शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
3
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
4
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
5
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
6
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
7
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
8
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
9
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
10
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
11
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
12
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
13
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
14
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
15
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
16
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
17
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
18
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
19
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
20
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
Daily Top 2Weekly Top 5

श्रद्धाच्या कॉलेजच्या मित्राची चौकशी, गुन्हे प्रकटीकरण शाखेने नोंदविला जबाब

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 26, 2022 13:55 IST

रजत हा श्रद्धाचा कॉलेजमधील मित्र असून, त्याच्या चौकशीतून या प्रकरणाबाबत माहिती मिळू शकते. वसई गुन्हे प्रकटीकरण शाखेने शुक्रवारी रजत याला बोलावून घेऊन त्याची चौकशी केली.

वसई : वसईतील तरुणी श्रद्धा वालकर हिच्या दिल्लीत झालेल्या निर्घृण हत्येनंतर दररोज वेगवेगळे खुलासे होत असून, दिल्ली आणि माणिकपूर पोलिसांचा तपास सुरूच आहे. दरम्यान, वसईच्या गुन्हे प्रकटीकरण शाखेकडून श्रद्धाचा कॉलेजचा मित्र रजत शुक्ला याची शुक्रवारी चौकशी करण्यात आली.रजत हा श्रद्धाचा कॉलेजमधील मित्र असून, त्याच्या चौकशीतून या प्रकरणाबाबत माहिती मिळू शकते. वसई गुन्हे प्रकटीकरण शाखेने शुक्रवारी रजत याला बोलावून घेऊन त्याची चौकशी केली. दरम्यान, आरोपी आफताब पुनावाला हा श्रद्धा हिला सिगारेटचे चटके देत होता, अशीही माहिती पुढे येत आहे. प्रेमात असलेली आणि ‘लिव्ह इन’मध्ये राहणारी व्यक्ती मारहाण आणि सिगारेटचे चटके देत असतानाही श्रद्धा त्याच्याबरोबर का राहत होती, असा प्रश्न यानिमित्ताने व्यक्त होत आहे. मात्र, श्रद्धा ही आफताबच्या प्रेमात आकंठ बुडालेली होती तसेच तिने आपल्या कुटुंबाबरोबरचे संबंध तोडलेले होते. यामुळे ती मारहाण आणि सिगारेटचे चटके सहन करीतच त्याच्याबरोबर राहत होती. ती त्याला सुधारण्याची एक संधी देऊ पाहत होती, असे तिच्या मित्रांकडून सांगण्यात येत आहे.

सिगारेटचे चटके -श्रद्धाचा कॉलेजमधील मित्र रजत याने एका वृत्तवाहिनीला दिलेल्या माहितीनुसार, श्रद्धाने आपल्या कुटुंबाबरोबर आणि मित्रांबरोबरचे संबंध तोडून टाकले होते. श्रद्धाने २०२१ मध्ये आपल्या मित्रांना मारहाणीचा आणि सिगारेटचे चटके दिलेला एक फोटो शेअर केला होता. त्यात तिच्या पाठीवर सिगारेटचे चटके होते, असे रजतचे म्हणणे आहे. याबाबत अधिक चौकशीसाठी पोलिसांनी त्याचा जबाब नोंदवून घेतला असल्याचे सांगण्यात आले.

टॅग्स :Shraddha Walker Murder Caseश्रद्धा वालकरCrime Newsगुन्हेगारीMumbaiमुंबई