शहरं
Join us  
Trending Stories
1
अहमदाबाद विमान अपघातातील मृतांचा आकडा वाढला; डॉक्टर, विद्यार्थी, नातेवाईकांचे मृतदेह सापडले
2
इराणकडून जोरदार प्रतिहल्ला, इस्राइलवर डागली शेकडो क्षेपणास्त्रे आणि ड्रोन, तेल अवीवमध्ये स्फोट, काही नागरिक जखमी 
3
Lalbaugcha Raja 2025: लालबागच्या राजाचा पाद्य पूजन सोहळा थाटात संपन्न! यंदा मंडळाचे ९२ वे वर्ष
4
कशी होणार हवाई प्रवाशांची सुरक्षा? ‘स्टाफ’वर कामाचा मोठा ताण; ‘डीजीसीए’त ४८% पदे रिक्त
5
अपघातानंतर विमान उद्योगावर आले संकटाचे ढग; प्रवासी घटण्याची भीती
6
आजचे राशीभविष्य : १४ जून २०२५; कार्यालयीन कामासाठी प्रवास घडेल, व्यापारात फायदा होईल
7
"अजूनही लोक वाचू शकले असते, परंतु...", विमान अपघातात वाचलेल्या एकमेव प्रवाशाने केला दावा
8
जवळची माणसे गेली, सारी स्वप्ने उद्ध्वस्त झाली, विमान अपघातात नातेवाईक गमावलेल्यांचा आक्रोश
9
विमान प्रवास आता पूर्वीइतका धोकादायक नाही? अशी आहे मागच्या काही दशकांतील आकडेवारी
10
गाझात बिनशर्त युद्धबंदीच्या ठरावावर भारत राहिला तटस्थ
11
मार्करमचे झुंजार नाबाद शतक, दक्षिण आफ्रिका कसोटी विश्वविजेतेपदापासून ६९ धावांनी दूर, ऑस्ट्रेलिया बॅकफूटवर
12
काहीतरी मोठे घडणार...! दोन लढाऊ विमानांच्या संरक्षणात नेतन्याहूंनी देश सोडला; खासगी कंपन्यांची विमानेही इस्रायलबाहेर निघाली...
13
कराडची कन्या 'त्या' विमान अपघातात गमावली! शहरवासीयांमधून हळहळ व्यक्त
14
इराणमध्ये पुन्हा इस्रायलची लढाऊ विमाने घुसली; हल्ले सुरु, प्रत्युत्तरात येमेनहून मिसाईल डागली
15
पाकिस्ताननंतर इराणचे हवाई क्षेत्रही बंद; विमानांना सौदीच्या आकाशातून जावे लागणार 
16
१२ हजार ४०० झाडे तोडण्याऐवजी मेट्रो कारशेडसाठी पर्यायी जागांचा व्हावा विचार; मुख्यमंत्र्यांना स्थानिक भाजपा नेत्याचे साकडे 
17
इराणवर हल्ला केल्यानंतर नेतन्याहूंचा पंतप्रधान मोदींनी फोन, काय झाली चर्चा...
18
डॉक्टरांची मेस चालविणारी आजी आणि दोन वर्षांची नात बेपत्ता; ना मृतांमध्ये नाव, ना जखमींमध्ये... मुलगा शोधतोय
19
मोठी अपडेट! सात मृतदेहांची ओळख पटली; विजय रुपाणींच्या मृतदेहाची ओळख पटलेली नाही, मृतांचा आकडा...
20
एसी कॉम्प्रेसर फुटल्यामुळे माहीममध्ये मोठी आग; होरपळून दोघांचा मृत्यू 

पैशाच्या लालसेतून मित्रांनीच केला मित्राचा घात; विंचूरची घटना, दोघांना अटक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 7, 2023 21:08 IST

पोलिसांकडून घटनेचा उलगडा

विंचूर : पैशांच्या लालसेने मित्रांनीच मित्राचा खून केल्याची घटना विंचूर येथे घडली असून, याप्रकरणी दोघांना अटक करण्यात आली आहे.पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, येथील पांडुरंगनगर भागातील रहिवासी बाळासाहेब पोतले गुरुवार, दि.१ जून रोजी कॉटवर मृतावस्थेत आढळून आल्याने पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली होती. सहायक पोलिस निरीक्षक राहुल वाघ व पोलिस नाईक योगेश शिंदे, पोलिस काॅन्स्टेबल प्रदीप आजगे, कैलास मानकर यांचे तपास पथक तयार करण्यात आले होते.

तपासादरम्यान व घटनास्थळाच्या निरीक्षणावरून तपास पथकास घातपात झाल्याचा संशय आल्याने बाळासाहेब पोतले यांचे मित्र रामदास सालकाडे व सुनील मोरे, दोघे रा. विंचूर यांचे दारू पिण्यासाठी पोतले यांच्याकडे वारंवार येणे-जाणे असल्याचे समजले; परंतु बाळासाहेब पोतले यांचा मृत्यू झाल्यापासून रामदास सालकाडे व सुनील मोरे हे गावातून निघून गेल्याची गोपनीय माहिती तपास पथकास मिळाली होती. तांत्रिक माहितीच्या आधारे संशयित रामदास सालकाडे व सुनील मोरे यांचा शोध घेऊन त्यांच्याकडे सखोल विचारपूस करता त्यांनी मित्र बाळासाहेब पोतले यांचे दारू पिण्याच्या कारणावरून बाचाबाची होऊन त्यास नाक व तोंड दाबून मारून टाकल्याची कबुली दिली.

तसेच पोतले यांचा मोबाइल, शर्ट-पँटमधील रोख रुपये व एटीएम कार्ड व चेकबुक, तसेच वॅगनर कारसह त्याठिकाणाहून पळ काढल्याचे सांगितले. संशयित आरोपी रामदास मारुती सालकाडे, रा. सालकाडे वस्ती, किसानवाडी, सुनील माणिक मोरे, रा. किसानवाडी, विंचूर यांना न्यायालयात हजर केले असता शुक्रवार, दि. ९ जूनपर्यंत पोलिस काेठडी देण्यात आली आहे.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारी