शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

नायजेरियन आरोपीकडे मिळाले भारतीय आधार आणि पॅन कार्ड

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 4, 2022 09:58 IST

वसईत धक्कादायक प्रकार उघडकीस आल्याने खळबळ

मंगेश कराळेलोकमत न्यूज नेटवर्क नालासोपारा : परदेशी नागरिकांचे वाढते प्रमाण पोलिसांसाठी डोकेदुखी बनत आहे. त्यांच्याकडून गुन्हेगारी घटना सातत्याने वाढत आहेत. आता तर वसईत नायजेरियन आरोपीकडे चक्क त्याच्या नावाचे भारतीय आधार कार्ड आणि पॅन कार्ड सापडल्याचे उघड झाले आहे. याच प्रकारामुळे इतर देशांतून बेकायदा भारतात घुसखोरी केलेल्या नागरिकांना बनावट आधार कार्ड बनवून देणारे रॅकेट सक्रिय असल्याची शक्यता असून, पोलीस त्यादृष्टीने तपास करीत आहेत. 

वसई तालुक्यातील नालासोपारा शहरामध्ये मोठ्या संख्येने नायजेरियन आणि इतर परदेशी नागरिक राहतात. विरार, वसई, नालासोपारा, भाईंदर, मीरा रोडमध्ये स्वस्तात घरे मिळत असल्याने ही मंडळी येतात. याव्यतिरिक्त छुप्या पद्धतीनेही परदेशी नागरिक राहत असल्याचे पोलिसांच्या निदर्शनास आले आहे. त्यातील अनेक नागरिक हे मादक पदार्थांच्या तस्करीत आणि लॉटरी फसवणुकीच्या गुन्ह्यात सापडल्याची माहिती पोलिसांनी दिली. याच गुन्ह्यातील आरोपींकडून त्यांच्याच नावाचे आधार आणि पॅन कार्ड सापडले आहे. त्यांनी ही कागदपत्रे कशी बनवली व कोणाकडून बनवली याचा शोध सुरू आहे. नायजेरियन नागरिक पर्यटन, शिक्षण, व्यवसाय अथवा वैद्यकीय व्हिसावर भारतात प्रवेश करतात. त्यानंतर ते या ठिकाणी आपले बस्तान मांडून गैरधंदे करायला सुरुवात करतात. त्यांच्यासोबत अनेक स्थानिक तरुण-तरुणी या रॅकेटमध्ये सहभागी असल्याचे समोर आले आहे.

अनेक नायजेरियन नागरिकांच्या व्हिसाची मुदत संपल्यानंतरही ते याच ठिकाणी राहत असल्याचे पोलिसांच्या कारवाईवरून पुढे आले आहे. दरम्यान, काही नायजेरियन भारतात राहण्यासाठी अमली पदार्थांच्या केस करवून घेत असल्याचे अनेक वेळा बोलले जाते, तर यांना भारतात राहण्यासाठी मज्जाव केला तर काही तांत्रिक अडचणींना पोलिसांना सामोरे जावे लागते.

काही नायजेरियननी केला भारतीय महिलांशी विवाहशहरात राहण्यासाठी काही नायजेरियन नागरिकांनी अनोखी शक्कल लढवत आर्थिक व्यवहार करून काही भारतीय महिलांशी लग्न केले आहे, तर काहींनी फक्त नावाला लग्न करून कागदोपत्री या ठिकाणी राहत असल्याचा पुरावा गोळा केला आहे. या पुराव्यासह त्यांनी आधार कार्ड, पॅन कार्ड बनविले असल्याचे पोलिसांनी सांगितले.

परदेशी नागरिक किंवा कोणी अशी बनावट कागदपत्रे बनवित असेल व याबाबत कोणाकडे माहिती असेल तर त्यांनी ती माहिती पोलिसांना द्यावी. जेणेकरून पोलिसांना कारवाई करता येईल. - विजयकांत सागर, पोलीस उपायुक्त, मुख्यालय, पोलीस आयुक्तालय

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारी