शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
2
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
3
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
4
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
5
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
6
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
7
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
8
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
9
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
10
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
11
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
12
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
13
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
14
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
15
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
16
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
17
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
18
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
19
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
20
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
Daily Top 2Weekly Top 5

पतीकडून जीन्स घालण्यास मनाई, पत्नीने चाकूने भोसकून केली हत्या

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 17, 2022 20:22 IST

Crime News : मिळालेल्या माहितीनुसार, ही घटना जामताडा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील जोडभिटा गावातील आहे.

जामताडा : झारखंडमधील जामताडा येथे एक धक्कादायक घटना समोर आली आहे. एका व्यक्तीने आपल्या पत्नीला जीन्स पँट घालण्यास मनाई केल्याने पत्नीने त्याची चाकूने भोसकून हत्या केल्याची घटना घडली. दरम्यान, या घटनेचा तपास पोलीस करत आहेत. मृत व्यक्तीच्या वडिलांचे म्हणणे आहे की, मुलगा आणि सून यांच्यात जीन्स घालण्यावरून लग्न झाले होते, त्यानंतर सुनेने चाकूने त्याची हत्या केली. 

मिळालेल्या माहितीनुसार, ही घटना जामताडा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील जोडभिटा गावातील आहे. या गावातील आंदोलन टुडू याचे दोन महिन्यांपूर्वी पुष्पा हेंब्रमसोबत लग्न झाले होते. काल रात्री पुष्पा हेंब्रम जीन्स परिधान करून गोपाळपूर गावात जत्रा पाहण्यासाठी गेली होती. ती परत आल्यावर पती आंदोलन टुडू याने आक्षेप घेतला आणि सांगितले की जीन्स घालून जत्रा पाहायला जाऊ नकासे. याचाच राग आल्याने पत्नी पुष्पा हेंब्रम हिने त्याच्यावर चाकूने वार केले. यावेळी आंदोलन टुडू गंभीर जखमी झाला. यानंतर कुटुंबीयांनी त्याला जखमी अवस्थेत धनबाद येथील रुग्णालयात नेले. मात्र, उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला.

मृत आंदोलन टुडू याचे वडील कर्णेश्वर टुडू यांनी सांगितले की, मुलगा आणि सुनेमध्ये जीन्सवरून वाद झाला होता. या वादातून सुनेने चाकूने वार करून त्याचा खून केला. सुनेनेही चाकूने हल्ला केल्याचे मान्य केले आहे. याप्रकरणी पोलिसांनी तपास सुरू केला आहे. जामताडा पोलीस ठाण्याचे प्रभारी अब्दुल रहमान यांनी सांगितले की, घटनेची नोंद करण्यात आली आहे, मात्र उपचारादरम्यान मृत्यू झाल्याने संबंधित घटनेचा एफआयआर धनबादमध्ये नोंदवण्यात आला आहे. या संपूर्ण प्रकरणाची चौकशी करण्यात येत आहे.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारी