शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईत अपहरणाचा थरार: पोलिसांची एकीकडे आरोपीशी चर्चा, दुसरीकडे बाथरूमच्या खिडकीतून एन्ट्री
2
"...पेक्षाही अधिक धाडस त्या महिलेत होतं"; इंदिरा गांधींचा उल्लेख करत राहुल गांधींचा पंतप्रधान मोदींवर हल्लाबोल
3
पवईत मुलांना ओलीस ठेवणारा रोहित आर्य कोण?; शिक्षण विभागाशी समोर आले कनेक्शन, काय आहे प्रकार?
4
बाजारात 'ब्लॅक थर्सडे'! निफ्टी २६,००० च्या खाली; एकाच दिवसात गुंतवणूकदारांचे १.८२ लाख कोटी बुडाले
5
सोनं १ लाखाच्या खाली येणार, चांदीही चमक गमावणार, ही ४ कारणं निर्णायक ठरणार
6
'मी का लोकांच्या शिव्या खाऊ; यापुढे रस्ता खराब झाला तर...', नितीन गडकरींचा मोठा निर्णय, जाणून घ्या
7
KKR: आयपीएल २०२६ पूर्वी केकेआरच्या संघात मोठा बदल, अभिषेक नायरवर मोठी जबाबदारी!
8
Mumbai Children Hostage: ओलीस मुलांची सुखरुप सुटका; अपहरणकर्त्याला पोलिसांनी ताब्यात घेतले 
9
Mumbai Hostage: बिग ब्रेकिंग! मुंबईत एका क्लासमधील मुलांना ओलीस ठेवण्यात आले; पोलिसांनी इमारत घेरली  
10
जिओचा 'या' २ राज्यात दबदबा! दोन कोटी ५१ लाखांहून अधिक युजर्स; एअरटेल-व्हीआयला मोठा फटका
11
Smartphone Tips : बिघडण्याआधी तुमचा स्मार्टफोन देतो 'हे' संकेत! तुम्ही दुर्लक्ष तर करत नाही ना?
12
रासायनिक खतांचे दर नऊ वर्षांत ७५ टक्क्यांनी वाढले; शेतकऱ्यांचे मरण, उसाचा दर केवळ २२ टक्केच वाढला
13
गंभीर आजारांवर केवळ रेग्युलर प्लॅन पुरेसा नाही; 'क्रिटिकल इलनेस' कव्हरचे गणित समजून घ्या
14
IND vs AUS : क्रांतीनं झाकली हरमनप्रीतची मोठी चूक! स्टार्क बायकोला चीअर करायला आला, पण...
15
अमेरिकेचा भारताला दिलासा! चाबहार पोर्टवरील निर्बंधातून डोनाल्ड ट्रम्प यांनी दिली सूट
16
लेकाच्या सिनेमात काम करणार का? शाहरुख खान म्हणाला, "त्याला परवडलं तर आणि..."
17
नारनौलमध्ये थरकाप उडवणारा अपघात, तरुणाचा मृतदेह तब्बल ११ किमीपर्यंत फरफटत गेला; दृष्य पाहून स्थानिकही सुन्न
18
Healthy Tea: चहा सोडायचाय? 'हा' घ्या उत्तम पर्याय; एकदा पावडर तयार करा, तीन महीने वापरा!
19
३ महिन्यांत ५० किलो वजन घटवा आणि थेट पोर्शे कार घेऊन घरी जा! जिमनं दिलं 'गोल्डन' चॅलेंज
20
कौतुकास्पद! आईची शेवटची इच्छा पूर्ण करण्यासाठी मुलाने 290 शेतकऱ्यांचे लाखो रुपयांचे कर्ज फेडले

Sonam Raghuvanshi : "मी थकले आहे, राजाला मार, नाहीतर मी मरेन..."; बॉयफ्रेंड राजनेच केली सोनमची पोलखोल

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 12, 2025 16:23 IST

Sonam Raghuvanshi And Raj Kushwaha : सोनमने बॉयफ्रेंड राज कुशवाहच्या मदतीने राजाचा काटा काढला. हनिमूनला गेल्यावर तिने राजाची हत्या केली. या प्रकरणात रोज नवनवीन खुलासे करण्यात येत आहेत.

