मुंबई - अतिशय निर्दयीपणे पाळीव कुत्र्यांची वाहतूक करणं एका बसचालकाला आणि त्याच्या क्लिनरला चांगलंच अंगाशी आलं आहे. बेनेवोलेंत असोसिएशन ऑफ वेल्फेअर या प्राणीमित्र संस्थेला एका खाजगी बसमधून पाळीव कुत्र्यांची वाहतूक होत असल्याची खात्रीशीर माहिती मिळाली होती. त्यानुसार मुलुंडच्या आनंदनगर टोलनाक्यावर नवघर पोलिसांच्या मदतीने सापळा रचण्यात आला आणि इंदौरवरून आणण्यात आलेल्या एका खाजगी बसला पोलिसांनी नाकाबंदीदरम्यान आनंदनगर टोल नाक्यावर पुढे जाण्यास अटकाव केला. या बसच्या डिकीमधून एका बकेटमधून 4 लॅब्रो डॉग आणि एक पग जातीच्या पिल्लांची सुखरूप सुटका करण्यात आली. एका बंदिस्त आणि अंधार्या जागेत जास्त वेळ राहिल्यामुळे या कुत्रांच्या पिल्लांची प्रकृती गंभीर झाली होती. त्यामुळे या स्वयंसेवी संस्थेने दिलेल्या तक्रारीवरून सुखजित सिंग आणि रणजीत सिंग या दोघांवर ॲनिमल प्रोटेक्शन ॲक्टअंतर्गत गुन्हा दाखल करून त्यांना अटक करण्यात आली आहे. सध्या या पिल्लांची स्थिती नाजूक असून त्यांच्यावर औषध उपचार सुरू आहेत.
Video : इंदौर व्हाया मुंबई! कुत्र्यांची तस्करी करणं महागात; पोलिसांनी केली कारवाई
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 3, 2018 19:32 IST
या बसच्या डिकीमधून एका बकेटमधून 4 लॅब्रो डॉग आणि एक पग जातीच्या पिलांना रेस्क्यू केलं. एका बंदिस्त आणि अंधार्या जागेत जास्त वेळ राहिल्यामुळे या कुत्रांच्या पिलांची प्रकृती गंभीर झाली होती. त्यामुळे या स्वयंसेवी संस्थेने दिलेल्या तक्रारीवरून सुखजित सिंग आणि रणजीत सिंग या दोघांवर ॲनिमल प्रोटेक्शन ॲक्टअंतर्गत गुन्हा दाखल करून त्यांना अटक करण्यात आली आहे . सध्या या पिल्लांची स्थिती नाजूक असून त्यांच्यावर औषध उपचार सुरू आहेत.
Video : इंदौर व्हाया मुंबई! कुत्र्यांची तस्करी करणं महागात; पोलिसांनी केली कारवाई
ठळक मुद्दे मुलुंडच्या आनंदनगर टोलनाक्यावर नवघर पोलिसांच्या मदतीने सापळा रचण्यात आला बसच्या डिकीमधून एका बकेटमधून 4 लॅब्रो डॉग आणि एक पग जातीच्या पिल्लांची सुखरूप सुटका करण्यात आली.घांवर ॲनिमल प्रोटेक्शन ॲक्टअंतर्गत गुन्हा दाखल करून त्यांना अटक करण्यात आली आहे