लोकमत न्यूज नेटवर्क मुंबई : मुंबई विमानतळावर दोन स्वतंत्र प्रकरणात सीमा शुल्क विभागाच्या अधिकाऱ्यांनी दुर्मीळ प्रजातींच्या प्राणी व पक्ष्यांच्या तस्करीचा पर्दाफाश केला आहे. या प्रकरणी दोन व्यक्तींना अटक करण्यात आली आहे. हे दोघेजणही बँकॉक येथून मुंबईत आले होते.
अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, पहिल्या प्रकरणामध्ये एका व्यक्तीबद्दल अधिकाऱ्यांनी पक्की माहिती होती. ही व्यक्ती मुंबई विमानतळावर दाखल झाल्यानंतर अधिकाऱ्यांनी त्याची चौकशी करीत त्याच्या सामानांची तपासणी केली असता त्याच्या बॅगेमध्ये तीन मिरकत प्राणी आढळून आले.
यापैकी एक मृतावस्थेत, तर दोन जिवंत होते तर त्याचसोबत एक दुर्मीळ पोपटदेखील होता. दुसऱ्या प्रकरणात दोन ससे, एक पोपट (मृत) आणि एक कासव आढळले. हे प्राणी पक्षी जप्त करून त्यांची वैद्यकीय तपासणी करून त्यांना त्यांच्या मूळ अधिवासात पाठविण्यात आले आहे.