शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

आयरीश युवती हत्या प्रकरण :  आरोपी विकट भगतचा महिनाभर कोंडमारा

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 5, 2019 17:34 IST

तुरुंग महानिरीक्षकांचा आदेश : शिक्षेला सत्र न्यायालयात आव्हान

ठळक मुद्दे भगत याच्यावर आयरीश युवतीवर बलात्कार करुन नंतर तिचा खून केल्याचा आरोप आहे.सरकारी वकील व्ही. जी. कॉस्ता यांनी अशा प्रकरणात केलेले अपील सत्र न्यायालयापुढे करता येते का हे स्पष्ट करण्यासाठी 8 नोव्हेंबरपर्यंत वेळ मागून घेतला.

मडगाव - तीन वर्षापूर्वी आयरीश युवती डेनियली मॅक्लॉग्लीन हिच्या खून प्रकरणात  अटक झाल्यामुळे कुचर्चेत आलेल्या विकट भगत या काणकोणच्या युवकाचे नाव पुन्हा एकदा चर्चेत आले आहे. तो स्थानबद्ध असलेल्या कोलवाळ तुरुंगात शोध कार्यासाठी आलेल्या अधिकाऱ्यांना अटकाव केल्याच्या आरोपाखाली तुरुंग महानिरीक्षकांनी त्याला तब्बल एक महिना वेगळ्या खोलीत कोंडून ठेवण्याचा आदेश दिला आहे. भगत याच्यावर आयरीश युवतीवर बलात्कार करुन नंतर तिचा खून केल्याचा आरोप आहे.

आरोपी विकट भगत याने आपल्याला दिलेल्या या शिक्षेला सत्र न्यायालयात आव्हान दिले असून यासंबंधी आता 8 नोव्हेंबर रोजी सुनावणी होणार आहे, असा आव्हान अर्ज हाताळण्याचे अधिकार सत्र न्यायालयाला आहेत की नाहीत यावर त्या दिवशी युक्तीवाद होणार आहे. तीन वर्षाआधी काणकोण येथे एका आयरीश युवतीवर बलात्कार करुन नंतर तिचा खून करण्यात आला होता. या प्रकरणात भगत याला अटक केली असून सध्या तो कोलवाळ तुरुंगात स्थानबद्ध आहे. त्याच्या विरोधात खुनाच्या खटल्याची सुनावणी सध्या चालू आहे. या खून प्रकरणाचे पडसाद त्यावेळी संपूर्ण जगभरात उमटले होते. याची दखल घेत हा खटला कशाप्रकारे चालू आहे हे पहाण्यासाठी आयरीश दुतावासाने गॅरी कॅली या अधिकाऱ्याची नेमणूक केली आहे.

24 ऑक्टोबर रोजी तुरुंग अधिक्षक हेमंत कुमार यांनी राखीव पोलीस दलाच्या सहाय्याने कोलवाळ तुरुंगावर धाड घालून कैद्याकडे असलेले 67 मोबाईल, एक किलो गांजा व 200 विडय़ांची बंडले जप्त केली होती. यावेळी घेतल्या जाणाऱ्या झडटीला विकटने विरोध करुन शोध कामातील कर्मचाऱ्यांकडे तो उद्धटपणो वागल्याचा ठपका ठेवून तुरुंग निरीक्षक कुमार यांनी त्याला एक महिना कोंडून ठेवण्याची शिक्षा दिली होती.या आदेशाला भगत याने सत्र न्यायालयात आव्हान दिले असून ज्यावेळी झडटी घेतली गेली त्यावेळी आपण स्थानबद्ध असलेल्या कक्षात  कुठलीही निषिद्ध वस्तू सापडली नाही असा दावा करुन असे असूनही विनाकारण आपल्याला शिक्षा ठोठावल्याचा दावा केला आहे. भगत याच्याबाजूने बाजू मांडणाऱ्या वकिलानी 2006 च्या तुरुंग कायदा नियमाप्रमाणो कुठल्याही कैद्याला जास्ती जास्त 14 दिवस अशी शिक्षा देता येते. मात्र तुरुंग महानिरीक्षकांनी तब्बल एक महिना ही शिक्षा दिल्याचे म्हटले आहे. दरम्यान, सरकारी वकील व्ही. जी. कॉस्ता यांनी अशा प्रकरणात केलेले अपील सत्र न्यायालयापुढे करता येते का हे स्पष्ट करण्यासाठी 8 नोव्हेंबरपर्यंत वेळ मागून घेतला. यावेळी आयरीश दुतावासाचे अधिकारी गॅरी कॅली हेही उपस्थित होते.

टॅग्स :MurderखूनCourtन्यायालयPoliceपोलिसgoaगोवा