शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

संतापजनक! "पप्पा, आजीला मारू नका..."; लेकीचं न ऐकता मुलाने केली आईला बेदम मारहाण

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 15, 2023 16:35 IST

मुलगा आईसोबत गैरवर्तन करत असून तिला मारहाण करत आहे. तो आधी आईला कानाखाली मारतो, नंतर तिला हाताने ढकलून देतो.

इंदूरच्या चंदन नगर पोलीस स्टेशन हद्दीतील नंदन नगरमध्ये वृद्ध आईला मारहाण केल्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. व्हिडिओमध्ये मुलगा आपल्याच आईसोबत गैरवर्तन करत असून तिला मारहाण करत आहे. तो आधी आईला कानाखाली मारतो, नंतर तिला हाताने ढकलून देतो. आई जवळ आल्यावर मुलगा तिच्या पोटात जोरात लाथ मारतो. हा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर पोलिसांनी हे प्रकरण गांभीर्याने घेत वृद्ध आईला पोलीस ठाण्यात बोलावले, मात्र, मुलाच्या या कृत्यानंतरही वृद्ध आईने आपल्या मुलावर कायदेशीर कारवाई करण्यास नकार दिला.

चंदन नगर पोलीस स्टेशन परिसरातील नंदन नगरमध्ये ही घटना घडली आहे. सुरेश वर्माने आपल्या वृद्ध आईला बेदम मारहाण केली, या भांडणाचा व्हिडीओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. व्हिडिओमध्ये मुलगा आपल्याच आईसोबत गैरवर्तन करत असून तिला मारहाण करत आहे. व्हिडिओमध्ये स्पष्टपणे दिसत आहे की, हा तरुण आधी आपल्या आईला थप्पड मारतो आणि नंतर तिला हाताने ढकलून देतो. आई जवळ आल्यावर मुलगा तिच्या पोटात जोरात लाथ मारतो.

"आजीला मारू नका"

19 सेकंदाच्या या व्हिडिओमध्ये नात घरातून येते आणि आजीला मारू नका असं म्हणते आणि मग वडिलांचा हात हातात घेते. सुरेश मंगळवारी रात्री वस्तीतील महिलांशी गैरवर्तन करत होता, तेव्हा त्याच्या आईने असं करू नकोस असं सांगितल्याचं रहिवाशांचे म्हणणे आहे. याच दरम्यान, सुरेशने आईलाही बेदम मारहाण केली. हा व्हिडिओ शेजाऱ्यांनीच खूप व्हायरल केला आहे.

मुलावर कारवाई करण्यास आईचा नकार

चंदननगर पोलिसांनी या प्रकरणाची गंभीर दखल घेत वृद्ध आईला पोलीस ठाण्यात बोलावले, मात्र, मुलाच्या या कृत्यानंतरही वृद्ध आईने आपल्या मुलावर कायदेशीर कारवाई करण्यास नकार दिला. दुसरीकडे अशी तक्रार आल्यास कठोर कारवाई केली जाईल, असे पोलिसांचे म्हणणे आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.  

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारी