शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
2
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
3
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
4
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
5
कोण आहे ५ कोटींचे बक्षीस असलेला मिसिर बेसरा? ज्याच्या खात्म्यासाठी ३ हजार जवानांचा जंगलाला वेढा
6
३,००० कोटींचे कंत्राट मिळताच डिफेन्स शेअरमध्ये ५%ची उसळी; वर्षात गुंतवणूकदारांना १७७०% परतावा
7
तामिळनाडू, केरळ, आसाम, बंगालमध्ये समीकरणे बदलली, कोण बाजी मारणार? धक्कादायक ओपिनियन पोल
8
Anjali Damania : अजित पवारांच्या अपघातादिवशी भोंदू खरातच्या मोबाईलवर १९ मेसेज; अंजली दमानिया यांचा दावा
9
१ घर, एक कर्मचारी अन् AI ची जादू; १८ लाख गुंतवून तब्बल २८ कोटींची कमाई करतोय 'हा' युवक
10
नव्या कामगार कायद्यानं ग्रॅच्युईटी वाढणार; काय आहे नवा फॉर्म्युला, कोणावर किती होणार परिणाम?
11
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
12
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
13
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
14
किंमती गगनाला भिडल्या तरीही पायलटनं कोट्यवधीचं तेल समुद्रात ओतले; कारण ऐकून कराल कौतुक
15
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
16
दिल्ली विधानसभेत का घुसवली कार? पोलिसांच्या चौकशीत सरबजीतने केला धक्कादायक खुलासा! म्हणाला..
17
मरीन ड्राइव्ह अपघात निष्काळजीपणामुळेच, सदोष मनुष्यवधाचा गुन्हा वगळला: उच्च न्यायालय
18
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
19
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
20
Health Tips: कंबर, मान आणि खांदे दुखीने हैराण? उशीचा 'असा' वापर करा, वेदनांपासून कायमची सुटका मिळवा!
Daily Top 2Weekly Top 5

लातुरातील कारागृहात कैद्याची आत्महत्या, शाैचालयातच घेतली गळफास

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 10, 2021 17:30 IST

Crime News: लातूर येथील जिल्हा कारागृहात एका कैद्याने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना शनिवारी पहाटे पाच वाजण्याच्या सुमारास घडली.

लातूर - येथील जिल्हा कारागृहात एका कैद्याने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना शनिवारी पहाटे पाच वाजण्याच्या सुमारास घडली. निलंगा तालुक्यातील औराद शहाजानी पाेलीस ठाण्यात त्याच्याविराेधात बाललैंगिक अत्याचार प्रतिबंधक कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला हाेता. दरम्यान, या गुन्ह्यात लातूरच्या जिल्हा कारागृहात बंदिस्त असलेल्या बजरंग शेषेराव पवार (२०, रा. जामगा ता. निलंगा) याने कारागृहातील शाैचालयातच गळफास घेवून आत्महत्या केली. याबाबत एमआयडीसी पाेलीस ठाण्यात घटनेची नाेंद करण्यात आली आहे. 

सूत्रांनी सांगितले, मयत बजरंग पवार आणि त्याचा चुलत भाऊ हे कलम ३७६ व पाेस्काेअंतर्गत लातूर जिल्हा कारागृहात १५ जूनपासून बंदिस्त हाेते. दरम्यान, या गुन्ह्यातून आपण लवकर काही बाहेर पडू शकरणार नाही, असे बजरंगला सतत वाटत असत. यातूनच त्याच्यामध्ये नैराश्याची भावना निर्माण झाली असावी. शनिवारी पहाटे पाच वाजण्याच्या सुमारास ताे शाैचालयात म्हणून गेला आणि तेथेच गळफास घेऊन आत्महत्या केली. याबाबत एमआयडीसी पाेलीस ठाण्यात नाेंद करण्यात आली आहे.

टाॅवेल फाडून तयार केला दाेर...बजरंग पवार हा गत आठ दिवसांपासून आपल्या भावाशी फारसे काही बाेलत नव्हता. मात्र, आपल्यावर दाखल असलेल्या गुन्ह्यातून लवकर बाहेर पडणे आता शक्य नाही, असे त्यास सतत वाटत हाेते. यातूनच बजरंग याने आपल्या कमरेला असलेले टावेल शाैचालयात गेल्यानंतर फाडले आणि त्यापासून दाेर तयार केला. त्यानंतर गळफास घेत आपली जीवनयात्रा संपविली. असे लातूर येथील कारागृह अधीक्षक राहुल झुटाळे यांनी सांगितले.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीlaturलातूर