शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
2
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
3
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
4
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
5
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
6
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
7
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
8
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
9
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
10
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
11
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
12
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
13
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
14
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
15
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
16
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
17
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
18
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
19
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
20
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
Daily Top 2Weekly Top 5

जनआशीर्वाद यात्रेतील पाकीटमार गजाआड; मालेगावच्या चौघांना अटक, मोबाइल लोकेशनमुळे सापडले शीळफाट्यात

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 20, 2021 07:15 IST

Crime News : सोमवारी यात्रेची सुरुवात आनंदनगर येथील मंडपात झाली. त्यावेळी एक भाजप नेता तेथे आले असता पदाधिकाऱ्यांनी त्यांच्याभोवती गराडा घातला.  

ठाणे : भाजपने काढलेल्या जनआशीर्वाद यात्रेत सहभागी झालेल्यांचे पाकीट मारणाऱ्या चार जणांच्या टोळीला ठाणे पोलिसांनी अखेर अटक केली आहे. हे चारही आरोपी मालेगाव येथील रहिवासी आहेत. ते या यात्रेत कार्यकर्ते म्हणून सहभागी झाले असल्याची माहितीही तपासात समोर आली आहे.

ठाणे गुन्हे अन्वेषण शाखेने अबुबक्र अन्सारी (३५), नदीम अन्सारी (३०), आतिक अहमद (५१) आणि अश्याक अन्सारी (३८) यांना अटक केली आहे.  त्यांच्याकडून चोरलेली एक लाख १९ हजार रुपयांची रोकड, १० मोबाइल जप्त केले. चौघांनीही खास जनआशीर्वाद यात्रेत खिसे कापण्यासाठी मालेगाव ते ठाणे असा प्रवास केला होता.

सोमवारी यात्रेची सुरुवात आनंदनगर येथील मंडपात झाली. त्यावेळी एक भाजप नेता तेथे आले असता पदाधिकाऱ्यांनी त्यांच्याभोवती गराडा घातला.  या चोरट्यांनी गर्दीत कोणाला संशय येऊ नये म्हणून भाजपचे चिन्ह असलेल्या मास्कचा वापर करून या नेत्याच्या खासगी स्वीय सहायकाच्या खिशातील एक लाख रुपये गायब केले.

त्यानंतर एका पत्रकाराचे १५ हजार रुपये तसेच काही  कार्यकर्ते, पदाधिकाऱ्यांच्या खिशातील रोकड, मोबाइल चोरले. याप्रकरणी संबंधित पत्रकार आणि स्वीय सहायकाच्या मदतनिसाने कोपरी ठाण्यात तक्रार केली होती. या प्रकरणाचा समांतर तपास ठाणे गुन्हे अन्वेषण शाखेकडून सुरू होता. 

खबऱ्यांच्या नेटवर्कमधून लागला सुगावापोलीस पथकाने यात्रेत काढलेले मोबाइल चित्रीकरण तपासून संशयितांची छायाचित्रे गोळा करून ती खबऱ्यांना पाठविली. त्यावेळी छायाचित्रातील चाैघेजण हे मालेगावमधील रहिवासी असून ते सराईत गुन्हेगार असल्याची माहिती मिळाली. त्यानंतर पथकाने चोरट्यांचे मोबाइल क्रमांक मिळवून लोकेशन तपासले असता ते शीळफाटा येथील एका हॉटेलमध्ये दाखवत होते. त्यानंतर पोलिसांनी त्या हॉटेलमधून चाैघांना ताब्यात घेतले.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारी