शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

नागपुरात कुख्यात गुंडाची हत्या : सिनेस्टाईल पाठलाग करून मारले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 8, 2020 00:08 IST

जुन्या वैमनस्यातून सहा ते सात सशस्त्र गुंडांनी एका कुख्यात गुंडांची सिनेस्टाईल हत्या केली. यशोधरानगर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील आर. के. सावजी भोजनालयात मंगळवारी सायंकाळी ६. ३० च्या सुमारास ही थरारक घटना घडली.

ठळक मुद्दे राणी दुर्गावती चौकात थरार

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : जुन्या वैमनस्यातून सहा ते सात सशस्त्र गुंडांनी एका कुख्यात गुंडांची सिनेस्टाईल हत्या केली. यशोधरानगर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील आर. के. सावजी भोजनालयात मंगळवारी सायंकाळी  ६. ३० च्या सुमारास ही थरारक घटना घडली. शेख समीर ऊर्फ बाबू शेख (वय २३) असे मृताचे नाव असून, तो इंदिरा मातानगरात राहत होता.समीर यशोधरानगरातील गुन्हेगारी आणि अवैध धंद्यात तीन वर्षांपासून सक्रिय होता. २०१७ मध्ये त्याने एकाची हत्या केली होती. तो बाबू म्हणून ओळखला जायचा. काही दिवसांपूर्वीच तो कारागृहातून बाहेर आला आणि परत गुन्हेगारीत सक्रिय झाला. त्याचा या भागातील प्रतिस्पर्धी गुन्हेगाराच्या टोळीसोबत वाद होता. त्या वादातून त्याचे अनेकदा खटकेही उडाले होते. या पार्श्वभूमीवर समीर मंगळवारी सायंकाळी ६.३० च्या सुमारास राणी दुर्गावती चौकाजवळ आला.

प्रतिस्पर्धी गुंडांना दिसताच ते समीरकडे धावले. त्यांच्याकडे शस्त्र असल्याचे पाहून समीर सुसाट पळत सुटला. तो पुढे आणि हातात शस्त्र धरून आरडाओरड करीत गुंड त्याच्या मागे, असे सिनेस्टाईल दृष्य रस्त्यावरच्या नागरिकांना थरारून सोडणारे होते. समीर एका बारमध्ये शिरला. तेथेही जीव धोक्यात असल्याचे लक्षात आल्याने तेथून तो आर. के. सावजी भोजनालयात मागच्या बाजूने शिरला. यावेळी त्याच्या मागेच असलेल्या आरोपींनी समीरला पकडून तीक्ष्ण शस्त्राचे घाव घालून त्याला जागीच ठार मारले. समीर रक्ताच्या थारोळळ्यात पडल्यानंतर आरोपी पळून गेले. भोजनालयातील वेटर्सनी आरडाओरड केल्यामुळे बाजूची मंडळी धावली. त्यांनी समीरला एका ऑटोत घालून मेयोत नेले. तेथे डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले.दरम्यान, या थरारकांडाची माहिती कळताच यशोधरानगर, पाचपावली आणि जरीपटक्याचे गस्तीवरील पोलीस पथकं घटनास्थळी धावले. परिमंडळ पाचचे पोलीस उपायुक्त निलोत्पलही पोहचले. त्यांनी हत्याकांडाची माहिती घेतल्यानंतर आरोपींची नावेही जाणून घेतली. त्यानंतर त्यांना शोधण्यासाठी वेगवेगळी पथके कामी लावली. वृत्त लिहिस्तोवर दोन आरोपींना पोलिसांनी ताब्यात घेतले. त्यांची चौकशी सुरू होती.

त्या गुन्ह्याशी संबंध ? समीरने दोन वर्षांपूर्वी एकाची हत्या केली. त्यातून सुटून बाहेर आल्यानंतर तो निर्ढावल्यासारखा वागत होता. तर, त्याचा गेम करण्यासाठी त्या हत्याकांडाशी जुळलेली काही मंडळी समीरवर सूड उगविण्याची संधी शोधत होते. आज  ज्या आरोपींनी समीरची हत्या केली, त्यांचे समीरसोबत वैमनस्य होते, अशी सूत्रांची माहिती आहे. मात्र, हे वैमनस्य दोन वर्षांपूर्वीच्या हत्याकांडाशी संबंधित आहे की नाही, ते स्पष्ट झाले नाही. या संबंधाने आम्ही चौकशी करीत असल्याचे पोलीस उपायुक्त निलोत्पल यांनी लोकमतशी बोलताना सांगिलते.अंगावर काटा आणणारे दृश्य  आरोपींनी अत्यंत निर्घृणपणे समीरची हत्या केली. यावेळी भोजनालयात असलेल्या वेटरच्या हातातील भाजीचा गंज खाली पडला आणि त्यातील मांस तसेच समीरच्या रक्ताचा सडा फर्शीवर पडला. घटनास्थळावरचे हे दृश्य अंगावर काटा आणणारे होते. समीरच्या मृतदेहाबाजूलाच एक कटर पोलिसांना सापडले. ते आरोपींचे आहे की समीरचे त्याची पोलीस चौकशी करीत आहेत.

अवघ्या दीड तासात दोघांची हत्याउपराजधानीत अवघ्या दीड तासात दोघांची हत्या झाल्याने प्रचंड दहशत पसरली आहे. मंगळवारी रात्री ६. ३० च्या सुमारास जुन्या वैमनस्यातून सहा ते सात सशस्त्र गुंडांनी एका कुख्यात गुंडांची सिनेस्टाईल हत्या केली. यशोधरानगर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील आर. के. सावजी भोजनालयात   ही थरारक घटना घडली. शेख समीर ऊर्फ बाबू शेख (वय २३) असे मृताचे नाव असून, तो इंदिरा मातानगरात राहत होता. या हत्याकांडातील आरोपींची शोधाशोध सुरू असतानाच रात्री ८ च्या सुमारास वाठोडा पोलीस ठाण्याच्या हद्दीत एका व्यक्तीची दगडाने ठेचून हत्या केल्याचे उघडकीस आले. 

वाठोड्यातील मृत आणि आरोपी अज्ञात वाठोडा पोलीस ठाण्याच्या हद्दीत न्यू श्रीराम नगर आहे. मंगळवारी रात्री ८ च्या सुमारास या परिसरात एका तरुणाचा मृतदेह पडून असल्याची माहिती वाऱ्यासारखी सर्वत्र पसरली. त्यामुळे पोलिसांचा ताफा तिकडे पोहचला. मृत अंदाजे २५ वर्षे वयोगटातील आहे. त्याच्या डोक्यावर दगडाने ठेचून मारेकरी पसार झाले. मृत कोण आणि त्याला कुणी मारले, ते स्पष्ट झाले नाही. तो जिन्स आणि हिरवा टी शर्ट घालून आहे. मारेकऱ्यांनी त्याची ओळख पटू नये म्हणून त्याचा चेहरा विद्रूप केला. मृत तसेच आरोपींची ओळख पटविण्यासाठी पोलीस मध्यरात्रीपर्यंत धावपळ करीत होते. अवघ्या दीड तासात घडलेल्या हत्येच्या दोन घटनांनी उपराजधानीत प्रचंड खळबळ उडाली असून, गुन्हे शाखेचे अतिरिक्त आयुक्त नीलेश भरणे, उपायुक्त गजानन राजमाने यांनीही घटनास्थळी भेट देऊन आरोपींना तातडीने शोधण्यासाठी संबंधित ठाण्यातील पोलिसांना आदेश दिले.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीMurderखून