शहरं
Join us  
Trending Stories
1
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
2
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
3
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
4
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
5
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
6
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
7
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
8
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
9
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
10
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
11
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
12
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
13
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
14
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
15
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
16
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
17
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
18
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
19
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
20
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
Daily Top 2Weekly Top 5

Bilkis Bano Case : "समाजात काही तरी चुकीचं होतंय! गर्भवतीवर बलात्कार करणाऱ्यांचे पेढे भरवून स्वागत केले जातेय"

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 19, 2022 14:14 IST

Bilkis Bano Case : गुजरातच्या गोध्रा येथे जन्मठेपेची शिक्षा भोगणाऱ्या ११ आरोपिंची १५ ऑगस्टला मुक्तता करण्यात आली. गुजरातमध्ये गाजलेल्या बिलकिस बानो बलात्कार प्रकरणातील हे सर्व आरोपी होते.

Bilkis Bano Case : गुजरातच्या गोध्रा येथे जन्मठेपेची शिक्षा भोगणाऱ्या ११ आरोपिंची १५ ऑगस्टला मुक्तता करण्यात आली. गुजरातमध्ये गाजलेल्या बिलकिस बानो बलात्कार प्रकरणातील हे सर्व आरोपी होते. त्यांनी ५ वर्षीय गर्भवतीवर बलात्कार करून तिच्या कुटुंबातील ३ वर्षीय मुलीसह ७ जणांची हत्या केली होती. गुजरात सरकारच्या या निर्णयावर बिलकिस बानो आणि त्यांच्या कुटुंबियांनी नाराजी व्यक्त केली आहे आणि त्यांनी आता सरकारकडे सुरक्षेची मागणी केली आहे. अशात कारागृहातून मुक्तता झालेल्या या आरोपिंची पेढे भरवून व पुष्पहार घालून स्वागत केले गेले. हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर ज्येष्ठ संगीतकार जावेद अख्तर ( Javed Akhtar) यांनी तीव्र शब्दात नाराजी व्यक्त केली आहे.

२७ फेब्रुवारी २००२मध्ये साबरमती एक्सप्रेसला गोध्रा स्टेशन जवळ आग लावली गेली. त्यात आयोध्या येथून परतणाऱ्या ५९ श्रद्धाळूंचा मृत्यू झाला. त्यानंतर गुजरातमध्ये दंगल भडकली. मार्च २००२मध्ये दंगल बिलकिसच्या कुटुंबापर्यंत पोहोचली. २१ वर्षीय बिलकिससह साडेतीन वर्षांची मुलगी व १५ सदस्य घरात राहत होते. चार्जशीटच्या नुसार २०-३० लोकांनी हत्यार घेऊन बिलकिसच्या कुटुंबावर हल्ला केला. त्यात हे ११ लोकंही होते.

या हल्लेखोरांनी बिलकिस, तिची आई व कुटुंबातील अन्य तीन महिलांवर बलात्कार केला. त्यांना मारहाण केली. १७ पैकी ७ सदस्यांचा मृत्यू झाला. ६ जणं बेपत्ता झाले आणि केवळ ३ जण वाचले. ही घटना घडली तेव्हा बिलकिस पाच महिन्यांची गर्भवती होती. घटनेनंतर बिलकिसने  लिमखेडा पोलीस चौकीत तक्रार दाखल केली. या घटनेचा तपास CBI कडे गेला आणि त्या ११ जणांना जन्मठेपेची शिक्षा झाली. ११ आरोपींपैकी एक राधेश्याम शाहने सर्वोच्च न्यायालयात शिक्षा माफ व्हावी यासाठी याचिका दाखल केली होती. न्यायालयाने हा निर्णय गुजरात सरकारला घेण्यास सांगितले आणि सरकारने एक कमिटी स्थापन करून त्यांची शिक्षा माफ केली.     

जावेद अख्तर कायम म्हणाले?५ महिन्यांच्या गर्भवती महिलेवर बलात्कार करून तिच्या ३ वर्षांच्या मुलीसह कुटुंबातील ७ जणांची हत्या करणाऱ्या आरोपींची सुटका होताना त्यांना मिठाई भरवून व पुष्पहार घालून स्वागत करण्यात आले. आपल्या समाजात काहीतरी गंभीरपणे चूक होत आहे. 

टॅग्स :Javed Akhtarजावेद अख्तरGujaratगुजरातCrime Newsगुन्हेगारी