राजा रघुवंशीच्या हत्येने सर्वांनाच मोठा धक्का बसला आहे. पत्नी सोनमने बॉयफ्रेंड राज कुशवाहच्या मदतीने राजाचा काटा काढला. हनिमूनला गेल्यावर तिने राजाची हत्या केली. या प्रकरणात रोज नवनवीन खुलासे करण्यात येत आहेत. लग्नानंतरच्या विधी पूर्ण होण्यापूर्वीच सोनमने राजाला मारण्याचा निर्णय घेतला. १३ मे रोजी तिने राज कुशवाहला मेसेज केला की, मी थकले आहे, राजाला मार, नाहीतर मी मरेन. राजने यावर मी काहीतरी करतो असा रिप्लाय दिला. तसेच नंतर विशालसोबत कट रचण्यास सुरुवात केली.

बुधवारी रात्री पूर्वी खासी हिल्स पोलिसांनी सोनम, राज, विशाल, आनंद आणि आकाश यांची एकत्र चौकशी केली तेव्हा राजनेही सोनमची गुपितं उघड करण्यास सुरुवात केली. तो म्हणाला की "सोनमच्या कडक स्वभावामुळे, रागामुळे कर्मचारी कमी बोलत असत. मी स्वतः सोनमला घाबरत होतो, पण ती माझ्यावर प्रेम करू लागली." सोनमने राजाला मारण्याचा निर्णय घेतला. ११ तारखेला राजाशी लग्न केलं, पण तिच्या मनात हत्येचा विचार येत राहिला. १३ मे रोजी तिने रागाच्या भरात हा मेसेज पाठवला.

"मी कोणाशीही लग्न केलं तरी मी तुझीच गर्लफ्रेंड...", सोनमसमोर स्टेजवर ढसाढसा रडला राज

राजने पोलिसांना सांगितलं की तो सोनमच्या लग्नाला गेला नव्हता. लग्नाच्या दोन दिवस आधी तो त्याच्या मामाच्या घरी गेला होता. सोनमने त्याला थांबवण्याचा प्रयत्न केला. हनिमूनला जाण्यापूर्वी राज इंदूरच्या संगम नगरमधील एका मोकळ्या मैदानात विशालला भेटला आणि शिलाँगमध्ये हत्येचा कट रचला. डीआयजी शिलाँग ईस्टर्न रेंज डेव्हिड एनआर मार्क यांच्या मते, सोनमने २३ मे रोजी मंगळसूत्र आणि अंगठी बॅगेत ठेवली होती. पोलिसांना ही बॅग होमस्टेमधून जप्त केली आहे. ज्या दिवशी मंगळसूत्र सापडले, त्या दिवशी सोनमचा संशय आला.

राजाच्या हत्येचा प्लॅन अयशस्वी झाला असता तर काय करणार होती सोनम? बॅकअप प्लॅन तयार

नवविवाहित वधू मंगळसूत्र बॅगेत कसं ठेवू शकते? चौकशीदरम्यान असं आढळून आलं की सोनम राजाची हत्या केल्यानंतर बॅगेसह पळून जाऊ इच्छित होती. पण  राजाने ती होमस्टेमध्येच ठेवली होती. राज कुशवाहची आई चुन्नी देवी अजूनही आपला मुलगा निर्दोष असल्याचं म्हणत आहे. आपल्या मुलाला अडकवण्यात आल्याचं सांगितलं.

"सोनम वयाने मोठी, बॉस होती, राज फक्त नोकर"; आईने घेतली लेकाची बाजू, म्हणाली...

चुन्नी देवी यांनी मुलगा राजच्या बचावात युक्तिवाद करताना म्हटलं की, "माझा मुलगा मेहनती होता, त्याने मेहनतीने पैसे कमविण्यावर लक्ष केंद्रित केलं होतं. सोनमने त्याची दिशाभूल केली असेल. राज हे अस काही करू शकत नाही, तो कोणालाही मारू शकत नाही. सोनम राजपेक्षा मोठी होती, ती राजची बॉस होती, राज फक्त तिथे एक नोकर होता. राजने सोनम जे काही म्हणेल ते केलं असावं."

टॅग्स :Madhya Pradeshमध्य प्रदेशCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिसArrestअटक