शहरं
Join us  
Trending Stories
1
Video - अग्निकल्लोळ! गुजरातच्या संघवी ऑर्गेनिक्स फॅक्ट्रीमध्ये भीषण आग, धुराचं साम्राज्य
2
टीम इंडियाला धक्का! पाकिस्तानविरूद्धच्या सामन्याआधी शुबमन गिलच्या हाताला दुखापत, अपडेट काय?
3
निष्काळजीपणाचा कळस! सरकारी शाळेत मध्यान्ह भोजन खाल्ल्यानंतर ९० मुलं पडली आजारी
4
शेतकऱ्यांनो, दिवाळीआधी PM किसानचा २१वा हप्ता येणार का? वाचा कधी जमा होणार पैसे?
5
Mumbai: विरार- दादर लोकलच्या दरवाज्यात मनोरूग्णाचा धुडगूस, महिलांच्या सुरक्षिततेचा प्रश्‍न ऐरणीवर
6
GST कपातीनंतर ५, १०, २० रुपयांच्या बिस्किट, चिप्सची किंमतही घटणार की…?, कंपन्यांनी दिली अशी माहिती  
7
लोकप्रिय 'दामिनी' मालिका पुन्हा येतेय प्रेक्षकांच्या भेटीला, ही अभिनेत्री मुख्य भूमिकेत, या चॅनेलवर होणार प्रसारण
8
चालकाचं नियंत्रण सुटलं अन् कार थेट उड्डाणपुलावरून खाली रेल्वे रुळावर पडली!
9
निम्न तेरणा प्रकल्पातून ७६३६ क्युसेक पाण्याचा विसर्ग, नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा
10
'चुल्लूभर पानी में डूब मरो...' भारत-पाकिस्तान क्रिकेट सामन्यावरून ओवैसी भाजपवर संतापले!
11
नफा वाढूनही फ्लिपकार्टला ५,१८९ कोटी रुपयांचा तोटा! एक निर्णय कंपनीच्या अंगलट?
12
खूशखबर! Instagram ची मोठी घोषणा; आता पटापट वाढेल रीच, पोस्ट करा अनलिमिटेड स्टोरी
13
‘सॉरी... आम्ही हे जग सोडतोय’, CA च्या पत्नीनं मुलासह १३ व्या मजल्यावरून मारली उडी, समोर आलं धक्कादायक कारण
14
पंजाब की शेरनी! चालत्या ऑटोमध्ये चोरांशी लढली, जीव धोक्यात घालून मदत मागितली अन्...
15
Pakistan: पाकिस्तानात दहशतवाद्यांच्या हल्ल्यात १९ सैनिकांचा मृत्यू; ४५ दहशतवाद्यांचा खात्मा
16
सूर्या, पांड्या की आफ्रिदी... IND vs PAK सामन्यात 'हे' १० खेळाडू ठरू शकतात 'गेमचेंजर'
17
'दशावतार' सिनेमासाठी रजनीकांतचा झालेला विचार? दिग्दर्शक म्हणाले- "दिलीप प्रभावळकरांनी नकार दिला असता तर..."
18
युपीआय व्यवहारांच्या नियमांत मोठे बदल; विमा, गुंतवणूक, क्रेडिट कार्ड पेमेंटसाठी मर्यादा वाढली
19
Dashavtar: दिलीप प्रभावळकरांच्या 'दशावतार'ने मनं जिंकली; दुसऱ्या दिवशी कमावले तब्बल 'इतके' कोटी
20
गुन्हेगारी पार्श्वभूमी, तुरुंगवास आणि..., कोण आहे टॉमी रॉबिन्सन, ज्याच्या आवाहनानंतर लंडनमध्ये निघाला लाखोंचा मोर्चा

रुग्णालयातून पळविले कोरोनाग्रस्ताच्या मुलाचे दागिने, पैसे; आरोपीला अटक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 12, 2020 02:35 IST

आसिफ इद्रीस पठाण (३०) असे अटक आरोपीचे नाव असून, त्याचा ३० हून अधिक गुन्ह्यांत सहभाग असल्याचे समोर आले.

मुंबई : मालाडच्या नामांकित रुग्णालयातून वृद्ध कोरोना रुग्णाच्या मुलाचे ८० हजार रुपये, तसेच दागिने पळवण्यात आले. या प्रकरणी गुन्हे शाखेने तपासाअंती आरोपीला अटक केली.

आसिफ इद्रीस पठाण (३०) असे अटक आरोपीचे नाव असून, त्याचा ३० हून अधिक गुन्ह्यांत सहभाग असल्याचे समोर आले. यातील १६ गुन्ह्यांत त्याला शिक्षाही झाली. तक्रारदाराच्या वडिलांना कोरोना झाल्यामुळे ४ आॅक्टोबरला त्यांना मालाड पूर्वेकडील नामांकित रुग्णालयात दाखल करण्यात आले. ८० हजार रुपयांसह मोबाइल, आणि कागदपत्रे एका बॅगत ठेवून तक्रारदार मुलगा रात्री रुग्णालयाच्या प्रतीक्षागृहात झोपला. त्याच दरम्यान त्यांची बॅग पळवण्यात आली. शोधाशोध करूनही ती न सापडल्याने अखेर मुलाने दिंडोशी पोलीस ठाण्यात तक्रार दिली.

पोलीस उपायुक्त अकबर पठाण, सहायक पोलीस आयुक्त अविनाश शिंगटे यांच्या मार्गदर्शनाखाली प्रभारी पोलीस निरीक्षक महेश तावडे, तपास अधिकारी सचिन गवस, अतुल डहाके विक्रमसिंह कदम, अतुल आव्हाड, आशिष शेळके हरीश पोळ, हेमंत गीते आणि अंमलदार यांनी या प्रकरणी तपास सुरू केला. सीसीटीव्ही फुटेजमध्ये संशयास्पद व्यक्ती बाहेर जाताना, तसेच पुढे एका रिक्षात बसल्याचे निदर्शनास आले. पथकाने घटनास्थळ ते अंधेरी दरम्यानचे १०० हून अधिक सीसीटीव्ही तपासले. त्यातूनच मिळालेल्या अर्धवट रिक्षाच्या क्रमांकावरून ते पठाणपर्यंत पोहोचले. त्याला अंधेरीतून ताब्यात घेतले. तपासात त्याने गुन्ह्यासाठी वापरलेली रिक्षा गोरेगाव येथून आणि दुसरी मालाडमधून चोरी केल्याचे सांगितले. दोन्हीही रिक्षा, तसेच ५ मोबाइल जप्त केले असून पठाणला दिंडोशी पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले.असे आहेत दाखल गुन्हेपठाण विरुद्ध जबरी चोरीचे २, मोटर वाहन चोरीचे ९, घरफोडी २, प्रतिबंधक कारवाई २, पोलिसांच्या ताब्यातून पळ १, इतरे १४ अशा प्रकारे मुंबईत ३० हून अधिक गुन्हे नोंद आहेत. यापैकी १४ गुन्ह्यांमध्ये त्याने शिक्षा भोगलेली आहे.

टॅग्स :theftचोरीArrestअटक