शहरं
Join us  
Trending Stories
1
नरेंद्र मोदींचा उत्तराधिकारी कोण बनणार? सरसंघचालक मोहन भागवतांचं सूचक विधान, म्हणाले...    
2
ज्या देशाच्या कारमधून पुतिन यांनी केला प्रवास; आता त्यांच्याचविरोधात उतरवले लढाऊ जहाज, तणाव वाढला
3
अविवाहित मुलीच्या संपत्तीचा खरा वारसदार कोण? कायद्यानुसार कोणाचे असतात प्रथम अधिकार?
4
'या' कर्जमुक्त कंपनीच्या शेअरवर गुंतवणूकदारांच्या उड्या; ₹६० पेक्षा कमी आहे किंमत, दमानींचीही गुंतवणूक
5
Travel : भारतातून १००००० रुपये घेऊन थायलंड ट्रिपला निघताय? राहणं, खाणं आणि फिरणं एकूण किती होईल खर्च?
6
“देशात कधीही झाले नाही, ती परंपरा PM मोदी अन् CM फडणवीसांनी सुरू केली”; कुणी केली टीका?
7
Akola Live in Partner killed: २८ वर्षाच्या प्रेयसीची पवनने हत्या केली आणि पोलीस ठाण्यात जाऊन म्हणाला, 'तिने माझ्या घरात...'
8
केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी, सरकारनं 'या' महत्त्वाच्या नियमांत केला बदल; १५ डिसेंबरपासून लागू होणार
9
संतापजनक...! गुजरातमध्ये 6 वर्षांच्या चिमुकलीवर अत्याचार, नराधमानं प्रायव्हेट पार्टमध्ये...; आरोपी 3 मुलांचा बाप!
10
३१ डिसेंबर आहे अखेरची तारीख, 'ही' २ कामं पटापट आटोपून घ्या; केली नाही तर समस्यांना सामोरं जावं लागेल
11
क्रिकेट कोचला बॅटने बेदम मारहाण; २० टाके पडले! संघात न घेतल्यानं तिघे भडकले, अन्....
12
प्रेम, धोका आणि ब्लॅकमेलिंग! व्यापाऱ्याचा महिला DSP वर कोट्यवधी रुपये हडपल्याचा गंभीर आरोप
13
शिंदेंचा ‘वाघ’ थेट बिबट्याच्या वेशात विधान भवनात; हात जोडून सरकारला विनवणी, “गेली २० वर्षे...”
14
ममता बॅनर्जींनी केंद्र सरकारच्या आदेशाचा कागद फाडला! कशावरून रंगला 'हाय-व्होल्टेज' ड्रामा?
15
पाकिस्तानात शूट झालाय रणवीर सिंगचा 'धुरंधर'? अभिनेत्याचा मोठा खुलासा, म्हणाला- "तिथले गँगस्टर..."
16
माणुसकी संपली! हेल्थ चेकअपमध्ये कॅन्सर झाल्याचे कळले; IT कंपनीने २१ वर्षांचा अनुभव असलेल्या कर्मचाऱ्याला काढले 
17
'वीर सावरकर पुरस्कार' नाकारला! काँग्रेस खासदार शशी थरूर यांनी HRDS इंडियाचा प्रस्ताव फेटाळला; 'सहमतीशिवाय घोषणा केल्याने' वाद
18
Viral Video: अरे, हे चाललंय तरी काय? जोडप्यानं हायवेवर कार बाजूला लावली अन् रस्त्यावरच...
19
२०२६ मधील सार्वजनिक सुट्ट्यांची यादी जाहीर, भाऊबीजेला अतिरिक्त सुट्टी; सरकारकडून अधिसूचना जारी
Daily Top 2Weekly Top 5

जहाल माओवादी गडचिरोली पोलिसांच्या ताब्यात; हैदराबादमध्ये हाेता लपून, दाेन लाखांचे बक्षीस

By दिगांबर जवादे | Updated: September 7, 2025 21:15 IST

शंकर मिच्चा हा सप्टेंबर २०१८ मध्ये छत्तीसगडमधील मद्देड दलममध्ये भरती झाला होता. डिसेंबर २०१८ मध्ये गडचिरोली डिव्हिजनमध्ये बदली होऊन शंकरअण्णा ऊर्फ असाम याच्या अंगरक्षकाची जबाबदारी त्याने २०२२ पर्यंत सांभाळली.

- दिगांबर जवादे

गडचिरोली : खुनाच्या गुन्ह्यात सहभागी असलेला जहाल माओवादी शंकर ऊर्फ अरुण येर्रा मिच्चा (वय २५, रा. बांदेपारा, ता. भोपालपट्टनम, जि. बिजापूर, छत्तीसगड) याला गडचिराेली पाेलिसांनी हैदराबाद (तेलंगणा) येथून शुक्रवारी अटक केली आहे. त्याच्यावर महाराष्ट्र शासनाने दोन लाख रुपयांचे बक्षीस जाहीर केले होते.

शंकर मिच्चा हा सप्टेंबर २०१८ मध्ये छत्तीसगडमधील मद्देड दलममध्ये भरती झाला होता. डिसेंबर २०१८ मध्ये गडचिरोली डिव्हिजनमध्ये बदली होऊन शंकरअण्णा ऊर्फ असाम याच्या अंगरक्षकाची जबाबदारी त्याने २०२२ पर्यंत सांभाळली. नंतर तो पेरमिली दलममध्ये सदस्य म्हणून २०२४ पर्यंत सक्रीय राहिला.

त्याच्या कार्यकाळात त्याने चार मोठ्या चकमकींमध्ये सहभाग नोंदवला आहे. २०२० मध्ये येडदर्मी जंगल, २०२१ मध्ये मडवेली जंगल, २०२३ मध्ये वेडमपल्ली जंगल व २०२४ मध्ये चितवेली जंगल परिसरातील चकमकींमध्ये तो सहभागी होता.

पोलिसांच्या तीव्र अभियानामुळे घाबरून त्याने २०२४ मध्ये पेरमिली दलम सोडले. त्यानंतर काही महिने घरी शेतीकाम करून तो आंध्र प्रदेशातील एंटापूर व नंतर हैदराबाद येथे स्थायिक झाला होता. पोलिसांच्या गुप्त माहितीच्या आधारे त्याच्यावर पाळत ठेवून अखेर ४ सप्टेंबर रोजी सी-६० पथकाने त्याला हैदराबाद येथून ताब्यात घेतले. त्याला न्यायालयात हजर करण्यात आले असता चार दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.यांच्या मार्गदर्शनात कारवाईविशेष पोलीस महानिरीक्षक (नक्षलविरोधी अभियान) संदीप पाटील, परिक्षेत्रीय पोलीस उपमहानिरीक्षक अंकित गोयल, जिल्हा पोलीस अधीक्षक नीलोत्पल, अपर पोलीस अधीक्षक एम. रमेश, सत्य साई कार्तिक, गोकुलराज जी. तसेच डीवायएसपी विशाल नागरगोजे यांचे मार्गदर्शनात सहायक पाेलिस निरिक्षक प्रशांत बोरसे, पाेलिस उपनिरिक्षक अक्षय लव्हाळे, पवन जगदाळे, संतोश नरोटे,राहुल दुर्गे यांच्या पथकाने कारवाई केली.

टॅग्स :naxaliteनक्षलवादीGadchiroliगडचिरोली