शहरं
Join us  
Trending Stories
1
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
2
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
3
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
4
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
5
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
6
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
7
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
8
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
9
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
10
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
11
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
12
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
13
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
14
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
15
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
16
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
17
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
18
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
19
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
20
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
Daily Top 2Weekly Top 5

हिंदू असल्याचं सांगत मुस्लीम तरुणाने युवतीला फसवलं; लग्नानंतर बळजबरीने धर्मपरिवर्तन केलं

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 17, 2020 14:48 IST

सध्या या मुलीचा व्हिडीओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.

ग्वालियर – शहरातील एक युवती लव जिहादला बळी पडली आहे. ग्वालियारच्या एका मुलीपासून धर्म लपवून काश्मीरमधल्या मुस्लीम तरुणाने लग्न केले. जेव्हा ही युवती तिच्या पतीसमवेत घरी पोहोचली तेव्हा वास्तव उघडकीस आले. यानंतर या युवतीने सोशल मीडियावर एक व्हिडिओ प्रसिद्ध करून आपली व्यथा सांगितली. ज्यामध्ये तिने तिच्या पतीवर जबरदस्तीने धर्मांतर करून तिच्यावर अत्याचार केल्याचा आरोप केला आहे. मुलगी सामाजिक संस्थांच्या मदतीने ग्वालियारला परतली आहे.

सध्या या मुलीचा व्हिडीओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. व्हायरल व्हिडिओमध्ये मुलगी म्हणते, ती ग्वालियारच्या समाधिया कॉलनीत राहत आहे. ती लव्ह जिहादला बळी पडली आहे असं तिचं म्हणणं आहे. त्यामुळे तिला न्याय मिळावा म्हणून तिची व्यथा जगासमोर सांगत आहे. ती युवती ग्वालियारची राहणारी असून एका इव्हेंट कंपनीत काम करते. ६ महिन्यांपूर्वी ती जयपूरला गेली होती, जिथे तिची भेट एका युवकाशी झाली. या युवकाने स्वत: ला काश्मिरी हिंदू साहिल कुमार असं संबोधले. यानंतर दोघांची मैत्री झाली. त्यानंतर त्या तरूणाने त्या मुलीशी लग्न केले. लग्नाच्या वेळी त्याने आपला धर्म लपविला होता असा आरोप मुलीने केला.

काश्मीरमध्ये पोहोचल्यानंतर वास्तव उघडकीस

व्हिडिओत मुलीने सांगितले की, आरोपी युवकाचे नाव शौकत अली खान असून तो सुरनकोट (जम्मू) येथील रहिवासी आहे. हिंदू असल्याचा दावा करून त्याने तिच्याशी लग्न केले. जेव्हा ती त्याच्या घरी पोहचली तेव्हा तिला त्याचे खरे नाव माहिती पडले. यानंतर या मुलीने पुन्हा परत येण्याचा प्रयत्न केला असता तिच्या पतीने आणि सासरच्यांनी मारहाण केली. त्यानंतर, मुलीचे बळजबरीने धर्मांतर केले आणि निकाह लावला. यानंतर भांडणाची सुरुवात झाली. पती आणि इतर कुटुंबातील सदस्यांनी तिचा गळा कापण्याचा प्रयत्न केल्याचं सांगत तिने तिला झालेल्या मारहाणीचे निशाण दाखवले.

जेव्हा या मुलीचा व्हिडिओ व्हायरल झाला तेव्हा ग्वालियारमधील हिंदू संघटनांनी काश्मिरी हिंदू संघटनेला मदतीसाठी आवाहन केले. ज्यावर पूंछ येथील महिला संघटनेने या युवतीसोबत जाऊन सुरनकोट पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला. पोलिसांनी गुन्हा दाखल करत एफआयआर नोंदवला. आरोपी शौकतसह ४ जणांना अटक केली आहे.

टॅग्स :HinduहिंदूMuslimमुस्लीम