शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
3
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
4
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
5
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
6
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
7
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
8
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
9
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
10
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
11
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
12
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
13
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
14
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
15
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
16
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
17
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
18
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
19
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
20
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
Daily Top 2Weekly Top 5

"मी मेलो नाही, मला मारलं गेलंय..."; राजाचा मृतदेह सापडल्यानंतर इंदूरमध्ये लागला बॅनर

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 4, 2025 17:18 IST

ज्याठिकाणी राजाचा मृतदेह सापडला तिथेच जवळ सोनमचा शर्ट आणि तुटलेला मोबाईल जप्त करण्यात आला आहे

इंदूर - मेघालयच्या शिलांगमध्ये हनीमूनसाठी गेलेले इंदूरचे जोडपे अचानक बेपत्ता झाले. यातील पती राजा रघुवंशीचा मृतदेह सापडला. मात्र या प्रकरणी वेगळेच वळण आले आहे. राजाच्या इंदूर येथील घराबाहेर मोठे पोस्टर लावण्यात आले आहे. त्यातून राजाच्या हत्येची कसून चौकशी करून आम्हाला न्याय द्यावा अशी मागणी कुटुंबाने केली आहे.

या पोस्टरमध्ये राजा आणि त्याची पत्नी सोनम यांचा फोटो छापण्यात आला आहे. त्या केंद्र सरकार आणि राज्य सरकारला उल्लेखून मेसेज लिहिण्यात आला आहे. "राजा की आत्मा करे पुकार, मै मरा नही, मुझे मारा गया है.." CBI तपास करा अशी मागणी करण्यात आली आहे. ट्रान्सपोर्ट व्यावसायिक राजा रघुवंशी आणि त्यांची पत्नी सोनम यांचं ११ मे रोजी लग्न झाले होते. २० मे रोजी हे दोघे हनीमूनसाठी शिलांगला गेले होते. २३ मे रोजी हे जोडपे अचानक बेपत्ता झाले. ११ दिवस उलटल्यानंतर २ जून रोजी राजाचा मृतदेह शिलांगच्या सोहरा परिसरातील वेई सॉडॉन्ग धबधब्याजवळील दरीत सापडला. 

राजाच्या मृतदेहाचे पोस्टमोर्टम केले तेव्हा त्याची हत्या झाल्याचे उघड झाले. अद्याप राजाची पत्नी सोनम ही गायब आहे. पोलीस तिचा शोध घेत आहेत. मेघालय पोलिसांनी या प्रकरणी विशेष तपास पथक नेमलं आहे. परंतु राजाच्या कुटुंबाचे स्थानिक पोलिसांच्या तपासावर विश्वास नाही. त्यामुळे या पोस्टरच्या माध्यमातून त्यांनी केंद्रीय तपास यंत्रणा सीबीआयकडे चौकशीची मागणी केली आहे. ही सूनियोजित केलेली हत्या आहे. त्यामुळे सत्य समोर आणण्यासाठी सीबीआयची गरज आहे असं कुटुंबाने म्हटलं.

दरम्यान, ज्याठिकाणी राजाचा मृतदेह सापडला तिथेच जवळ सोनमचा शर्ट आणि तुटलेला मोबाईल जप्त करण्यात आला आहे. राजा आणि सोनम हनीमूनसाठी शिलांगला गेले होते. अचानक त्यांच्याशी संपर्क बंद झाला त्यामुळे कुटुंबाला चिंता सतावली. त्यांनी तात्काळ पोलिसांकडे धाव घेत संबंधित घटनेची माहिती दिली. त्यानंतर मध्य पोलीस आणि मेघालय पोलीस या घटनेचा तपास करत आहेत. त्यात राजाचा मृतदेह सापडल्याने कुटुंबाला मोठा धक्का बसला. सोनम अद्यापही बेपत्ता असल्याने ती सुरक्षित सापडेल अशी अपेक्षा कुटुंबाला आहे.   

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारी