शहरं
Join us  
Trending Stories
1
आधीच प्लॅन ठरला होता, आंतरवालीतील दगडफेकीमागे पवारांचे आमदार; छगन भुजबळांचा मोठा गौप्यस्फोट
2
“राहुल गांधी हे सीरियल लायर, हायड्रोजनचं सोडा, लवंगी फटाकाही फोडू शकले नाहीत”: CM फडणवीस
3
Asia Cup 2025 : 'जानी दुश्मन' असलेल्या बांगलादेशच्या मदतीला धावला श्रीलंका; अफगाणिस्तानचा खेळ खल्लास!
4
Hindenberg प्रकरणात ‘सेबी’ची Adani समूहाला क्लीन चिट; गौतम अदानी म्हणाले, “सत्यमेव जयते...”
5
“देशातील Gen Z, विद्यार्थी, युवक संविधान-लोकशाही वाचवतील, मी सदैव पाठीशी राहीन”: राहुल गांधी
6
७५ वर्षांचे झाले, PM मोदींनी निवृत्ती घ्यावी का? शरद पवार म्हणाले, “त्यांनी थांबावे हे...”
7
"युक्रेन युद्ध थांबवणे सर्वात सोपे वाटत होते, पण पुतिन..."; ट्रम्प यांची रशियन राष्ट्राध्यक्षांवर थेट टीका, स्पष्टच बोलले
8
Best Catch In T20I : परेरानं घेतलेला झेल भारीच! पण सूर्या दादाला तोड नाय! कारण....(VIDEO)
9
जबरदस्त...! तब्बल 18.60 लाख रुपयांनी स्वस्त झाली अ‍ॅक्टर्स अन् नेत्यांच्या आवडीची ही ढासू SUV; आता किती रुपयांना मिळणार? जाणून घ्या
10
Mohammad Nabi Fastest Fifty : एका षटकात ५ षटकार! युवीचा विक्रम आला होता धोक्यात, पण...
11
पालघर-डहाणूत ठाकरे गटाला खिंडार; सरपंच-उपसरपंच-पदाधिकारी शिवसेनेत, एकनाथ शिंदे म्हणाले...
12
Nuwan Thushara Unplayable Delivery : 'बेबी मलिंगा'ची कमाल! लेगला चेंडू टाकत उडवली ऑफ स्टंप (VIDEO)
13
'हैदराबाद गॅझेटिअरच्या नावाखाली सरकारने फसवणूक केली'; मराठा गोलमेज परिषदेत आरोप
14
स्कॉर्पिओ, सेल्टोस अन् हॅरियरचीही ‘बोलती बंद’; लोकांनी या ढासू SUV वर लाखो रुपये केले खर्च! 
15
अमेरिकन राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे विमान न्यू यॉर्कमध्ये अपघातातून थोडक्यात बचावले...
16
“तुम्ही बोलत नाही, आम्ही ओबीसी आरक्षणासाठी लढायचे नाही का?”; छगन भुजबळांचा शरद पवारांना सवाल
17
मतचोरीचा राहुल गांधींचा आरोप, एकनाथ शिंदेंचे खुले आव्हान; म्हणाले, “ठोस पुरावे द्या अन्...”
18
मर्सिडीज-हुरुनचा अहवाल आला! भारतात करोडपतींच्या संख्येत ९० टक्क्यांनी वाढ..., महाराष्ट्र टॉपर, प्रचंडच...
19
मारुती अल्टोपेक्षा ही कार स्वस्त झाली; जीएसटीने कमालच केली, मारुतीचे जगच इकडचे तिकडे केले...
20
हैदराबाद गॅझेटवर हायकोर्टाचा मोठा निर्णय; याचिकाकर्त्यांना सुनावले, आता मराठा आरक्षणाचे काय?

अगतिक बाप! आर्यनसाठी शाहरुखने वानखेडेंना केलेले १० मेसेज; मी तुमच्याकडे भीक मागतो की...

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 19, 2023 17:37 IST

मुलगा आर्यन खानच्या सुटकेसाठी शाहरूखने सहकार्याची विनंती केल्याचे समोर येत आहे. सध्यातरी शाहरुख खानचे १० मेसेज हाती लागले आहे. 

