शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
2
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
3
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
4
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
5
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
6
पत्नी प्रियकरासोबत फिरताना दिसली, जाब विचारताच झालं उलट! दोघांनी मिळून पतीला हाणलं
7
Hanuman Mantra: घराबाहेर पडताना, वाहन चालवताना ११ वेळा म्हणा 'हा' दिव्य सुरक्षा कवच मंत्र; हनुमान करतील रक्षण!
8
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
9
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
10
राहुल गांधी एकाकी?, LPG मुद्द्यावर काँग्रेसमध्ये फूट पडल्याचं चित्र; नेते करताहेत PM मोदींचे कौतुक
11
सर्वसामान्यांना मोठा दिलासा! किरकोळ चुकांसाठी आता पोलीस कोठडी नाही; 'जन विश्वास' कायद्याने चित्र बदलले!
12
IPL 2026, DC v MI Head To Head Record : दिल्ली कॅपिटल्सपेक्षा मुंबई इंडियन्स भारी, पण...
13
Rupa Bayor : धाकड गर्ल! तायक्वांदो जागतिक क्रमवारीत टॉप-५ मध्ये झेप घेणारी रूपा बायोर पहिली भारतीय
14
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
15
मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याबाबत ११४७ एकरचा दावा चुकीचा, बदनामी प्रकरणी FIR दाखल
16
लक्ष्मी ऑरगॅनिक विरोधातील संघर्षाला व्यापक स्वरूप; आंदोलकांनी मुंबईत घेतली राज ठाकरेंची भेट
17
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
18
'धुरंधर'चं तुफानी यश, रणवीर सिंहसोबत पुन्हा काम करणार आदित्य धर? पुढील प्रोजेक्ट्सची चर्चा
19
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
20
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
Daily Top 2Weekly Top 5

आंतरराज्यीय बुलेट चोरांची टोळी जेरबंद; राज्यभरातील ६४ गुन्ह्यांची उकल 

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 29, 2021 16:47 IST

Bullet Robber gang Arrested : बनावट कागदपत्राद्वारे विक्री 

ठळक मुद्देबुलेटप्रेमींकडून असलेली मागणी व चोरणे शक्य असल्याने त्यांच्याकडून केवळ बुलेटची चोरी केली जात होती. 

नवी मुंबई : राज्याच्या अनेक भागातून बुलेट चोरी करणाऱ्या टोळीला गुन्हे शाखा पोलिसांनी अटक केली आहे. त्यांच्याकडून ६४ गुन्ह्यांची उकल झाली असून त्यामधील १ कोटी रुपये किमतीच्या ४४ बुलेट जप्त करण्यात आल्या आहेत. बुलेटप्रेमींकडून असलेली मागणी व चोरणे शक्य असल्याने त्यांच्याकडून केवळ बुलेटची चोरी केली जात होती. 

 

लॉकडाऊन च्या कालावधीत व त्यानंतर होणाऱ्या वाहन चोरीत बुलेट चोरीचे प्रमाण वाढले होते. त्यामुळे अपर आयुक्त डॉ. बी. जी. शेखर पाटील, उपायुक्त प्रवीणकुमार पाटील, सहायक आयुक्त विनोद चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखा कक्ष एकचे वरिष्ठ निरीक्षक सुनील शिंदे यांनी विशेष तपास पथक तयार केले होते. त्यात सहायक निरीक्षक राहुल राख, रुपेश नाईक, राजू तडवी, हर्षल कदम, भगवान तायडे, रोहिदास पाटील, निलेश किंद्रे, शशिकांत जगदाळे, रवींद सानप आदींचा समावेश होता. त्यांनी २२ जानेवारीला वाशी सेक्टर १७ परिसरात सापळा रचला होता. यावेळी सोहेल इम्तियाज शेख (२८) व सौरभ मिलिंद करंजे (२३) यांना संशयास्पदरित्या वावरताना ताब्यात घेतले असता त्यांनी बुलेट चोरीच्या उद्देशाने आल्याची कबुली दिली त्यानुसार दुसऱ्या दिवशी त्यांचा मुख्य साथीदार  अमोल ढोबळे (३५) याला महापे एमआयडीसी परिसरातून अटक केली. ढोबळे हा टोळीचा सूत्रधार असून तोच बुलेटची चोरी करायचा. 

ज्या नव्या कोऱ्या बुलेट चा हँडल लॉक नसेल अशी बुलेट तो अर्ध्या मिनिटात चोरी करायचा. यासाठी ३०० रुपयाच्या इग्निशन किटचा वापर केला जायचा. जी गाडी चोरायची असेल त्याचे किट काढून नवे किट बसवताच ती गाडी चालू व्हायची. इतर दुचाकींच्या तुलनेत बुलेट चे इग्निशन किट बदलणे सहज सोपे असल्याने व मागणी असल्याचा फायदा ते घेत होते. अशा प्रकारे त्यांनी सप्टेंबर २०२० पासून ते जानेवारी पर्यंत राज्यभरातून ६४ बुलेट चोरल्याचे पोलीस आयुक्त बिपीनकुमार सिंह यांनी पत्रकार परिषदेत सांगितले. ढोबळेचे दोन साथीदार रिकव्हरी एजन्ट बनून चोरीच्या बुलेटची कमी किमतीत विक्री करायचे.  यासाठी त्यांनी गाडीच्या बनावट कागदपत्रांसह बनावट आरसी व इन्शुरन्स पेपर देखील तयार केले होते. त्यापैकी १ कोटी ३० हजार रुपये किमतीच्या ४४ बुलेट जप्त करण्यात आल्या आहेत. नवी मुंबईसह ठाणे, पिंपरी चिंचवड, पुणे, गोवा, अहमदनगर याठिकाणी या गाड्या विकण्यात आल्या होत्या. 

        

 

बुलेटची चोरी सोपी

बुलेटचे इंजन सुरु करण्यासाठी इग्निशन किट बदलले जायचे. हे किट बाजारात अवघ्या ३०० रुपयांना मिळते. इतर दुचाकींच्या तुलनेत बुलेटचे किट बदलने सोपे असल्याने या टोळीकडून केवळ बुलेटची चोरी केली जात होती असे तपास अधिकारी वरिष्ठ निरीक्षक सुनील शिंदे यांनी सांगितले. 

 

उघड झालेले गुन्हे 

नवी मुंबई १२, ठाणे शहर १४, पिंपरी चिंचवड १२, मुंबई ३, पुणे शहर १, पुणे ग्रामीण १, अहमदनगर १, गोवा १.        

टॅग्स :ArrestअटकNavi Mumbaiनवी मुंबईPoliceपोलिसRobberyचोरी