शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
4
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
5
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
6
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
7
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
8
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
9
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
10
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
11
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
12
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
13
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
14
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
15
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
16
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
17
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
18
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
19
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
20
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
Daily Top 2Weekly Top 5

IPL क्रिकेट सट्ट्यातील मुख्य सूत्रधारांना नागपुरात अटक; दोन दिवसांचा पीसीआर, दोन मोबाईल जप्त

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 11, 2020 18:23 IST

अमरावती गुन्हे शाखेची कारवाई

अमरावती : शहर गुन्हे शाखेच्या पथकाने यवतमाळच्या क्रिकेट बुकीचा अमरावतीतील अड्डा बुधवारी उद्धवस्त करून पाचपैकी चौघांना अटक केली. या सट्ट्यातील मुख्य बुकी तथा सूत्रधार नागपुरात असल्याची माहिती पोलिसांना मिळताच आणखी दोघांना नागपुरातून शनिवारी अटक केली. त्यांना दोन दिवसांची (पीसीआर) पोलीस कोठडी मिळाली.

मुख्य सूत्रधार, सुमित शंकर नागवाणी (३५, रा. पिरामीड सिटी फ्लॅट क्रमांक २०४ जरीपटका नागपूर), रॉकी रमेशलाल अलवाणी (३३, रा. जरीपटका, नागपूर), अशी आरोपींची नावे आहेत. त्यांच्याकडून गुन्हे शाखेच्या पथकाने दोन महागडे मोबाईल जप्त केले. ही कारवाई पोलीस आयुक्त आरती सिंह यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक कैलाश पुंडकर व पथकाने केली. आयपीएल क्रिकेटच्या बुकी यवतमाळ, अकोला, अमरावतीसह नागपुरात कनेक्शन असल्याचे या कारवाईतून उघड झाले. शहरातील खोलापुरीगेट ठाण्यांतर्गत साईनगरनजीकच्या विश्रामनगरातील रागेश्री अपार्टमेंटमधील अवघड यांच्या फ्लॅटमध्ये पथकाने ७ ऑक्टोबरच्या रात्री धाड टाकून चौघांना अटक केली. त्यांकडून ६ लाख ६५ हजार २९० रुपयांचे जुगार साहित्य जप्त  केले.

याप्रकरणी रमेश सुगनचंद कटारीया (४१), अविनाश विजयकुमार प्रेमचंदाणी (४६, दोन्ही रा. वैद्यनगर, सिंधी कॅम्प आर्णी रोड यवतमाळ), आकाश राजू विरखेडे (२४, रा. एकतानगर वाघापूर, यवतमाळ), राजकुमार ईश्वरलाल गेही (४०, सिंधी कॅम्प अकोला) यांना पोलिसांनी अटक केली होती. त्यांच्या ताब्यातून नगदी ५९,४६० रुपये, १२  मोबाईल, कार, दुचाकी, लॅपटॉप असा एकूण ६ लाख ६५ हजार २९० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला होता.  तसेच सुरेश महादेवराव अवघड याने आयपीएल जुगार सट्टा खेळण्याकरिता स्वत:चा फ्लॅट उपलब्ध करून दिल्याने मुख्य आरोपी व फ्लॅट  मालकाविरुद्ध विविध कलमान्वये गुन्हा नोंदविला. चारही आरोपींना ११ आॅक्टोंबरपर्यंत पीसीआर मिळाला. दरम्यान अटकेतील आरोपींनी मुख्य सूत्रधार नागपुरात असल्याची कबुली दिली. मुख्य बुकीकडून गुन्ह्यात आणखी कुणाचा सहभाग व राज्यात कुठेकु ठे आयपीएल सट्ट्याचे कनेक्शन आहे, याचा शोध पोलीस घेत आहे.

टॅग्स :IPL 2020IPL 2020Policeपोलिस