नवी दिल्ली/मुंबई: अंमली पदार्थ नियंत्रण कक्षाचे माजी विभागीय संचालक समीर वानखेडे यांनी उच्च न्यायालयात दाखल केलेल्या याचिकेत मोठा गौप्यस्फोट केला आहे. समीर वानखेडे यांनी बॉलिवूड अभिनेता शाहरूख खानसोबत झालेल्या संभाषणाची प्रत याचिकेसोबत जोडली आहे. माझ्या मुलाची काळजी घे, असं अनेकदा शाहरुख खान संभाषणात म्हणत असल्याचं दिसून येत आहे. 

शाहरूख खानने समीर वानखेडे यांना केलेल्या मेसेजचा स्क्रिनशॉटही न्यायालयासमोर ठेवण्यात आला. समीर वानखेडे यांनी याचिकेत शाहरूख खानसोबतचे ३ आणि ४ ऑक्टोबरचे मेसेज उघड केले आहेत. शाहरूखने आपल्याला पाठवलेले मेसेज वानखेडे यांनी मांडले असून शाहरूखनेच आपल्याशी प्रथम संपर्क साधल्याचे वानखेडे यांनी म्हटले आहे. तसेच शाहरूखने त्यांच्या कार्याचे कौतुक केले असल्याचे पुरावे समीर वानखेडे यांनी न्यायालयात सादर केले आहेत. तसेच मुलगा आर्यन खानच्या सुटकेसाठी शाहरूखने सहकार्याची विनंती केल्याचे समोर येत आहे. सध्यातरी शाहरुख खानचे १० मेसेज हाती लागले आहे. 

शाहरुख खानने केलेले मेसेज-

१. देशाला पुढे नेणारे प्रामाणिक आणि कष्टाळू तरुण हवे

व्हॉट्सअ‍ॅप चॅटमध्ये शाहरुखने म्हणाला की, आर्यन खानला असा माणूस बनवण्याचा मी सर्वतोपरी प्रयत्न करेन ज्याच्यावर तुम्हाला आणि मला अभिमान वाटेल. ही घटना त्यांच्या आयुष्याला कलाटणी देणारी ठरेल. देशाला पुढे नेणारे प्रामाणिक आणि कष्टाळू तरुण हवे आहेत. तुम्ही आणि मी आमची जबाबदारी पार पाडली आहे जी पुढील पिढी पाळेल. भविष्यासाठी त्यांच्यात बदल घडवून आणणे आपल्या हातात आहे. आपल्या समर्थन आणि दयाळूपणाबद्दल पुन्हा एकदा धन्यवाद. देव तुम्हाला आशीर्वाद देईल. मला तुम्हाला वैयक्तिकरित्या भेटायला यावे लागेल, जेणेकरून मी तुम्हाला मिठी मारू शकेन. तुम्‍हाला वेळ असेल तेव्‍हा कृपया मला कळवा. मला मदत करण्याचा प्रयत्न केल्याबद्दल धन्यवाद. तुमचा सदैव ऋणी राहील. मला प्रामाणिकपणे वाटते की तुम्ही तुमच्या अधिकृत क्षमतेनुसार सर्वोत्तम प्रयत्न केले आहेत. मी वडिलांसारखाच विचार करतो. परंतु कधीकधी आपले सर्वोत्तम प्रयत्न देखील पुरेसे नसतात. संयम आवश्यक आहे. धन्यवाद. 

२. प्लिज माझ्या मुलाला घरी पाठवा- 

आर्यनला तुरुंगात टाकू नका, मी तुम्हाला विनंती करतोय. प्लीज प्लीज मी तुला वडील म्हणून याचना करतोय. तू माझ्या मुलाची सुधारणा करशील, त्याला अशा ठिकाणी पाठवणार नाहीस, जिथून तो पूर्णपणे तुटलेला आणि विस्कटून परत येईल, असे वचन दिले आहे आणि त्याचा काही दोष नाही.

३. आमचं कुटुंब तुटून जाईल

मी त्यांना तुला फोन करायला सांगतो. मी वचन देतो की मी स्वतः त्याचे पालन करीन. कृपया आज थोडी दया दाखवा. देव तुम्हाला आशीर्वाद देईल. आज माझे हृदय तोडू नकोस यार. ही एका वडिलांची वडिलांना विनंती आहे. मी माझ्या मुलांवर तुमच्यासारखेच प्रेम करतो. वडिलांच्या भावनेवर बाहेरच्या कोणत्याही व्यक्तीला प्रभाव पाडण्याची परवानगी नाही. समीर, मी एक नम्र आणि दयाळू व्यक्ती आहे. कृपया माझा स्वतःवरील आणि व्यवस्थेवरील विश्वास तोडू नका. कृपया हे आमचे कुटुंब मोडेल.मी तुझ्यावर खूप ऋणी आहे. 

४. त्याच्याशी सौम्य वागा- 

कृपया त्याच्याशी थोडे सौम्य वागा आणि माझ्या मुलाला घरी येऊ द्या. मी तुम्हाला यापेक्षा जास्त काही सांगू शकत नाही. या संपूर्ण प्रकरणातील माझे वागणे तुम्ही पाहिले असेलच. तू जे काही केलेस, मी कधीच विरोधात गेलो नाही. जेव्हा तू म्हणालास की तुला आर्यनला एक चांगला माणूस बनवायचा आहे. यावर माझा विश्वास होता. तपासादरम्यान मी माझ्या मुलाला कोणतीही मदत केली नाही. ना प्रेसमध्ये गेलो, ना मीडियात काही बोलले. कारण माझा तुझ्या चांगुलपणावर विश्वास आहे. कृपया माझ्या मुलीशी बोलू शकाल का?

५. माझा मुलगा रस्ता चुकला असेल, पण...

मी वचन देतो की येणा-या काळात तुमच्यासाठी नेहमीच असेल आणि तुम्हाला जे काही चांगले साध्य करायचे आहे त्यात तुम्हाला मदत करेन. हे माणसाने तुम्हाला दिलेले वचन आहे आणि तुम्ही मला इतके ओळखता की मी ते नक्कीच पूर्ण करेन. मी तुमच्यासमोर विनवणी करतो की माझ्यावर आणि माझ्या कुटुंबावर दया करा. आपण खूप साधी माणसं आहोत आणि माझा मुलगा भलताच भरकटला असेल पण तो कठोर गुन्हेगारासारखा तुरुंगात जाण्याच्या लायकीचा नाही. ही गोष्ट तुम्हालाही माहीत आहे. जरा प्रेम दाखवा, मी तुमच्यासमोर भीक मागत आहे.

हेही वाचा-

आर्यन खानसाठी २७ लाखांची फुकट तिकिटं अन् रेव्ह पार्टीचं...,समीर वानखेडेंच्या चॅटमधून झाले धक्कादायक खुलासे

समीर वानखेडेंचे ५ वर्षांत ६ परदेश दौरे, महागडी घड्याळे; अहवालातून धक्कादायक माहिती उघड

६. मी तुमच्याशी बोलू शकतो का...?

प्लीज मला कॉल करा मी तुमच्याशी वडिलांप्रमाणे बोलेन. इतर कोणताही मार्ग नाही. तू एक सज्जन आणि चांगला नवरा आहेस आणि मीही आहे. मला माझ्या कुटुंबाला कायद्याच्या कक्षेत राहून मदत करावी लागेल. समीर साहेब, मी तुमच्याशी एक मिनिट बोलू शकतो का?

७. माझ्या मुलाने एक चांगला धडा शिकलाय-

तू जे म्हणालास ते मी करतोय. आशा आहे की माझ्या मुलाने खूप चांगला धडा शिकला आहे, असे तुम्हाला वाटेल. आता तो त्याच्या चांगल्या भविष्यासाठी कठोर परिश्रम करेल. प्रेम आणि काळजीबद्दल धन्यवाद. इतक्या रात्री उशिरा मेसेज केल्याबद्दल क्षमस्व. मात्र वडील म्हणून यावेळी जागे होण्याचीही गरज आहे. 

