शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

बँक ग्राहकांना गंडा घालणारी आंतरराज्य टोळी जेरबंद, पोलिसांची तुळजापुरात कारवाई

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 2, 2021 11:04 IST

Crime News: बँकेतून रक्कम काढण्यासाठी आलेल्या ग्राहकांना हातोहात गंडा घालणाऱ्या रवी गुंज्या (२५, रा. कप्पराल थिप्पा, ता. काविल, जि. बेल्लोर, आंध्र प्रदेश) याच्यासह चौघा जणांच्या टोळीला कापूरबावडी पोलिसांनी सोमवारी तुळजापूर येथे अटक केली.

ठाणे  - बँकेतून रक्कम काढण्यासाठी आलेल्या ग्राहकांना हातोहात गंडा घालणाऱ्या रवी गुंज्या (२५, रा. कप्पराल थिप्पा, ता. काविल, जि. बेल्लोर, आंध्र प्रदेश) याच्यासह चौघा जणांच्या टोळीला कापूरबावडी पोलिसांनी सोमवारी तुळजापूर येथे अटक केली. त्यांच्याकडून नऊ मोबाइल, ५० हजारांची रोकड आणि मोटारसायकल असा दोन लाख २९ हजार ९०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केल्याची माहिती सहायक पोलीस आयुक्त नीलेश सोनवणे यांनी बुधवारी दिली.  ठाण्यातील मनोरमानगर येथील रहिवासी प्रमोदकुमार झा (५७) हे मनोरमानगरातील ब्लॉसम हायस्कूलमध्ये नोकरीला आहेत. त्यांनी १५ नोव्हेंबर रोजी या शाळेतील शिक्षकांच्या पगाराची एक लाख ४३ हजार २३० रुपयांची रक्कम वसंतविहार येथील एचडीएफसी बँकेच्या सिद्धांचल शाखेतून काढून ती पिशवीमध्ये ठेवली. हीच पिशवी घेऊन ते दुपारी २ वाजण्याच्या सुमारास रिक्षातून उतरून शाळेत जात होते. त्याचवेळी एका मोटारसायकलीवरून तोंडाला मास्क लावून आलेल्या दोघा लुटारूंनी त्यांच्याकडील  रक्कम असलेली पिशवी घेऊन पलायन केले. या प्रकरणी जबरी चोरीचा गुन्हा दाखल केला होता. वरिष्ठ पोलीस निरीक्षक उत्तम सोनावणे, संजय निंबाळकर आणि निरीक्षक प्रियत्तमा मुठे यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे प्रकटीकरण पथकाचे सहायक पोलीस निरीक्षक एस. एन. पिंपळे, पोलीस नाईक अभिजित कलगुटकर आणि भरत घाटगे आदींच्या पथकांनी यातील रवी गुंज्या याच्यासह शरीषकुमार पिटला (२९, रा. कप्पराल थिप्पा, जि. नेल्लोर, आंध्र प्रदेश), मोजेस ऊर्फ नानी गोगुला (२७, रा. कप्पराल थिप्पा, जि. नेल्लोर, आंध्र प्रदेश) आणि रघुवरण आकुला (२२, रा. आंध्र प्रदेश)  या चार जणांच्या टोळीला २९ नोव्हेंबर रोजी तुळजापूर येथून अटक केली.  त्यांना ४ डिसेंबरपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश ठाणे न्यायालयाने दिले आहेत.  त्यांच्याकडून नाशिकमधील तोफखाना आणि कोतवाली पोलीस ठाण्यातील एका जबरी चोरीसह सहा चोरीचे गुन्हे उघडकीस आले आहेत. त्यांनी  चौकशीमध्ये मुंब्रा येथील पाच लाख ९५ हजारांच्या दोन चोऱ्या, कामोठे येथील सहा लाख २५  हजारांच्या तसेच तळोजा आणि पनवेल येथील अनुक्रमे दोन लाख ८० हजारांची आणि तीन लाखांची अशा पाच लाख ८० हजारांच्या चोरीचीही कबुली दिली. याशिवाय, त्यांनी कल्याण, डोंबिवली परिसरातही अशाच प्रकारे चोऱ्या केल्याची बाब समोर आली आहे. त्यांच्याकडून जबरी चोरीतील सोन्याचे मंगळसूत्रासह दोन लाख २९ हजारांचा मुद्देमाल जप्त केला आहे.  

असा लागला सुगावा या टोळीने ठाण्यातील प्रमोदकुमार झा यांच्याकडे जबरी चोरी केल्यानंतर ते एका मोटारसायकलवरून पसार झाले होते. त्याच मोटारसायकलीचा पोलिसांनी शोध घेतल्यानंतर तुळजापूरला पळालेल्या या टाेळीचा सुगावा लागला. याच नेल्लोर जिल्ह्यातील अनेक गावांमध्ये अशाच प्रकारे चोऱ्या करणाऱ्या आणखी काही टोळ्या कार्यरत असल्याचीही माहितीही तपासात समोर आली आहे.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीthaneठाणे