नागपुरात कुख्यात शोबू सोहेल पिस्तुलासह गजाआड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 17, 2020 10:30 PM2020-03-17T22:30:49+5:302020-03-17T22:31:39+5:30

गुन्हे शाखेच्या युनिट तीनच्या पथकाने कुख्यात गुंड शोबू ऊर्फ अब्दुल सोहेल अब्दुल खालिक (वय २०) याला मंगळवारी दुपारी लकडगंजमध्ये अटक केली.

Infamous Shobu Sohail arrested with pistol in Nagpur | नागपुरात कुख्यात शोबू सोहेल पिस्तुलासह गजाआड

नागपुरात कुख्यात शोबू सोहेल पिस्तुलासह गजाआड

googlenewsNext
ठळक मुद्देगुन्हे शाखेच्या युनिट तीनची कामगिरी

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : गुन्हे शाखेच्या युनिट तीनच्या पथकाने कुख्यात गुंड शोबू ऊर्फ अब्दुल सोहेल अब्दुल खालिक (वय २०) याला मंगळवारी दुपारी लकडगंजमध्ये अटक केली. त्याच्याकडून पोलिसांनी पिस्तूल (माऊझर) तसेच दुचाकी असा ७५ हजारांचा मुद्देमाल जप्त केला.
गुन्हे शाखेच्या युनिट तीन पथकातील वरिष्ठ पोलीस निरीक्षक विनोद चौधरी, चंद्रशेखर मस्के, सहायक निरीक्षक पंकज धाडगे आणि त्यांचे सहकारी मंगळवारी दुपारी २.२० च्या सुमारास लकडगंज भागात गस्त करीत होते. त्यांना कुख्यात शोबू ऊर्फ सोहेल दुचाकीवर फिरताना दिसला. पोलिसांनी त्याचा पाठलाग करून त्याला ताब्यात घेतले. त्याची झडती घेतली असता त्याच्याजवळ पिस्तूल आढळले. कुख्यात सोहेल हा सक्करदरा ठाण्यात दाखल गुन्ह्यात पोलिसांना वॉन्टेड होता.

 

Web Title: Infamous Shobu Sohail arrested with pistol in Nagpur

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.