शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
2
शस्त्रसंधीमुळे अदानी-अंबानींवर डॉलर्सचा पाऊस; जगातील श्रीमंतांच्या यादीत स्थान वधारले
3
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
4
युद्ध की शांतता? अमेरिकेला काहीतरी एक निवडावं लागेल, इराणचा थेट इशारा; लेबनॉनवरून पेच वाढला!
5
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
6
NATO देशांना ट्रम्प यांनी सुनावले, मदत न केल्याने व्यक्त केली तीव्र खंत; इशारा देत म्हणाले...
7
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
8
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
9
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
10
वैमानिकांच्या नव्या वेळापत्रकाला स्थगिती; मनुष्यबळ कमतरतेमुळे डीजीसीएचा निर्णय
11
एक लाख तीन हजार कोटींची वीजग्राहकांकडे थकबाकी; कृषी ग्राहकांनी थकवले ८० हजार कोटी
12
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
13
विशेष लेख: पंजाबमधल्या भगव्या छावणीत आता ‘काँग्रेसयुक्त भाजप’!
14
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
15
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
16
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
17
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
18
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
19
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
20
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
Daily Top 2Weekly Top 5

आयएनएक्स मीडिया घोटाळा : पी. चिदंबरम यांना ईडीच्या कोठडीत पाठविण्यास दिला नकार

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 30, 2019 18:36 IST

आरोग्याच्या विचार करता त्यांना घरचं जेवण देण्यास कोर्टानं मुभा दिली आहे.

ठळक मुद्दे तिहार जेलमध्ये १६ ऑक्टोबरला सकाळी ईडीच्या तीन सदस्यांच्या टीमकडून त्यांची चौकशीदरम्यान त्यांना अटक करण्यात आली होती. कोर्टाकडे चिदंबरम यांची आणखी एक दिवस चौकशी करण्याची ईडीनं परवानगी मागितली होती.

नवी दिल्ली -  आयएनएक्स मीडिया घोटाळ्याप्रकरणी माजी अर्थ मंत्री पी. चिदंबरम यांचा कोर्टानं जामीन अर्ज फेटाळला असून त्यांना १३ नोव्हेंबरपर्यंत न्यायालयीन कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले आहेत. कोर्टाकडे चिदंबरम यांची आणखी एक दिवस चौकशी करण्याची ईडीनं परवानगी मागितली होती. ती देखील कोर्टानं फेटाळून लावली. मात्र, त्यांच्या आरोग्याच्या विचार करता त्यांना घरचं जेवण देण्यास कोर्टानं मुभा दिली आहे.पी. चिदंबरम यांना चौकशीनंतर 'ईडी'कडून अटक करण्यात आली आहे. १६ ऑक्टोबरला ईडीने चिदंबरम यांना अटक केली आहे. तिहार जेलमध्ये १६ ऑक्टोबरला सकाळी ईडीच्या तीन सदस्यांच्या टीमकडून त्यांची चौकशीदरम्यान त्यांना अटक करण्यात आली होती. विशेष न्यायालयाने मंगळवारी (15 ऑक्टोबर) ईडीला पी चिदंबरम यांची चौकशी करण्याची तसेच आवश्यकता असल्यास अटकेची परवानगी दिली होती. ईडीने पी चिदंबरम यांच्या अटकेची मागणी केली होती. यावर न्यायालयाने त्यांना चौकशीची परवानगी दिली. तसेच चौकशीदरम्यान हाती लागलेल्या माहितीच्याआधारे अटक करण्याचा निर्णय ईडी घेऊ शकते असेही सांगितले होते. तिहार जेलमध्ये चौकशी करण्यासाठी ईडीचे पथक दाखल झाले होते. त्यानंतर आता अटक करण्यात आली आहे.दरम्यान, २८ ऑक्टोबरला अचानक प्रकृती बिघडल्याने चिदंबरम यांना एम्समध्ये दाखल करण्यात आलं होतं. तेथे वैद्यकीय तपासणीनंतर त्यांचा रुग्णालयातून सोडून देण्यात आलं होतं. त्यांना पोटदुखीचा त्रास झाला होता. त्यांची प्रकृती आता ठीक असल्याने रुग्णालयातून सोडण्यात आलं आहे. पी. चिदंबरम यांना सुप्रीम कोर्टाने २२ ऑक्टोबरला जामीन मंजूर केला होता. सीबीआयच्या एका प्रकरणात एक लाख रुपयांच्या वैयक्तिक जातमुचलक्यावर पी. चिदंबरम यांना हा जामीन मिळाला होता. मात्र, जामीन मिळूनही चिदंबरम तिहार तुरुंगातच होते. कारण चिदंबरम हे ईडीच्या कोठडीत होते. आयएनएक्स मीडिया प्रकरणात सीबीआय आणि ईडीने त्यांच्याविरोधात वेगवेगळे खटले दाखल केलेले आहेत.

टॅग्स :P. Chidambaramपी. चिदंबरमCourtन्यायालयEnforcement Directorateअंमलबजावणी संचालनालय