शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
2
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
3
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
4
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
5
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
6
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
7
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
8
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
9
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
10
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
11
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
12
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
13
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
14
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
15
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
16
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
17
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
18
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
19
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
20
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
Daily Top 2Weekly Top 5

प्रियकरासाठी घर सोडलं, प्रेमविवाह केला; गर्भवती राहिल्यावर 'तो' दुसऱ्या मुलीसोबत पळून गेला...

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 28, 2023 19:28 IST

पळून जाऊन लग्न केल्यामुळे आई-वडील रागावले आहेत. तर सासरचे लोकही तिला साथ देत नाहीत.

झाशीमध्ये एक धक्कादायक घटना घडली आहे. एका तरुणीने आपल्या प्रेमासाठी घरदार आणि शहर सोडलं. ती तिच्या प्रियकरासोबत राहू लागली आणि नंतर तरुणीने त्याच्याशी लग्न केलं. मात्र त्याने आता तिची मोठी फसवणूक केली आहे. लग्नानंतर तरुणी गरोदर राहिली. याच दरम्यान तिचा नवरा दुसऱ्या मुलीसोबत पळून गेला. आता तरुणीने त्याच्यावर गंभीर आरोप केले आहेत.

एरच पोलीस स्टेशन परिसरात राहणाऱ्या एका तरुणीची तिच्या प्रियकराने फसवणूक केली. तरुणीने दिलेल्या माहितीनुसार, तिचे पुष्पेंद्र अहिरवार नावाच्या तरुणासोबत प्रेमसंबंध होते. घरच्यांना लग्नाबाबत सांगितलं, पण त्यांना लग्न मान्य नव्हतं. यानंतर त्यांनी पळून जाऊन लग्न करण्याचा निर्णय घेतला. दोन वर्षांपूर्वी कानपूरच्या आर्य समाज मंदिरात लग्न झाले. सुरुवातीला सर्व काही ठीक चालले होते.

लग्नानंतर दोघेही आनंदात राहत असल्याचे तिने सांगितलं. आधी बनारसमध्ये राहिलो आणि नंतर नोएडामध्ये राहू लागलो. यानंतर ते झाशीतील मौरानीपूर येथे भाड्याच्या घरात राहत होते. येथे दोघांमध्ये वाद सुरू झाले. तरुणीने सांगितलं की, तिचा नवरा तिला त्रास देऊ लागला. तो रोज भांडू लागला, मारू लागला. सात महिन्यांपूर्वी वाद झाला होता. 

नवऱ्याने तिला टेरेसवरून खाली फेकलं होतं. यामुळे पाठीचा कणा तुटला होता. याच दरम्यान ती गरोदर राहिली, मात्र त्यांच्यातील वाद वाढतच गेला. पती दुसऱ्या मुलीच्या संपर्कात आला. त्यानंतर संधी साधून तो दुसऱ्या मुलीसोबत पळून गेला. आता तरुणी एकटी राहिली आहे. पळून जाऊन लग्न केल्यामुळे आई-वडील रागावले आहेत. तर सासरचे लोकही तिला साथ देत नाहीत. 

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारी