शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
2
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
3
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
4
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
5
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
6
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
7
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
8
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
9
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
10
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
11
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
12
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
13
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
14
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
15
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
16
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
17
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
18
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
19
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
20
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
Daily Top 2Weekly Top 5

सिंचन घोटाळ्यात १० अधिकाऱ्यांविरुद्ध गुन्हे दाखल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 12, 2020 21:07 IST

विदर्भ पाटबंधारे विकास महामंडळांतर्गत गोसेखुर्द सिंचन प्रकल्पातील विविध सात कामांच्या निविदा प्रक्रियेत झालेल्या अनियमितताप्रकरणी १० अधिकाऱ्यांविरुद्ध बुधवारी नव्याने सात फौजदारी गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

ठळक मुद्देगोसेखुर्द सिंचन प्रकल्पातील सात कामांच्या निविदा प्रक्रियेत अनियमितताएसीबीच्या तक्रारीवरून सदर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : विदर्भ पाटबंधारे विकास महामंडळांतर्गत गोसेखुर्द सिंचन प्रकल्पातील विविध सात कामांच्या निविदा प्रक्रियेत झालेल्या अनियमितताप्रकरणी १० अधिकाऱ्यांविरुद्ध बुधवारी नव्याने सात फौजदारी गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. अ‍ॅन्टी करप्शन ब्युरो (एसीबी) लाचलुचपत प्रतिबंधक विभाग नागपूरच्या तक्रारीवर सदर पोलीस स्टेशन येथे हे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. एसीबीकडून मिळालेल्या माहितीनुसार, ज्या १० अधिकाऱ्यांविरुद्ध गुन्हे दाखल करण्यात आले आहेत त्यात मुख्य अभियंता सोपान रामराव सूर्यवंशी, कार्यकारी अभियंता श्रीपाद मधुकर आपटे, कार्यकारी अभियंता प्रभाकर विठ्ठलराव मोरघडे, तत्कालीन कार्यकारी अभियंता (सेवानिवृत्त) वसंत ग्यानदेव गोन्नाडे, तत्कालीन अधीक्षक अभियंता संजय लक्ष्मण खोलापूरकर, अधीक्षक अभियंता दिलीप देवराव पोहेकर, तत्कालीन कार्यकारी संचालक देवेंद्र परशुराव शिर्के, तत्कालीन कार्यकारी संचालक रोहिदास मारुती लांडगे, विभागीय लेखाधिकारी सी. टी. जिभकाटे व तत्कालीन विभागीय लेखाधिकारी गुरुदास सहादेवराव मांडवकर यांचा समावेश आहे. या अधिकाऱ्यांविरुद्ध भ्रष्टाचार प्रतिबंधक कायद्याच्या कलम १३ (१), (ड) सह १३ (२) अंतर्गत गुन्हा नोंदवण्यात आला आहे.मिळालेल्या माहितीनुसार, राज्य सरकारच्या गृह विभागाच्या आदेशानुसार विदर्भ पाटबंधारे विकास महामंडळ नागपूरअंतर्गत सिंचन प्रकल्पात झालेल्या गैरव्यवहारासंबंधी खुली चौकशी करण्याचे आदेश अ‍ॅन्टी करप्शन ब्युरोला देण्यात आले होते. त्यानुसार एसीबी महासंचालकांनी गोसेखुर्द प्रकल्पातील कामांच्या निविदा प्रक्रिया आणि त्यादरम्यान झालेल्या एकूणच गैरव्यवहाराची चौकशीचे आदेश पोलीस अधीक्षक एसीबी नागपूर यांना दिले होते. या आधारावर एसीबी अधीक्षकांची खुल्या चौकशीसाठी विशेष चौकशी पथक नेमले. या खुल्या चौकशीत सात कामांच्या निविदा प्रक्रियेत अनियमितता असल्याची व यात जलसंपदा विभागातील तत्कालीन अधिकाऱ्यांचा सहभाग असल्याचे आढळून आले. यानंतर बुधवारी सदर पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल करण्यात आली. या आधारावर सदर पोलिसांनी नव्याने सात प्रकरणात गुन्हे दाखल करण्यात आले. एसीबी नागपूरचे विशेष पथक पुढील तपास करीत आहेत.

टॅग्स :Irrigation Projectsपाटबंधारे प्रकल्पCorruptionभ्रष्टाचार