शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
2
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
3
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
4
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
5
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
6
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
7
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
8
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
9
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
10
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
11
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
12
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
13
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
14
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
15
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
16
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
17
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
18
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
19
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
20
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
Daily Top 2Weekly Top 5

महिलेला चाकूचा धाक दाखवून सव्वा लाखाचे दागिने लंपास

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 10, 2021 22:20 IST

भागवतराव गायकवाड हे  छाजेड नगरात वास्तव्यास आहेत.  बुधवारी पहाटे घराच्या मागील बाजूने दोन चोरट्यांनी घरात प्रवेश केला.  गायकवाड यांच्या पत्नी भारती यांना चाकूचा धाक दाखवून दागिने व पैशाची मागणी केली. 

जामनेर जि. जळगाव : अज्ञात चोरट्यांनी घरात घुसून महिलेला चाकूचा धाक दाखवित तब्बल १ लाख १६ हजारांचे दागिने लंपास केल्याची घटना बुधवारी पहाटे साडेतीन वाजता पहूर ता.जामनेर येथील  महेश छाजेड नगरात घडली. 

भागवतराव गायकवाड हे  छाजेड नगरात वास्तव्यास आहेत.  बुधवारी पहाटे घराच्या मागील बाजूने दोन चोरट्यांनी घरात प्रवेश केला.  गायकवाड यांच्या पत्नी भारती यांना चाकूचा धाक दाखवून दागिने व पैशाची मागणी केली. संबंधित महिला घाबरल्याने किचन ओट्याखाली ठेवलेला डबा चोरट्यांना दिला. यातील ३ ग्रॅम वजनाचे १२ हजार किमतीचे डोरले, २४ हजार किमतीचे सहा ग्रॅमचे पदक, १६ हजार रुपयांचे चार ग्रॅम वजनाचे वेल, ४० हजारांचा दहा ग्रॅम वजनाचा नेकलेस, दोन ग्रॅम वजनाचे आठ हजार किमतीच्या दोन नथ असे एक लाख सोळा हजार वजनाच्या सोन्याचे दागिने लंपास केले.

याप्रकरणी भारतीबाई गायकवाड यांच्या फिर्यादीवरून दोन  चोरट्यांविरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.घटनेनंतर महिला बेशुद्ध चोरट्यांनी पळ काढल्यानंतर महिला घाबरल्याने बेशुद्ध स्थितीत पडून होती. सकाळी पती उठल्यावर हा प्रकार उघडकीस आला.

पोलीस कर्मचारी संख्या कमी असल्याने घडलेल्या घटनांचा तपास उघडकीस येण्यासाठी अडचणी येत आहेत. पोलिसांची रिक्त पदे भरण्यासाठी व नवीन वाहन मिळण्याकरिता वरिष्ठस्तरावर पाठपुरावा करणार आहोत.- भारत काकडे, डीवायएसपी, जामनेर

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारी