शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
3
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
4
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
5
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
6
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
7
'आमच्या बाई आम्हाला परत द्या', विद्यार्थ्यांचा टाहो; जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर चिमुरड्यांचा ठिय्या
8
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
9
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
10
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
11
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
12
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
13
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
14
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
15
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
16
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
17
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
18
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
19
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
20
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
Daily Top 2Weekly Top 5

गुजरातमध्ये हाथरसची पुनरावृत्ती, रेल्वे ट्रॅकवर सापडली जखमी तरुणी

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 13, 2020 18:33 IST

Crime News : एकीकडे हाथरसमधील सामूहिक बलात्काराच्या घटनेवरून देशभरात संतापाचे वातावरण असताना गुजरातमधील सूरतमधील पलसाणामध्ये गंगाधरा येथील गंगापूर रेल्वे ट्रॅकवर एक तरुणी बेशुद्धावस्थेत सापडली आहे.

ठळक मुद्देगुजरातमधील सूरत येथे रेल्वे ट्रॅकवर एक तरुणी जखमी अवस्थेत सापडली तिच्या प्रायवेट पार्टमधून रक्तस्त्राव होत होतातरुणीच्या शरीरावर अनेक जखमा आहेत. तिच्या शरीराला तीन ठिकाणी फ्रॅक्चर झालेले आहे

मुंबई - गुजरातमधील सूरत येथे हाथरसमधील सामूहिक बलात्काराच्या घटनेची पुनरावृत्ती झाली आहे. येथील रेल्वे ट्रॅकवर एक तरुणी जखमी अवस्थेत सापडली आहे. या तरुणीला त्वरित रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या तरुणीवर रुगणालयात उपचार सुरू आहे. डॉक्टरांनी या तरुणीवर उपचार सुरू केले असून, तिची वैद्यकीय चाचणी करण्याची तयारी सुरू आहे.एकीकडे हाथरसमधील सामूहिक बलात्काराच्या घटनेवरून देशभरात संतापाचे वातावरण असताना गुजरातमधील सूरतमधील पलसाणामध्ये गंगाधरा येथील गंगापूर रेल्वे ट्रॅकवर एक तरुणी बेशुद्धावस्थेत सापडली आहे. ती गंभीररीत्या जखमी झालेली होती. त्यानंतर कुणीतरी एक महिला पडली असल्याची माहिती कंट्रोल रूमला दिली. त्यानंतर या तरुणीला त्वरित सिव्हील रुग्णालयात पाठवण्यात आले. तिची गंभीर अवस्था पाहून अ‍ॅम्ब्युलन्समधील कर्मचारीसुद्धा हादरले होते.पीडित तरुणीच्या एका हाताला आणि एका पायाला दुखापत झाली होती. तिच्या ओठांवर जखमा होत्या. तसेच तिच्या प्रायवेट पार्टमधून रक्तस्त्राव होत होता. तरुणीवर उपचार करणारे चिफ मेडिकल ऑफिसर डॉ. ओमकार चौधरी यांनी सांगितले की, तरुणीच्या शरीरावर अनेक जखमा आहेत. तिच्या शरीराला तीन ठिकाणी फ्रॅक्चर झालेले आहे. तसेच तिच्या गुप्तांगामध्ये मोठी जखम झाली आहे. त्यामुळे ही अपघाताची घटना असू शकत नाही. या तरुणीसोबत काही वाईट घडले असण्याची शंका आहे.दरम्यान, या तरुणीसोबत काय झालंय याची माहिती वैद्यकीय अहवालांनंतरच समोर येऊ शकेल. सध्या ही तरुणी बेशुद्धावस्थेत आहे. तिच्यावर उपचार सुरू आहेत. तरुणीच्या शरीरावर असलेल्या घावांवरून ही घटना २४ तासांमध्ये घडली असण्याची शक्यता आहे, असेही डॉक्टरांनी सांगितले.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीGujaratगुजरात