शहरं
Join us  
Trending Stories
1
इथे युद्ध थांबलं, तिथे शेअर बाजार सुस्साट... Sensex २६०० अंकांनी वधारला, Nifty मध्ये ७०० अंकांची तेजी
2
“शस्त्रसंधी वगैरे काही नाही”; इस्रायलने केले स्पष्ट, अमेरिका-इराण युद्ध खरेच थांबणार का?
3
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
4
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
5
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
6
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
7
भंडाऱ्यात चोरांचे तांडव! ५ तासांत २१ दुकाने फोडली; लाखोंचा मुद्देमाल गायब, टोळी असल्याचा संशय
8
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
9
रवींद्र एरंडेच्या ऑफिसमध्ये धनादेशांचा खच; वाचवण्यासाठी अहिल्यानगरच्या 'त्या' नेत्यांचा पोलिसांवर दबाव
10
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
11
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
12
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
13
आठ वर्षांच्या चिमुरडीचा डम्परखाली चिरडून मृत्यू; संतप्त नागरिकांचा रास्ता रोको, चालकाला अटक
14
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
15
पहिल्या पॉड टॅक्सीचे भूमिपूजन; मात्र कुर्ला ते वांद्रे रेल्वे स्थानक प्रवासासाठी २०३१ची प्रतीक्षा
16
‘टनेल बोरिंग’ मशिनवर 'ठाणेकर' उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठेवणार नजर- मुख्यमंत्री फडणवीस
17
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
18
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
19
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
20
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
Daily Top 2Weekly Top 5

बँक ऑफ महाराष्ट्राच्या कर्मचाऱ्यांनीच केली महिला खातेदाराची ३१ लाखांची फसवणूक

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 11, 2023 16:28 IST

उरण तालुक्यातील नवघर गावात बँक ऑफ महाराष्ट्रची शाखा आहे.या शाखेतच भेंडखळ गावातील ५० वर्षीय महिला प्रज्वला लक्ष्मण ठाकूर  यांचे बचत खाते आहे.

मधुकर ठाकूर 

उरण : उरण- नवघर येथील बँक ऑफ महाराष्ट्र शाखेच्या कर्मचाऱ्यांनेच अशिक्षित महिलेची ३१ लाखांची फसवणूक केल्याप्रकरणी बॅकेच्या विरोधात बॅकेसमोरच महिलेने कुटुंबीयांसह सोमवारपासून न्याय मिळेपर्यंत " भीक मांगो " आंदोलन सुरू केले आहे. महिलेच्या या अनोख्या आंदोलनामुळे मात्र बॅक कर्मचाऱ्यांमध्ये चांगलीच खळबळ माजली आहे.

उरण तालुक्यातील नवघर गावात बँक ऑफ महाराष्ट्रची शाखा आहे.या शाखेतच भेंडखळ गावातील ५० वर्षीय महिला प्रज्वला लक्ष्मण ठाकूर यांचे बचत खाते आहे. आर्थिक नुकसान भरपाई पोटी प्रज्वला यांना २० लाख व १६ लाख अशी ३१ लाखांची रक्कम दोन धनादेशाने मिळाली होती.या दोन्ही धनादेशाद्वारे मिळालेली ३१ लाखांच्या रक्कमेचे धनादेश खात्यात जमा होताच फिक्स डिपॉझिटमध्ये टाकण्याची प्रज्वलांची इच्छा होती.त्यासाठी स्वाक्षऱ्या करून धनादेश दिल्यास ३१ लाखांच्या फिक्स डिपॉझिटच्या पावत्या ३-४ दिवसात तुम्ही बॅकेत येऊन घेऊन जा असे बॅकेचे कर्मचारी मकरंद दिनानाथ भोईर सांगितले होते.बॅकेच्या कर्मचाऱ्यांशी नेहमीच विश्वासाचे संबंध असल्याने बॅकेचे कर्मचारी मकरंद दिनानाथ भोईर यांच्याकडे प्रज्वला ठाकूर यांनी मोठ्या विश्वासाने १६ व २० लाखांचे कोरे धनादेश स्वाक्षऱ्या करून दिले होते.

त्यानंतर पाच-सहा दिवसांनी बॅकेत फिक्स डिपॉझिटच्या पावत्या आणण्यासाठी प्रज्वला ठाकूर गेल्या होत्या.मात्र प्रत्येक वेळी मकरंद भोईर यांनी विविध प्रकारची तकलादू कारणे दाखवून प्रज्वला ठाकूर यांना वाटेला लावले.मात्र मकरंद भोईर शाखेत अनुपस्थित असताना शाखेत चौकशी करण्यासाठी गेलेल्या असताना मात्र खात्यात पैसेच शिल्लक नसल्याने पैसे फिक्स डिपॉझिट करण्यात आले नसल्याची अत्यंत धक्कादायक माहिती मिळाली. पासबुकच्या तपासणीनंतर २० आणि १० लाखांच्या दोन धनादेशाव्दारे ३० लाखांची रक्कम चेतन इंटरप्रायझेस नावाने असलेल्या कंपनीच्या करंट बॅक खात्यात जमा झाले असल्याचे आढळून आले.हे करंट खाते मकरंद भोईर यांच्या भावाच्या नावाने असल्याची माहितीही समोर आली.

यानंतर पायाखालची जमीन सरकलेल्या प्रज्वला लक्ष्मण ठाकूर यांनी बॅक व्यवस्थापक आणि उरण पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली.तक्रारीनंतर बॅक अधिकारी आणि पोलीस अधिकाऱ्यांनी अनेकवेळा महिलेला न्याय मिळवून देण्याच्या नावाखाली जोरबैठका मारल्या.मात्र वर्षभराच्या कालावधीनंतरही त्यातून काहीएक निष्पन्न झाले नाही.त्यामुळे आयुष्यभराची सर्वस्वी असलेली पुंजी परत मिळविण्यासाठी आणि न्यायासाठी फसवणूक झालेल्या प्रज्वला लक्ष्मण ठाकूर यांनी बँक ऑफ महाराष्ट्र शाखेच्या कर्मचाऱ्यांनेच ३१ लाखांची फसवणूक केल्याप्रकरणी नवघर शाखेच्या विरोधात बॅकेसमोरच कुटुंबीयांसह सोमवारपासून न्याय मिळेपर्यंत " भीक मांगो " आंदोलन सुरू केले आहे.या अनोख्या पद्धतीच्या आंदोलनाला येथील अनेक राजकीय पक्षांचे पुढारी, नेत्यांनी भेट देऊन पाठिंबा दिला आहे. 

दरम्यान या अशिक्षित महिलेच्या फसवणूकीप्रकरणी बॅक ऑफ महाराष्ट्रचे डेप्युटी झोनल मॅनेजर सौरभ सिंग यांनी माहिती देण्यास नकार दिला.तर या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आल्यापासूनच आरोपी फरार झाला आहे.आरोपीच्या शोधासाठी प्रयत्न सुरु असल्याची माहिती उरण पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सतीश निकम यांनी दिली

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारी