शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणसोबत युद्धविराम करून ट्रम्प यांनी युद्धातून अंग काढले; आता इस्रायलला चुकवावी लागणार किंमत
2
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
3
इराण-अमेरिका युद्धबंदीने जग सुखावलं, पण 'हा' देश भडकला! पाकिस्तानच्या 'त्या' खेळीमुळे मित्रराष्ट्र नाराज
4
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
5
‘तुमच्या बापात दम असेल तर आमच्याकडून वंदे मातरम् वदवून दाखवा’, काँग्रेस नगरसेविकेचं भाजपाला अव्हान, इंदूर महानगरपालिकेत गदारोळ
6
अवघ्या १५ वर्षांचा मुलगा जगाला नडतोय; मुंबई-राजस्थान सामन्यात भज्जीचा वैभव सूर्यवंशीला सॅल्यूट
7
सीजफायर लागू होताच पहिल्या देशाने आपली एअरस्पेस खुली केली, विमानतळही सुरु झाले...
8
Latest Marathi News Live: सुनेत्रा पवार मुख्यमंत्री फडणवीसांच्या भेटीला; बारामती निवडणुकीवर चर्चा
9
IndiGo, Air India ला संजीवनी; 'या' शुल्कात मोठी कपात, तिकिटांचे दर कमी होणार?
10
'धुरंधर'साठी गौरव गेराचं असं झालं ऑडिशन, 'त्या' सीननंतर मिळाली आलम भाईची भूमिका
11
Akshaya Tritiya 2026 Date: यंदा अक्षय तृतीया कधी आहे? १९ की २० एप्रिल? 'या' शुभ मुहूर्तावर करा सोने खरेदी; वाचा सविस्तर
12
Car Gift: बक्षीस असावं तर असं...! चेन्नईतील कंपनीने १२ मेहनती कर्मचाऱ्यांना दिली लग्झरी AUDI भेट
13
TATA च्या 'या' शेअरमध्ये तुफान तेजी; एका झटक्यात ११०० कोटींनी वाढली रेखा झुनझुनवालांची संपत्ती
14
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे कोणी कोणी केले कौतुक? अमेरिका-इराण युद्धविरामाचे जगभरातून स्वागत! ट्रम्प यांच्या भाषेवर ऑस्ट्रेलियाची टीका
15
२१ लाख गुंतवणूकदारांसाठी खुशखबर! LIC पहिल्यांदाच देऊ शकते बोनस शेअर्स; 'या' दिवशी घोषणा होण्याची शक्यता
16
इराणच्या 'पीस प्लॅन'मध्ये मोठा घोळ! फारसी आणि इंग्रजी मसुद्यात आढळला फरक; युरेनियमच्या अटीवरून संभ्रम वाढला
17
इराणमधील युद्धविरामावर भारताची पहिली प्रतिक्रिया आली समोर, निर्णयाचं स्वागत करत व्यक्त केली अशी अपेक्षा 
18
'चमका हिंदुस्तान हमारा!'; अणुऊर्जा क्षेत्रात भारताचा 'करिश्मा'! रशियानंतर भारत दुसरा देश ठरला, ४०० वर्षांपर्यंत टेन्शन संपणार
19
'राधानगरी'त तीन अस्वले ट्रॅप कॅमेऱ्यात कैद; जैवविविधता अधोरेखितः परिसंस्थेतील महत्त्वाचा घटक
20
सस्पेन्स कायम! भारतीयांनो, इराण तात्काळ सोडा; युद्धविरामानंतर काही तासांत भारताने जारी केली सूचना
Daily Top 2Weekly Top 5

नशेत होतो, काय घडले ते आठवत नाही; खार हत्याप्रकरणात संशयितांची माहिती

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 3, 2021 07:12 IST

Murder news: जान्हवीची हत्या झाली त्या दिवशी संध्याकाळी साडेसात वाजेपर्यंत श्री व दिया हे तिच्या घरी वडिलांचा वाढदिवस साजरा करत होते. हे दोघेही तिचे जवळचे मित्र आहेत.

लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : खारमध्ये जान्हवी कुकरेजा (१९) या विद्यार्थिनीची हत्या केल्याच्या आरोपाखाली पाेलिसांनी श्री जोगधनकर आणि दिया पडळकर यांना अटक करून त्यांची चौकशी सुरू केली आहे. मात्र नशेत असल्याने त्या रात्री काय घडले याबाबत काहीच आठवत नसल्याचे त्यांनी सांगितले.

जान्हवीची हत्या झाली त्या दिवशी संध्याकाळी साडेसात वाजेपर्यंत श्री व दिया हे तिच्या घरी वडिलांचा वाढदिवस साजरा करत होते. हे दोघेही तिचे जवळचे मित्र आहेत. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, भगवती हाईट्स इमारतीच्या टेरेसवर ३१ डिसेंबरच्या रात्री सुरू असलेल्या पार्टीत जवळपास १२ जण होते. श्री हा अन्य मुलींच्या जवळ जात होता हे जान्हवीला आवडत नव्हते. त्यातच तिने त्याला दियासोबत आक्षेपार्ह अवस्थेत पाहिले.

याच कारणावरून त्यांच्यात वाद झाला. दोघांनी तिला बेदम मारहाण केली. केसांना धरून शिड्यांवरून फरफटत नेले, अशी माहिती आहे. मात्र याला अद्याप अधिकृत दुजोरा मिळालेला नाही. दरम्यान, जान्हवीचे डोके रेलिंगला जोरात आपटल्याने तिच्या कवटीला दुखापत झाली आणि वेळेत उपचार मिळू न शकल्याने तिचा मृत्यू झाल्याचे उघड झाले आहे. मारहाणीनंतर दिया आणि श्री हे उपचारासाठी वेगवेगळ्या दवाखान्यांत निघून गेले.

...तर माझी मुलगी वाचली असतीजान्हवीचे मित्र तिला पार्टीसाठी घेऊन गेले आणि ५ वाजता मला तिच्या मृत्यूची बातमी समजली. तिने सव्वादोनच्या सुमारास अखेरचा श्वास घेतला, तोपर्यंत ती रक्ताच्या थारोळ्यात निपचित पडली होती. पण, एकानेही याबाबत आम्हाला कळविले नाही. वेळेत उपचार मिळाले असते तर माझी मुलगी वाचली असती. उच्च शिक्षणासाठी विदेशात जाण्याची तयारी करणारी माझी मुलगी आम्हाला कायमची सोडून गेली, असे जान्हवीची आई निधी कुकरेजा यांनी खार पोलीस ठाण्याजवळ रडतच सांगितले.

टॅग्स :MurderखूनPoliceपोलिस