शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
2
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
3
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
4
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
5
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
6
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
7
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
8
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
9
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
10
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
11
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
12
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
13
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
14
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
15
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
16
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
17
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
18
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
19
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
Daily Top 2Weekly Top 5

भयानक! महिलेचे स्तन, जीभ कापून तोंडात आणि गुप्तांगात लाटणे घालून केले अमानुष कृत्य 

By पूनम अपराज | Updated: January 13, 2021 16:22 IST

Attempt To Murder : परिस्थिती गंभीर असल्याने महिलेला इंदूर येथे रुग्णालयात दाखल करण्यात आले. पोलिसांनी तीन वेगवेगळी पथके तयार करून आरोपींचा शोध सुरू केला आहे.   

ठळक मुद्देएका महिलेच्या चारित्र्यावर संशय आला त्यावेळी तिचा नवरा, सासू - सासरे आणि एक नातेवाईक महिलेने क्रौर्याने पातळी ओलांडली. या सर्वांनी त्या महिलेचे स्तन, जीभ आणि गाल कापला. इतक्यावरच न थांबता त्यांनी त्या महिलेच्या तोंडात आणि गुप्तांगामध्ये लाटणे घातले.

उज्जैनला लागून असलेल्या नागदा जिल्ह्यातील विद्यागरात एक भीषण घटना उघडकीस आली आहे. ज्यावेळी एका महिलेच्या चारित्र्यावर संशय आला त्यावेळी तिचा नवरा, सासू - सासरे आणि एक नातेवाईक महिलेने क्रौर्याने पातळी ओलांडली. या सर्वांनी त्या महिलेचे स्तन, जीभ आणि गाल कापला. इतक्यावरच न थांबता त्यांनी त्या महिलेच्या तोंडात आणि गुप्तांगामध्ये लाटणे घातले.

हृदयद्रावक या कृत्यामुळे पीडित महिला बेशुद्ध पडली. यावर, तिचा मृत्यू झाल्याचं समजून तिला घराबाहेर फेकले आणि संधीचा फायदा घेऊन पीडित महिलेने पळ काढला. या घटनेपेक्षाही वेदनादायक बाब अशी होती की, आजूबाजूचे लोक हे सर्व पाहत राहिले, परंतु त्या महिलेला वाचविण्याची कोणालाही हिम्मत नव्हती.

राक्षसी कुटूंबातून पळून गेल्यानंतर ती महिला दहा मिनिटे रस्त्यावर तडफडत राहिली आणि मदतीसाठी हात पसरू लागली. पण कोणालाही त्या महिलेची अवस्था पाहून दया आली नाही. अखेरीस एकाने या घटनेची माहिती पोलिसांना दिली, त्यानंतर तिला प्रथम स्थानिक रुग्णालयात नेले असता नंतर इंदूरच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले. महिलेची प्रकृती चिंताजनक आहे. बिरलाग्राम पोलीस ठाण्याने पीडित महिलेचा नवरा, सासू आणि महिला नातेवाईकांवर प्राणघातक हल्ला केल्याचा गुन्हा दाखल केला असून त्यांचा शोध सुरू केला आहे.

मंगळवारी 12 जानेवारीला विद्यानगरच्या मुख्य रस्त्याजवळील एका घरातून सकाळी एका महिलेचा आरडा ओरडा ऐकू येत होता. यानंतर घरातील लोकांनी तिला मारत घराबाहेर आणले. रक्ताने माखलेल्या महिलेचा मृत्यू झाल्याचे गृहीत धरून सर्वजण तिला घराबाहेर फेकून पळून गेले. मंडी पोलीस ठाण्याने दिलेल्या माहितीनुसार, महिलेस प्रथम तातडीने जनसेवा रुग्णालयात हलविण्यात आले व तेथून तिला उज्जैन येथे रुग्णालयात पाठविण्यात आले. परिस्थिती गंभीर असल्याने महिलेला इंदूर येथे रुग्णालयात दाखल करण्यात आले. पोलिसांनी तीन वेगवेगळी पथके तयार करून आरोपींचा शोध सुरू केला आहे. 

 यापूर्वी मारहाणही केली होती

या महिलेचे १५ वर्षांपूर्वी राजेशशी लग्न झाले होते. त्यांना दोन मुले आहेत. एकाचे वय १४ आणि दुसर्‍याचे वय पाच वर्षे आहे. राजेश हा व्यवसायाने ट्रक चालक आहे आणि बहुतेक वेळा घराबाहेर राहतो. ही घटनाच्या काही दिवसांपूर्वी पीडित महिला आपल्या नातेवाईकासह कुठेतरी गेली होती. सोमवारी ११ जानेवारीला राजेश तिला परत घेऊन आला.

कापलेले शरीराचे अवयव सापडले

पोलिसांचा असा संशय आहे की, राजेश बराच काळपासून आपल्या पत्नीला ठार मारण्याचा कट रचत होता. काही दिवसांपूर्वी राजेश तलवार घेऊन आला. त्याने तलवार वापरुन ही हिंसक घटना घडवून आणली. पोलिसांना घराच्या आत महिलेचे रक्त आणि कापलेले शरीराचे अवयवही सापडले आहेत. मात्र फरार होण्यापूर्वी आरोपींनीही रक्ताचे डाग पुसण्याचा प्रयत्न केला.

टॅग्स :PoliceपोलिसWomenमहिलाhospitalहॉस्पिटल