शहरं
Join us  
Trending Stories
1
‘पीओके’मधील दहशतवादी नेटवर्कवर भारत करणार प्रहार; उच्चस्तरीय विचारविनिमय सुरू; ४२ सक्रिय दहशतवादी तळ केंद्राच्या रडारवर
2
आजचे राशीभविष्य, २९ एप्रिल २०२५: सार्वजनिक क्षेत्रात मानहानी होण्याची शक्यता
3
तीन देशांत एकाच वेळी वीज गायब; सर्व काही थांबले; देशभरातील वाहतूक सिग्नलवर परिणाम
4
१६ पाकिस्तानी यूट्युब चॅनेलवर सरकारची बंदी; केंद्रीय गृहमंत्रालयाच्या शिफारशींनुसार बंदी
5
त्यांची जबाबदारी माझ्यावर होती, मी माफी कशी मागू, शब्द नाहीत; मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनी दिली कबुली
6
नौदलाच्या ताफ्यात येणार फ्रान्सची २६ राफेल विमाने; ६४ हजार कोटींच्या खरेदी करारावर देशांच्या स्वाक्षऱ्या
7
गूढ कायम.. खरं, खोट्याचा होईना उलगडा; डॉ. वळसंगकरांच्या आत्महत्येला दहा दिवस ओलांडले
8
‘म्हाडा’चे ५ हजार घरांचे दिवाळी गिफ्ट; जुन्या इमारतीचाही पुनर्विकास होणार
9
१९ चाळींचा पुनर्विकास एमएमआरडीए करणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण निर्णय
10
‘लिव्ह इन’, उत्तराखंड आणि समान नागरी संहिता
11
बुलेट ट्रेन २०२८ अखेरीस मुंबईतून धावणार सुसाट, नवी मुंबई विमानतळ गेम चेंजर ; मुख्यमंत्री फडणवीस
12
मुलांचा ताबा देताना धर्म विचारात घेतला जाऊ शकत नाही : हायकोर्ट
13
कान टोचले, बरे झाले ! केंद्राने विशेष पत्रक काढून माध्यमांना काही मार्गदर्शक सूचना दिल्या
14
पाण्यासाठी भारत-पाक युद्ध पेटण्याची वेळ येऊन ठेपली ?
15
मोठमोठे रस्ते बांधत आहात, इकडे लाेकांचा जीव जाताेय; जखमींवर कॅशलेस उपचारांवरून सर्वाेच्च न्यायालयाने केंद्राला फटकारले
16
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
17
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
18
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा

अज्ञातांकडून जिओची फसवणूक, ग्राहकांची साडेनऊ लाखांची रक्कम हडपली

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 16, 2020 06:53 IST

जानेवारी महिन्यापासून मोबाइल टॉवर बसवण्याच्या बहाण्याने, नोकर भरतीच्या बहाण्याने, फायबर इंटरनेट जोडणीसाठी तसेच इतर व्यवसायांची जाहिरातबाजी या बनावट वेबसाइटवर करण्यात आली होती.

नवी मुंबई : अज्ञात व्यक्तींकडून रिलायन्स जिओ कंपनीच्या बनावट २१ वेबसाइट तयार करून त्यावर जाहिराती प्रसिद्ध केल्या होत्या. त्यासाठी संपर्क साधणाऱ्यांकडून पैसे घेऊन त्यांची फसवणूक केली. या प्रकरणी रिलायन्स जिओ कंपनीतर्फे पोलिसांकडे तक्रार करण्यात आली .जानेवारी महिन्यापासून मोबाइल टॉवर बसवण्याच्या बहाण्याने, नोकर भरतीच्या बहाण्याने, फायबर इंटरनेट जोडणीसाठी तसेच इतर व्यवसायांची जाहिरातबाजी या बनावट वेबसाइटवर करण्यात आली होती. ते पाहून जे नागरिक संबंधित मोबाइल नंबरवर संपर्क साधत होते, त्यांना रिलायन्स जिओचे कर्मचारी असल्याचे सांगत ५०० ते ५० हजार रुपयांपर्यंतची रक्कम डिपॉझिट ठेवण्यास सांगितले जात होते. तसेच नफ्याच्या स्वरूपात २५ लाखांचे डिपॉझिट व २५ हजारपर्यंतचे महिना भाडे देण्याचे आमिष दाखवले. पैसे घेतल्यानंतर संबंधितांकडून प्रतिसाद मिळणे बंद झाल्यानंतर फसवणूक झाल्याचे नागरिकांच्या लक्षात आले.यानुसार अनेकांकडून रिलायन्स जिओकडे सतत तक्रारी प्राप्त होत होत्या. त्यामुळे कंपनीकडून चौकशी करण्यात आली. तेव्हा अज्ञात व्यक्तींनी रिलायन्स जिओच्या २१ बनावट वेबसाइट तयार करून, त्यावर फसव्या जाहिराती केल्याचे समोर आले. त्यांनी ९ लाख ४४ हजार रुपयांची फसवणूक केल्याचे समोर आले आहे. हा आकडा वाढण्याची शक्यता वर्तवली आहे.या प्रकरणी कंपनीचे सिक्युरिटी लॉस अ‍ॅण्ड प्रिव्हेन्शन विभागाचे उपव्यवस्थापक सुधीर नायर यांनी रबाळे एमआयडीसी पोलिसांकडे तक्रार केली आहे. त्यानुसार अज्ञात व्यक्तींविरोधात माहिती तंत्रज्ञान कायद्यांतर्गत गुन्हा दाखल केला. 

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीNavi Mumbaiनवी मुंबई