शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
3
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
4
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
5
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
6
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
7
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
8
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
9
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
10
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
11
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
12
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
13
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
14
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
15
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
16
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
17
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
18
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
19
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
20
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  

जळगाव घरकुल घोटाळा : सुरेश जैन यांना हायकोर्टाने मंजूर केला तात्पुरता जामीन 

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 20, 2019 16:17 IST

कारागृहात असणारे माजी मंत्री यांना हायकोर्टाकडून तूर्तास दिलासा मिळाला आहे. 

ठळक मुद्दे वैद्यकीय कारणांकरिता तीन महिन्यांसाठी हंगामी जामीन आणि  पाच लाख रुपयांच्या जातमुचलक्यावर तात्पुरती सुटका करण्यात आली आहे. सप्टेंबर महिन्यात सुरेश जैन यांनी कोर्टाने ठोठावलेल्या शिक्षेला मुंबई हायकोर्टात आव्हान देत याचिका दाखल केली होती. 

मुंबई - जळगावमधील घरकुल घोटाळा प्रकरणात शिक्षा झालेले माजी मंत्री सुरेश जैन यांना मुंबई हायकोर्टाकडून अंतरिम दिलासा देण्यात आला आहे. वैद्यकीय कारणांकरिता तीन महिन्यांसाठी हंगामी जामीन आणि  पाच लाख रुपयांच्या जातमुचलक्यावर तात्पुरती सुटका करण्यात आली आहे. त्यामुळे जळगाव घरकूल घोटाळ्याप्रकरणी कारागृहात असणारे माजी मंत्री यांना हायकोर्टाकडून तूर्तास दिलासा मिळाला आहे. 

राज्यभरात गाजलेला जळगाव घरकुल घोटाळ्याप्रकरणी माजी मंत्री सुरेश जैन आणि गुलाबराव देवकर यांना धुळे न्यायालयाने शिक्षा सुनावली आहे. माजी मंत्री गुलाबराव देवकर यांना 5 वर्षाची शिक्षा सुनावली होती तर सुरेश जैन यांना 7 वर्षाची शिक्षा आणि 100 कोटींचा दंड ठोठावला आहे. सप्टेंबर महिन्यात सुरेश जैन यांनी कोर्टाने ठोठावलेल्या शिक्षेला मुंबई हायकोर्टात आव्हान देत याचिका दाखल केली होती. 

गेल्या काही वर्षापासून घरकुल घोटाळ्याचं प्रकरण न्यायालयात प्रलंबित होतं. तसेच या प्रकरणातील 30 नगरसेवकांना 5 वर्षाची शिक्षा सुनावली होती. जळगाव घरकुल योजना ही जळगाव नगरपालिकेची योजना होती. झोपडपट्टीत राहणाऱ्या लोकांना स्वस्त दरात चांगली घरे देण्यासाठी तत्कालीन नगरपालिकेतील सत्ताधारी गटाने झोपडपट्टी निर्मूलनाच्या उद्देशाने ही योजना राबवण्याचे ठरवले. त्यासाठी हरी विठ्ठलनगर, खंडेरावनगर, समतानगर आणि तांबापुरा या ठिकाणी सुमारे ११० कोटींचे कर्ज काढून ११ हजार घरकुले बांधण्याच्या कामास इ.स. १९९९ मध्ये सुरुवात झाली. मात्र, या योजनेतील सावळागोंधळ सन २००१ मध्ये उघडकीस आला. सुरुवातीपासूनच अनियमितता, कायद्याचे उल्लंघन, मनमानी पद्धतीने निर्णय, गैरव्यवहार यांचे लचांड उघडकीला आले. 

टॅग्स :High Courtउच्च न्यायालयJalgaonजळगावCourtन्यायालय