५० हजार रुपये दिले. त्याच्यासारखेच नंतर अनेक तरुण आरोपीच्या जाळ्यात अडकले. प्रत्येकाकडून आरोपी अग्रवालने वेगवेगळी रक्कम घेतली. १२ सप्टेंबर २०१७ ते १५ नोव्हेंबर २०१९ या कालावधीत तब्बल १७ लोकांना त्याने गंडा घातला. सर्वांकडून एकूण २८ लाख, १० हजार रुपये अग्रवालने हडपले.विशेष म्हणजे, आरोपीने उपरोक्त पीडितांची मेयो आणि मेडिकलमधून वैद्यकीय तपासणी करून घेतली. त्यांची शैक्षणिक कागदपत्रेही घेतली. नंतर नियुक्तीपत्र देण्याची थाप मारून तो टाळाटाळ करू लागला. प्रत्येकवेळी वेगवेगळे कारण तो टाळत असल्याचे लक्षात आल्यामुळे काहींना त्याचा संशय आला. त्यामुळे त्यांनी रेल्वे अधिकाऱ्यांशी संपर्क करून त्यांना विचारणा केली असता ठगबाज अग्रवाल ऊर्फ तिजारेसोबत रेल्वे विभागाचा अथवा अधिकाऱ्यांचा कसलाही संबंध नसल्याचे स्पष्ट झाले.आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर पीडितांनी ठगबाज अग्रवालकडे रक्कम परत मागण्यासाठी तगादा लावला. प्रत्येकाला वेगळी तारीख सांगून तो परत पाठवू लागला. पहिल्याला रक्कम देण्यासाठी तो दुसरे नवीन सावज शोधत होता. तो रक्कम परत करणार नाही उलट दुसºया अनेकांची फसवणूक करीत असल्याचे लक्षात आल्याने पीडितांनी सोनेगाव ठाण्यात संपर्क केला. सोमवारी या प्रकरणी गुन्हा दाखल करून पोलिसांनी ठगबाज अग्रवाल ऊर्फ तिजारेला अटक केली. त्याने अशा प्रकारे आणखी अनेकांना गंडा घातल्याचा संशय ठाणेदार मनोहर कोटनाके यांनी व्यक्त केला. चौकशीत काय ते पुढे येईल, असे ते म्हणाले.आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर पीडितांनी ठगबाज अग्रवालकडे रक्कम परत मागण्यासाठी तगादा लावला. प्रत्येकाला वेगळी तारीख सांगून तो परत पाठवू लागला. पहिल्याला रक्कम देण्यासाठी तो दुसरे नवीन सावज शोधत होता. तो रक्कम परत करणार नाही उलट दुसऱ्या अनेकांची फसवणूक करीत असल्याचे लक्षात आल्याने पीडितांनी सोनेगाव ठाण्यात संपर्क केला. सोमवारी या प्रकरणी गुन्हा दाखल करून पोलिसांनी ठगबाज अग्रवाल ऊर्फ तिजारेला अटक केली. त्याने अशा प्रकारे आणखी अनेकांना गंडा घातल्याचा संशय ठाणेदार मनोहर कोटनाके यांनी व्यक्त केला. चौकशीत काय ते पुढे येईल, असे ते म्हणाले.

टॅग्स :fraudधोकेबाजीUnemploymentबेरोजगारीjobनोकरीrailwayरेल्वे