८.  हे त्याला भविष्यात खूप मदत करेल

कायदा अधिकारी या नात्याने, तुम्ही आदर न गमावता आम्हाला मदत करू शकत असल्यास, कृपया करा. मी तुमचा सदैव ऋणी राहीन. मला तांत्रिकदृष्ट्या गोष्टी माहित नाहीत, परंतु जर ते तुम्हाला आणि तुमच्या विभागाला अनुकूल असेल तर. मी वचन देतो की तुम्हाला त्याच्याकडून जी काही मदत लागेल, तो तो करेल. आमच्या कुटुंबाला त्याला कोणत्याही नकारात्मक प्रतिमेशिवाय घरी आणायचे आहे. हे त्याला भविष्यात खूप मदत करेल. वडील म्हणून मी तुम्हाला फक्त विनंती करू शकतो. पुन्हा धन्यवाद.

९. माझ्या मुलाला राजकारणात अडकवू नका-

पण माझा मुलगा या सगळ्याचा भाग नाही. ही गोष्ट तुम्हालाही माहीत आहे. त्याची चूक असेल तर ती नगण्य आहे, हेही तुम्हाला माहीत आहे. त्याला समजावून सांगण्याची गरज आहे. त्याला एक चांगला माणूस बनवण्यासाठी आम्ही काही गोष्टी करू, पण कायदेशीर मार्गाने यावर आमच्यात चर्चा झाली. प्लीज, मी तुमच्यासमोर हात जोडून सांगतो की, माझ्याकडे असे काही नाही जे तुमच्या हिताचे नाही. 

१०. मुलाला मुद्दाम फसवलं जातंय-

मी तुम्हाला विनवणी करतो ही आमच्यासाठी मोठी गोष्ट आहे. या सगळ्यात माझ्या कुटुंबाला आणि मुलाला जाणीवपूर्वक गोवले जात आहे. मी सर्वांशी बोलणे टाळतो. मला काही बोलायचे नाही. त्यापेक्षा मी त्या सर्वांना विनंती केली आहे की त्यांनी माझ्या वतीने कोणतेही वक्तव्य करू नये. मी जेव्हा बोलेन तेव्हा मी सर्वांना सत्य सांगेन. मी काय केले ते सांगेन. आणि त्या विधानांमध्ये तुमची प्रतिमा मलिन होईल असे काहीही नसेल. मी शपथ घेतो सर. मी भीक मागत आहे सर माझ्या मुलाचा या सगळ्यात सहभाग नाही. 

नेमकं प्रकरण काय?

 कॉर्डिलिया क्रूझ प्रकरणात २५ कोटी रुपयांची खंडणी मागितल्याचा ठपका ठेवत आयआरएस अधिकारी समीर वानखेडे यांच्याविरोधात सीबीआयने गुन्हा दाखल केल्यानंतर आता गुरुवारी, १८ मे रोजी वानखेडे यांना सीबीआयने चौकशीसाठी समन्स जारी केले आहे. या चौकशीदरम्यान त्यांचा जबाब नोंदवला जाणार आहे. वानखेडे यांच्या विरोधात ११ मे रोजी सीबीआयने गुन्हा नोंदवला होता. तसेच त्यांच्या व त्यांच्याशी संबंधित लोकांच्या निवासस्थानी छापेमारी केली होती. कॉर्डिलिया क्रूझवरील छापेमारीदरम्यान अभिनेता शाहरुख खान याचा मुलगा आर्यन खान याला अटक केल्यानंतर नार्कोटिक्स कन्ट्रोल ब्यूरोचे (एनसीबी) तत्कालीन विभागीय संचालक समीर वानखेडे यांच्या इशाऱ्यावरून या प्रकरणात पंच असलेल्या किरण गोसावी आणि सॅम्युअल डिसोझा यांनी शाहरुख खान याच्याकडे २५ कोटी रुपयांची लाच मागितल्याचा उल्लेख सीबीआयने आपल्या एफआयआरमध्ये केला आहे.

टॅग्स :Shahrukh Khanशाहरुख खानAryan Khanआर्यन खानSameer Wankhedeसमीर वानखेडेNCBनार्कोटिक्स कंट्रोल ब्यूरो