शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
2
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
3
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
4
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
5
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
6
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
7
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
8
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
9
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
10
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
11
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
12
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
13
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
14
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
15
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
16
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
17
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
18
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
19
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
20
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
Daily Top 2Weekly Top 5

Video : वयोवृद्ध दांपत्यास अमानुष मारहाण; घटनेचा सर्वत्र केला जात आहे निषेध

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 30, 2021 19:47 IST

Assaulting Case : मिळालेल्या माहितीनुसार, बोईसर आगाराची एम एच 20 बीएल 2738 या क्रमांकाची एसटी बस बोईसरवरून पैठणला जात होती.

ठळक मुद्देबसचालक गोरखनाथ नागरगुजे व वाहक शितल पवार अशी वयोवृद्ध दांपत्यास मारहाण केलेल्यांची नावे आहेत. 

पालघर- गाडी सावकाश चालवा असे सांगितल्याचा राग मनात धरून एका वयोवृद्ध दांपत्यास बस चालक व महिला वाहकाने अमानुष मारहाण केल्याची घटना आज सकाळच्या सुमारास वाडा बसस्थानकात घडली.दरम्यान, या घटनेचा सर्वत्र निषेध केला जात असून बस चालक व महिला वाहकाला तात्काळ निलंबित करण्यात आले आहे. बसचालक गोरखनाथ नागरगुजे व वाहक शितल पवार अशी वयोवृद्ध दांपत्यास मारहाण केलेल्यांची नावे आहेत.        

मिळालेल्या माहितीनुसार, बोईसर आगाराची एम एच 20 बीएल 2738 या क्रमांकाची एसटी बस बोईसरवरून पैठणला जात होती. मनोर सोडून पुढे हमरापूर फाट्यावर आल्यावर येथे जर्नादन सदू पाटील वय 65 व त्यांची पत्नी सुमन पाटील हे वयोवृद्ध दांपत्य बसमध्ये बसले.चालक बस जोरात चालवत असल्याने बसचालकाला बस सावकाश चालवा असे वयोवृद्ध इसमाने त्यांना सांगितले. त्यावरून बसमध्ये चालक वाहक व जर्नादन यांची बोलाचाली झाली. त्यानंतर वाडा बसस्थानकात बस आल्यानंतर तिथे हे दांपत्य बसमधून उतरले.त्यानंतर वाहक व चालकांनी त्यांना अमानुष पणे मारहाण केली. स्थानकातील इतर प्रवासी भांडण सोडवण्याचा प्रयत्न करीत होते मात्र तरीही चालक वाहक ऐकत नसल्याचे चित्रफितीवरून दिसून येत आहे. दरम्यान घटनेची चित्रफित सोशल मिडियावर व्हायरल होताच व वयाचा विचार न करता मारहाण केल्याने या घटनेचा सर्वत्र निषेध केला जात असून संताप व्यक्त केला जात आहे. याबाबत वाडा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू आहे. यासंदर्भात बोईसर आगाराचे आगारप्रमुख राजू पाटील यांच्याशी संपर्क साधला असता विभागीय वाहतूक अधिकारी आशिष चौधरी यांनी बसचालक गोरखनाथ नागरगुजे व वाहक शितल पवार यांना निलंबित केले असल्याची माहिती मिळाली आहे. 

 

टॅग्स :Bus DriverबसचालकPoliceपोलिसpalgharपालघर