शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

२१५ कोटींच्या खंडणीप्रकरणी जॅकलिन आरोपी; १० कोटींच्या भेटवस्तू दिल्याचे ईडीच्या तपासात स्पष्ट

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 18, 2022 08:50 IST

उपलब्ध माहितीनुसार, सुकेश आणि जॅकलिन यांची घनिष्ठ मैत्री होती.

मुंबई : स्वतःच्या पत्नीकडून २१५ कोटींची खंडणी उकळल्याच्या प्रकरणी अटकेत असलेला आरोपी सुकेश चंद्रशेखर (वय ३२) याच्यासोबत आता ईडीने या गुन्ह्यात अभिनेत्री जॅकलिन फर्नांडिस हिलादेखील आरोपी केले आहे. तिचे नाव बुधवारी दाखल केलेल्या आरोपपत्रात नमूद करण्यात आले आहे. या खंडणीद्वारे उकळलेल्या पैशांतून १० कोटींच्या भेटवस्तू चंद्रशेखर याने जॅकलिनला दिल्याचे ईडीच्या तपासात स्पष्ट झाले आहे. या गुन्ह्यातून मिळालेल्या पैशात जॅकलिनदेखील वाटेकरी असल्याचा ठपका ईडीने तिच्यावर ठेवला आहे. 

उपलब्ध माहितीनुसार, सुकेश आणि जॅकलिन यांची घनिष्ठ मैत्री होती. त्याच्या अनेक गुन्ह्यांची जॅकलिन हिला माहिती होती. वेळोवेळी ती सुकेश याच्यासोबत व्हिडीओ कॉलद्वारेही संपर्कात होती. सुकेशने त्याच्या उद्योजक पत्नीकडून २१५ कोटींची खंडणी उकळल्याचेही प्रकरण पुढे आले होते. याच पैशांतून सुकेश याने जॅकलिन हिला सुमारे १० कोटींच्या भेटवस्तू दिल्याचे ईडीच्या तपासात स्पष्ट झाले. तसेच सुकेशने या खंडणीच्या पैशांतून आपल्याला भेटवस्तू दिल्या आहेत, याचीदेखील माहिती जॅकलिन हिला होती, असा ठपका ईडीने तिच्यावर ठेवला आहे. 

जॅकलिनला मिळालेल्या भेटवस्तू कोणत्या ?

  • क मिनी कूपर गाडी
  • हिऱ्याची कानातली १५ आभूषणे
  • नऊ लाख किमतीच्या तीन मांजरी
  • ५२ लाख किमतीचा घोडा
  • अनेक महागड्या ब्रँडच्या बॅगा, जिमचे कपडे
  • रोलेक्स ब्रँडची अनेक घड्याळे
  • जॅकलिनच्या बहिणीला दीड लाख अमेरिकी डॉलर कर्जरूपाने, तसेच एक बीएमडब्ल्यू गाडी
  • ऑस्ट्रेलियात राहणाऱ्या जॅकलिनच्या भावाला १५ लाख कर्जरूपाने दिले.

आतापर्यंत ३२ गुन्ह्यांची नोंद

सुकेशने जॅकलिनला भेटवस्तू दिल्याचा कबुलीजबाब ईडीच्या चौकशीत दिला होता. यापैकी जॅकलिन हिच्याकडून सात कोटींची संपत्ती (भेटवस्तूंसह) ईडीने प्रीव्हेन्शन ऑफ मनी लॉण्ड्रिंग कायद्यांतर्गत यापूर्वीच जप्त केली आहे. याप्रकरणी ईडीच्या अधिकाऱ्यांनी अनेक वेळा जॅकलिनची चौकशी केली आहे. आतापर्यंत सुकेशवर अनेक राज्यांतील पोलिसांबरोबरच ईडी, सीबीआय तसेच आयकर विभागातर्फे एकूण ३२ गुन्ह्यांची नोंद झाली असून ४ एप्रिलला त्याला ईडीने अटक केली आहे. स्वतःच्या पत्नीकडून २१५ कोटींची खंडणी उकळण्यासोबतच, सुकेशने तो पंतप्रधान कार्यालय, गृह मंत्रालय, विधी मंत्रालयातील मोठा अधिकारी असल्याचे भासवत अनेकांना गंडा घातला आहे.

टॅग्स :Enforcement Directorateअंमलबजावणी संचालनालयJacqueline Fernandezजॅकलिन फर्नांडिस