शहरं
Join us  
Trending Stories
1
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
2
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
3
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
4
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
5
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
6
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
7
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
8
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
9
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
10
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
11
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
12
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
13
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
14
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
15
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
16
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
17
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
18
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
19
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
20
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
Daily Top 2Weekly Top 5

नागपुरात तरुणीवर अमानुष अत्याचार :निर्भयाकांडाची पुनरावृत्ती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 28, 2020 00:28 IST

स्प्रे मारून बेशुद्ध केल्यानंतर एका तरुणीवर (वय १९) एका नराधमाने अत्याचार केला. पारडी पोलीस ठाण्याच्या हद्दीत गणराज्य दिनाच्या पूर्वसंध्येला घडलेल्या या घटनेने परिसरात प्रचंड संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे.

ठळक मुद्देपारडीतील क्रौर्य, नराधम गजाआड

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : स्प्रे मारून बेशुद्ध केल्यानंतर एका तरुणीवर (वय १९) एका नराधमाने अत्याचार केला. तो एवढ्यावरच थांबला नाही तर त्याने क्रूरतेच्या सर्व सीमा ओलांडून तरुणीच्या गुप्तांगात लोखंडी रॉड टाकण्याचा प्रयत्न केला. पारडी पोलीस ठाण्याच्या हद्दीत गणराज्य दिनाच्या पूर्वसंध्येला घडलेल्या या घटनेने परिसरात प्रचंड संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे. दरम्यान, पीडित तरुणीच्या तक्रारीवरून पोलिसांनी योगिलाल रहांगडाले (वय ५२) नामक नराधमाला अटक केली.पीडित तरुणी व तिचा भाऊ पारडीतील एका संस्थेत काम करतात. याच संस्थेत रहांगडाले हा पर्यवेक्षक आहे. संस्थेलगतच असलेल्या एका खोलीत पीडित तरुणी, तिचा भाऊ, अन्य एक तरुणी तसेच रहांगडाले राहतो. २१ जानेवारीला तरुणीचा भाऊ गावाला गेला, सोबतची एक तरुणीही बाहेरगावी गेली. मध्यरात्री १२ वाजताच्या सुमारास रहांगडाले खोलीत आला. त्याने तरुणीच्या चेहऱ्यावर स्प्रे मारला. ती बेशुद्ध झाली. त्यानंतर पहाटे ५ वाजतापर्यंत त्याने तरुणीवर अत्याचार केला. विकृत रहांगडालेने अत्याचार केल्यानंतर तिच्या गुप्तांगात रॉड टाकण्याचा प्रयत्न केला. ती अर्धमेल्या अवस्थेत असताना तो पसार झाला. सकाळी तरुणी शुद्धीवर आली. तिने बाजूला राहणाऱ्यांना ही माहिती दिली. त्यांनी तिला रुग्णालयात दाखल केले. त्यानंतर प्रकरण पारडी पोलिसांत गेले. तरुणीची थरारकथा ऐकून पोलिसांच्या अंगावरही काटा उभा राहिला. पोलिसांनी अत्याचाराचासह विविध कलमान्वये गुन्हा दाखल करून रहांगडाले याला अटक केली. त्याला न्यायालयात हजर करून त्याची २९ जानेवारीपर्यंत पोलीस कोठडी मिळविण्यात आली.निर्भयाकांडाचा थरारया घटनेने दिल्लीच्या निर्भयाकांडाचा थरार ताजा झाला आहे. देशभरात निर्भयाच्या आरोपींना तातडीने फासावर टांगण्याची मागणी होत असताना हा प्रकार घडल्याने पारडी परिसरात प्रचंड संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीRapeबलात्कार