शहरं
Join us  
Trending Stories
1
Baramati By Election 2026: “सुनेत्राकाकींना बिनविरोध निवडून देण्यासाठी सहकार्य करा”; रोहित पवारांचे काँग्रेसला आवाहन
2
होर्मुज सामुद्रधुनी उघडा, अन्यथा...; डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला शेवटचा इशारा, युद्धविराम धोक्यात?
3
IPL 2026: मैदानात शुभमन गिलकडून झाली चूक, डगआऊटमध्ये आशिष नेहराचा चढला पारा, रिअ‍ॅक्शन कॅमेऱ्यात कैद
4
ट्रम्पना मोठा स्पर्धक तयार झाला! पाकिस्तान सीझफायरसाठी नोबेल मागू लागला; शरीफ, मुनीर...
5
Ashok Kharat : "तुला मुलगाच होईल..." असं सांगून भोंदू अशोक खरातने गर्भवतीवर केले होते अत्याचार
6
मस्साजोग सरपंचपदाची पोटनिवडणूक बिनविरोध होणार? संतोष देशमुखांच्या पत्नी उमेदवारी अर्ज भरणार
7
Viral Video: "नोकरी हवी तर किम जोंग उनला शिवी दे..."; कंपनीची अजब अट पाहून उमेदवार थरथरला
8
Top Marathi News LIVE Updates: काँग्रेसने आपला उमेदवार मागे घ्यावा; सुप्रिया सुळेंची काँग्रेसला विनंती
9
मस्करीची कुस्करी! मित्राच्या गुप्तांगात भरली एअर कॉम्प्रेसरने हवा; आतड्यांचा अक्षरशः गोळा झाला अन्...
10
इस्रायलच्या हल्ल्यांनं लेबनान हादरला, १० मिनिटांत १०० हून अधिक ठिकाणी हल्ले! २५४ जणांचा मृत्यू, अनेक जखमी; इराण म्हणाला...
11
पाकिस्तान खोटारडा निघाला...! सीजफायरच्या नावाखाली इराणचा गेम? की अमेरिकेनं मोडला करार...? लेबनानवरून नवा वाद
12
Kruthika Reddy : इंजेक्शन, गर्लफ्रेंड अन् डिजिटल पुरावे; डॉ. कृतिका रेड्डी हत्याप्रकरणात पतीच्या चॅटने फिरली चक्र
13
इराणनं विश्वासघात केला तर, सर्वनाश अटळ! ट्रम्प यांचा इशारा, होर्मुजजवळ अजूनही युद्धनौका तैनात
14
स्मृती मानधना आणि पलाश मुच्छल यांच्यातील दुरावा मिटला? कुटुंबातील सदस्यांचा एकत्रित फोटो व्हायरल
15
“इराणच्या १० कलमी प्रस्तावाला ट्रम्प यांनी दाखवली केराची टोपली”; व्हाइट हाऊसने सगळे सांगितले
16
"पाकिस्तान विश्वासार्ह नाही!" इस्रायली राजदूताचा अमेरिकेला घरचा आहेर; जेडी व्हॅन्स यांच्या पाकिस्तान दौऱ्यापूर्वीच खळबळ
17
Numerology: नशिबाची साथ हवीय? मग महत्त्वाच्या कामाला जाताना आपल्या जन्मतारखेनुसार वापरा 'हा' खास रंग!
18
पाकिस्तानचा पोपट झाला, युद्धविरामाच्या अटींबाबत शाहबाज शरीफ यांचा दावा जेडी वेन्स यांनी फेटाळला
19
Gold Silver Price Today: बाजार उघडताच सोन्या-चांदीच्या दरात मोठी घसरण; Silver ₹४,७०० नं स्वस्त, Gold चे दर काय?
20
STतील सफाईचा प्रवाशांना भूर्दंड; आधी दरवाढ केली, आता ‘स्वच्छता अधिभार’ लावला, प्रवास महागला
Daily Top 2Weekly Top 5

शिवशाही बसमधून तब्बल दोन कोटींचे दागिने पळविले

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 12, 2025 07:15 IST

किरणकुमार पुरोहित (वय ४४, रा. भाईंदर पूर्व) यांचा सोने चांदी बनविण्याचा व्यवसाय आहे.

कसारा : सोन्याचा व्यापार उरकून संगमनेरमार्गे मुंबईनाका नाशिकहून मुंबईच्या दिशेने परिवहन महामंडळाच्या शिवशाही बसने निघालेले व्यापारी किरणकुमार धनराज पुरोहित यांच्याजवळील १ कोटी ६८ लाख रुपयांचे सोन्या-चांदीचे दागिने आणि २ लाख रोख रकमेवर चौघा अज्ञातांनी डल्ला मारला. ही घटना शुक्रवारी मध्यरात्री मुंबई-नाशिक महामार्गाच्या उंबरमाळी गावहद्दीतील हॉटेल फेमस येथे उघडकीस आली.

किरणकुमार पुरोहित (वय ४४, रा. भाईंदर पूर्व) यांचा सोने चांदी बनविण्याचा व्यवसाय आहे. विविध शहरांतील ज्वेलर्स दुकानदारांना सोन्या-चांदीच्या दागिन्यांची ते विक्री करतात. शुक्रवारी श्रीरामपूर, लोणी, कोपरगाव, राहाता आणि संगमनेर या शहरांत जाऊन पुरोहित यांनी मंगळसूत्र आणि विविध प्रकारच्या छोट्या दागिन्यांची विक्री केली. त्यानंतर उरलेले सोन्या-चांदीचे दागिने आणि व्यापारातून मिळालेली रोख रक्कम बॅगेत घेऊन ते परतीच्या प्रवासाला निघाले होते.

रात्री १२ वाजता नाशिक-बोरिवली शिवशाही बसने प्रवास सुरू केल्यानंतर रात्री १:३० वाजता बस उंबरमाळी गावहद्दीतील मुंबई-नाशिक महामार्गावर हॉटेल फेमस येथे थांबविण्यात आली होती. पुरोहित त्यांच्याजवळील सोन्याचांदीची बॅग आसनावर ठेवून पाण्याची बॉटल घेण्यासाठी खाली उतरले.  त्या दरम्यान प्रवासात असलेल्या अज्ञात चौघांनी बॅग लंपास करून कारमधून मुंबईच्या दिशेने पोबारा केल्याचा प्रकार बस कंडक्टर यांच्या सांगण्यातून पुरोहित यांच्या लक्षात आला. त्यानंतर बसचालकाने कारचा पाठलाग करण्याचा प्रयत्न केला. मात्र, कार रस्त्यावर दिसून आली नाही. 

सोन्या-चांदीचे दागिने चोरीला गेल्याने पुरोहित यांना धक्का बसला आहे. त्यांनी कसारा पोलिस ठाणे गाठून घडलेल्या प्रकारचा जबाब नोंदवून अज्ञातांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. या घटनेचा तपास पोलिस निरीक्षक सुरेश गावित करीत आहेत. या घटनेमुळे खळबळ उडाली होती 

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारी