शहरं
Join us  
Trending Stories
1
रशियन सैन्यात अजूनही भारतीय...एस जयशंकर यांची रशियाकडे मागणी; 'मॉस्को'नेही दिला शब्द
2
'रशियाकडून भारत नाही, चीन सर्वाधिक तेल खरेदी करतो', जयशंकर यांचा अमेरिकेवर निशाणा
3
हे महाराष्ट्रात घडलं! ताटात उष्टे अन्न ठेवले म्हणून मुलाने वडिलांचे कुऱ्हाडीने केले तुकडे, पोत्यात भरून...
4
मोठी बातमी! पालघरमधील मेलोडी फार्मा कंपनीमध्ये वायू गळती; चार जणांचा मृत्यू
5
ट्रम्प खोटारडे निघाले! अमेरिकेच्याच दूतावासाने उघडे पाडले; भारतात निवडणूक फंडिंग केल्याचा केलेला दावा
6
२ लग्नानंतरही 'ती' थांबली नाही, तिसऱ्यासाठी दबाव टाकला; माजी सरपंचाशी वैर महिलेला जीवावर बेतलं
7
कोकणात जाणाऱ्या गणेशभक्तांसाठी टोलमाफीची घोषणा; वाहनधारकांना कुठे मिळणार विशेष पास?
8
Shreyas Iyer : बापानं व्यक्त केलं लेकाच्या मनातील दु:ख! कॅप्टन्सीची इच्छा नाही; फक्त संघात घ्या!
9
नागपुरात आई अन् मुलानेच सुरू केलं सेक्स रॅकेट, व्हॉट्सअ‍ॅपवर फोटो पाठवायचे; रात्री...
10
पाकिस्तानात मोठी घडामोड! इम्रान खान तुरुंगातून बाहेर येणार? एकाचवेळी आठ प्रकरणांत मिळाला जामीन 
11
12th Pass Job: बारावी उत्तीर्णांसाठी हायकोर्टात चांगल्या पगाराची नोकरी; ८१,१०० पर्यंत पगार मिळणार!
12
स्वतःच्याच जाळ्यात अडकले डोनाल्ड ट्रम्प...! अमेरिकेत याच वर्षात 446 कंपन्या झाल्या दिवाळखोर!
13
राजनाथ सिंह आणि फडणवीस यांनी उद्धव ठाकरेंना फोन करून पाठिंबा मागितला; संजय राऊतांचा दावा
14
मोदी सरकारच्या टार्गेटवर कोण?; दोषी PM, CM, मंत्र्यांना पदावरून हटवणाऱ्या विधेयकाची इनसाइड स्टोरी
15
Asia Cup 2025 : टीम इंडिया आशिया कप स्पर्धेत पाकविरुद्ध खेळणार का? मोठी माहिती आली समोर
16
'मुघल आणि ब्रिटिशांनंतर जे काही उरले, काँग्रेस-सपाने लुटले', योगी आदित्यनाथांची बोचरी टीका
17
Nashik House Collapses: नाशकात दुमजली घर कोसळलं, आठ महिलांसह नऊ जण जखमी
18
भारताच्या सीमेवर 'चिनी' पकड मजबूत होतेय? जिनपिंग यांनी तिबेटला दिले 'हे' नवे निर्देश!
19
१ लाखाचे केले १० कोटी रुपये, अनेकदा लागलं अपर सर्किट; एकेकाळी एका रुपयांपेक्षाही कमी होती किंमत
20
सप्टेंबरनंतर देशात अन् राज्यात मोठ्या राजकीय घडामोडी घडतील; अंजली दमानियांचा दावा, म्हणाल्या...

फोटो व्हायरल करण्याची धमकी देत युवतीशी शारीरिक संबंध; फोटोग्राफर तरुणाला अटक

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 27, 2020 15:09 IST

एमआयडीसी पोलीस ठाण्यात बलात्काराचा गुन्हा दाखल

जळगाव : ओळखीतून मैत्री, मैत्रीतून प्रेमसंबंध आणि त्यातून एकमेकांसोबत काढलेले फोटो व्हायरल करुन बदनामी करण्याची धमकी देत २१ वषर्पय तरुणीशी शारीरीक संबंध प्रस्थापित करणाऱ्या नरेंद्र ज्ञानदेव सोनवणे (२४, रा.मेस्को माता नगर) या तरुणाविरुद्ध मंगळवारी एमआयडीसी पोलीस ठाण्यात बलात्काराचा गुन्हा दाखल झाला असून त्याला अटक करण्यात आली आहे.पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडित २१ वषीय तरुणी शहरातील एका नामांकित महाविद्यालयात पदवीच्या शेवटच्या वर्षाला शिक्षण घेत आहे. मार्च २०१९मध्ये या महाविद्यालयात मराठी चित्रपटासाठी ऑडिशन्स असल्याने नरेंद्र सोनवणे हा कॅमेरामन म्हणून तेथे आलेला होता. त्यावेळी पीडित व त्याच्यात ओळख झाली. त्यानंतर मोबाईल व सोशल मीडियावर सतत संपकार्त राहू लागले. याच काळात नरेंद्र याने युवतीला प्रेमाचा स्वीकार कर म्हणून विनंती केली. त्यावेळी युवतीने मला प्रेम करावयाचे नसून लग्न करायचे आहे असे सांगून प्रेमास नकार दिला. त्यावर त्याने मी लग्नासाठी तयार आहे व त्यासाठी मला कुटुंबाला काही गोष्टी सांगाव्या लागतील असे सांगून सप्टेबर २०१९ मध्ये महाविद्यालयातून अजिंठा चौकातील हॉटेल प्रिन्समध्ये घेऊन गेला. येथे कशासाठी आणले असे विचारले असता, तुझ्याशी लग्नाबाबत काही गोष्टी बोलायच्या आहेत म्हणून येथे आलो असे सांगून बायोडाटा दे वगैरे गोड बोलत जबरदस्तीने शारीरीक संबंधासाठी आग्रह केला. त्यास युवतीने विरोध दर्शविला असता आपण लग्न करणारच आहोत असे म्हणत शारीरीक संबंध प्रस्थापित केले. यावेळी नरेंद्र याने त्याची मोठी बहिण मेघा सचिन सपकाळे हिच्याशी बोलणे करुन दिले. तेव्हा त्याच्या बहिणीने जळगावात आल्यावर कुटुंबाशी बोलेन असे सांगितले तर याबाबत युवतीने मैत्रीणीचाही सल्ला घेतला असता तिनेही कुटुंबाशी बोलूनच काय तो निर्णय घे म्हणून सल्ला दिला.हॉटेलमध्ये तीन वेळा अत्याचारदरम्यान, १८ ऑक्टोबर २०१९ व १९ मार्च २०२० या या दिवशी देखील नरेंद्र याने प्रिन्स हॉटेलमध्ये आणले व शारीरीक संबंधासाठी जबरदस्ती करु लागला, तेव्हाही नकार दिला असता आपण काढलेले फोटो व्हायरल करण्याची धमकी दिली. प्रत्येक वेळी फोटो व्हायरल करण्याची धमकी देऊन शारीरीक संबंध ठेवले व लग्नही केले नाही. त्यामुळे युवतीने सोमवारी रात्री एमआयडीसी पोलीस स्टेशन गाठून तक्रार दिली. दरम्यान, रात्री पाचोरा पोलीस ठाण्याच्या परिविक्षाधीन महिला उपनिरीक्षक विजया वसावे यांनी पीडित युवतीची फियार्द घेऊन गुन्हा दाखल केला. त्यानंतर कॉ.मुकेश पाटील, विजय बाविस्कर यांनी नरेंद्र सोनवणे याला अटक केली. या गुन्ह्याचा तपास सहायक निरीक्षक अमोल मोरे व रतिलाल पवार करीत आहेत.